ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) शनि ग्रह सर्वात मंद गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. राशीचे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला गोचर असे म्हणतात. अडीच वर्षांनंतर शनि ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. गोचर करताना सूर्य आणि चंद्र हे ग्रह सोडले तर बाकी सर्व ग्रह वक्री होतात. त्यामुळे वक्री स्थिती काही राशींसाठी शुभ, तर काही राशींसाठी अशुभ असते. 12 जुलैपासून शनि वक्री झाला असून कुंभ राशीतून मकर राशीत प्रवेश केला आहे. 23 ऑक्टोबरपर्यंत शनि या स्थितीत असणार आहे. यामुळे तीन राशींच्या कुंडलीत महापुरुष राजयोग तयार झाला आहे.
- वृषभ- वृषभ राशीच्या लोकांना महापुरुष योग लाभदायी आहे. या लोकांना अचानक पैसे मिळू शकतात. राजकारणात सक्रिय असलेल्या लोकांना मोठे पद मिळू शकते. तसेच नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नवीन नोकरी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. एकूणच हा काळ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.
- कर्क- कर्क राशीच्या लोकांना करिअर-व्यवसायातही चांगले यश मिळेल. विशेषतः मिथुन राशीच्या व्यावसायिकांना मोठा फायदा होईल. तुम्हाला या काळात सन्मान मिळेल. हाराजकीय क्षेत्रातून फायदा होऊ शकतो. नोकरी शोधणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. परदेशात काम करणाऱ्यांनाही मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
- मिथुन- हा महापुरुष योग मिथुन राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ देईल. प्रत्येक कामात यश मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. विशेषत: सरकारी क्षेत्राशी संबंधित कामांना वेग येईल. परीक्षा-मुलाखतीत यश मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी प्रवेश मिळू शकतो.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)