टाइम इज मनी (Time is Money) अशी इंग्रजी म्हण प्रचलीत आहे. वेळ हा पैशांइतकाच महत्वाचा आहे. बऱ्याचदा आपण असे लोकं पाहतो जे वेळेच्या बाबतीत अतिशय काटेकोर असतात. इतरांना दिलेली वेळ तर ते पळतातच शिवाय इतरांनीसुद्धा वेळ पाळावी असा त्यांचा आग्रह असतो. जोतिष्यशास्त्रात (Astrology) अशा काही राशी सांगितल्या आहेत ज्या वेळेच्या आणि कामाच्या बाबतीत एकनिष्ठ असतात. आज आपण अशा चार राशींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्या मते वेळ हा पैशांइतकाच महत्वाचा आहे. वेळेचे बंधन बाळंत असल्याने या राशीचे लोकं कधीकधी कडक स्वभावाचे म्हणूनसुद्धा ओळखले जातात. आळशी लोकांना यांचा राग येत असला तरी हेच लोकं आयुष्यात पुढे जातात.
- मेष- या राशीचे लोक अत्यंत वक्तशीर मानले जातात. त्यांना उशीर अजिबात आवडत नाही. व्यवसायात किंवा कामाच्या ठिकाणी एखादी व्यक्ती निष्काळजीपणा करत असेल तर त्यांना लगेच राग येतो. तसेच, या लोकांना त्यांच्या मोकळ्या वेळेतही सक्रिय राहणे आवडते. हे लोक दिवसभर अंथरुणावर पडून किंवा त्यांचा आवडता कार्यक्रम पाहण्याऐवजी व्यायामशाळेत जातात किंवा काही प्रकारचे शारीरिक व्यायाम करतात. मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे, त्याच्याकडून त्यांना हे गुण मिळतात.
- मिथुन- या राशीचे लोक अत्यंत वक्तशीर म्हणून ओळखले जातात. हे लोक त्यांच्या कामाच्या ठिकाणी कामाचा निपटारा आधीच करतात. तसेच त्यांच्याशी कोणी निष्काळजीपणाने वागले तर ते त्यांना अजिबात आवडत नाही. मिथुन राशीच्या लोकांना त्यांचा मोकळा वेळ नवीन गोष्टी करण्यात घालवायला आवडते. हे लोक जिज्ञासू असतात आणि काही तरी नवीन शिकून त्यांचा मोकळा वेळ घालवण्यावर विश्वास ठेवतात. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये हे गुण येतात.
- कुंभ- या राशीचे लोक मेहनती आणि प्रामाणिक असतात. प्रत्येक गोष्ट वेळेवर पूर्ण करण्यावर हे लोक विश्वास ठेवतात. तसेच, हे लोक वेळेचे व्यवस्थापन चांगले करतात. या लोकांना त्यांच्या फावल्या वेळेत वेगवेगळी कामे करायला आवडते आणि ते कोणत्या ना कोणत्या कामात व्यग्र असतात. कुंभ राशीवर शनिदेवाचे अधिराज्य आहे, शनिकडूनच त्यांना हे गुण मिळतात. कुंभ राशीच्या लोकांना मोकळा वेळ मिळेल तेव्हा समाजासाठी कोणत्याही प्रकारे योगदान देणे त्यांना आवडते. त्यामुळे ते सामाजिक उपक्रमात सहभागी होतात.
- वृश्चिक- या राशीचे लोक साहसी आणि धोका पत्करणारे असतात. ते त्यांचा मोकळा वेळ जवळपासची ठिकाणे शोधण्यात आणि नवीन गोष्टी करून पाहण्यात घालवतात. तसेच हे लोक खूप वक्तशीर असतात. त्यांना निष्काळजीपणा अजिबात आवडत नाही. ते वेळेचा सदुपयोग करतात. गुरू हा धनु राशीचा स्वामी आहे, त्याच्याकडून हे गुण त्यांना मिळतात.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)