Weekly Horoscope, 15 ते 21 मे 2022: कर्क राशींच्या लोकांनी रिस्क घेताना सावधान, बाकी राशीच्या लोकांना कसा असेल हा आठवडा

| Updated on: May 15, 2022 | 2:57 PM

Weekly Horoscope, 15 ते 21 मे 2022: मिथुन राशीच्या लोकाचं बाहेरच्या व्यक्ती सोबत भाडणं किंवा मतभेदा सारखी स्थिती निर्माण होईल. फालतूच्या विवादात न पडता स्वत:च्या कामावर लक्ष द्या.

Weekly Horoscope, 15 ते 21 मे 2022: कर्क राशींच्या लोकांनी रिस्क घेताना सावधान, बाकी राशीच्या लोकांना कसा असेल हा आठवडा
Follow us on

 

डॉ. अजय भाम्बी –
Weekly Horoscope 15 May 2022 to 21 May 2022| येणारा आठवडा (Week) कसा असेल. या आठवड्यात कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरुन आपला वेळ शुभ (Lucky)असेल. याशिवाय, त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवून तुम्ही तोटा टाळू शकता. यावेळी कोणत्या गोष्टींबद्दल आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. या आठवड्यात आपल्यासाठी कोणता रंग (Colour), कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर शुभ आहे, हे देखील जाणून घेऊ. जाणून घ्या या आठवड्याचं म्हणजेच 15 मे ते 21 मेपर्यंतचं संपूर्ण साप्ताहिक राशीभविष्य ( Weekly Horoscope Of All Zodiac Signs Rashifal From 15 May 2022 to 21 May 2022)

मेष (Aries) –

घरातील कामात खूप बिझी रहाल. विशेष व्यक्तीची भेट होईल. ज्यांने तुमच्या विचारात परिवर्तन होईल. भावडांत सुरू असलेले आपापसातील संपत्ती किंवा वाटणी संबंधीत विवाद आपापसातील सहमती आणि कोणाच्या मध्यस्थीने सोडवले जातील. नवीन गाडी खरेदी करायची असेल तर वेळ अनुकूल आहे.
आठवड्याच्या मध्यानंतर अशुभ बातमी मिळाल्याने मन व्यथित असेल. होणाऱ्या कामात काही विघ्न येतील. अनोळखी व्यक्तींवर जास्त विश्वास ठेवू नका. नाहीतर तुम्ही तुमचं नुकसान करून बसाल. मनाप्रमाणे कामं झाली नाहीत तर कधी कधी तुम्ही बेचान होता. पण असं होवू देऊ नका. धैर्य कायम ठेवा.
कामाच्या ठिकाणी तुमचा मान संन्मान आणि दबदबा कायम राहील. विस्तार संबंधी योजना होतील. नोकरीत वातावरण तुमच्या बाजूने राहील. सहकाऱ्यांसोबत संबंध चांगलं ठेवणं गरजेचं आहे. नोकरदार लोकांसाठी हा आठवडा चॅलेजिंग असेल. मानसिक स्थिती शांत ठेवा. जास्त ताण तणाव घेऊ नका.

वृषभ राश‍ी (Taurus)-

रखडलेले पैसे मिळतील. उधार दिलेले पैसे मिळाल्याने आर्थिक स्थितीत सुधारणा. अवघड कामात मित्रांची मदत मिळेल. जमीनी संबंधीक कामं पूर्ण होतील. बिझी शेड्युल्ड मधून ही नातेवाईक आणि मित्रांचं गेट टुगेदर सारखे प्रोग्राम होतील.
घाईने कामं बिघडू शकतात. ज्यावर घरातील सुख शांती अवलंबून राहील. शेजाऱ्यांसोबत संबंध बिघडू देऊ नका. वाहनं तसंच मशीन सारख्या उपकरणांचा वापर काळजीपूर्वक करा. घरात पाहुण्यांच्या येण्याने खर्च वाढू शकतो.
व्यवसायात जर कोणासोबत पार्टनरशीप होत असेल तर आज त्यावर गांभीर्याने विचार करा. ही पार्टनरशीर तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. कमीशन सारख्या कामात लाभदायक स्थिती. नोकरदार व्यक्तींना आपल्या मनाप्रमाणे स्थलांतरण मिळेल. प्रयत्न करत रहा.

मिथुन राश‍ी (Gemini)-

आठवडा काही भेटी गाठींचा असेल. घरात सुरू असलेल्या समस्या दूर करण्यासाठी काही महत्वपूर्ण नियम करा. त्याने कामात यशस्वी व्हाल. वाहन खरेदी होऊ शकते. घरातील सगळ्या सदस्यांसोबत धार्मिक ठिकाणी जाण्याचे प्रोग्राम होतील.
बाहेरच्या व्यक्ती सोबत भाडणं किंवा वाद विवादाची परिस्थिती निर्माण होईल. फालतूच्या भाडणात लक्ष न देता आपल्या कामावर लक्ष द्या. उत्पन्नाच्या साधनात कमी होईल. धैर्य राखणं अति आवश्यक आहे. आपल्या कामातच बिझी रहा.
व्यवसायात कोणत्याही नवीन कामाची सुरूवात करण्यासाठी योग्य वेळ आहे. तुमच्या कुवतीनुसार आणि योग्यते प्रमाणे महत्वाचे निर्णय होतील. कामाच्या ठिकाणी नवीन मशीन लावण्याचा प्रोग्राम होईल. नोकरीत प्रमोशन तसंच पदोन्नतीचे योग आहेत.

कर्क राश‍ी (Cancer)-

काही विशिष्ट लोकांसोबत लाभदायक संबंध होतील. ज्यांने तुमच्या विचारशैलीत नवं पण येईल. घरात जवळचे नातेवाईक आल्याने आनंदी वातावरण राहील. रोजच्या धवपळीच्या आणि व्यस्त दिवसातून आराम मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यास आणि करिअरच्या समस्यांपासून समाधान मिळेल. मोठ्यांचे आशीर्वाद आमि कृपादृष्टी राहील.
मुलांच्या एडमिशनमुळे कामात व्यस्त रहाल. कोणतीही नवी गुंतवणूक करण्याआधी चांगल्या प्रकारे पडताळणी करा. नको त्याकामात वेळ जाण्याची शक्यता. भावनिक होणं तुमची सर्वात मोठी दुर्बळता आहे. त्यामुळे लक्ष ठेवा कोणी तुमचा विनाकारण फायदा घेऊ शकतं.
कामाच्या ठिकाणी काही जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील तसंच सावधानी राखणं तुमचं नुकसान करू शकणार नाही. तुमचे सिक्रेट बाहेर जाणार नाही याची काळजी घ्या. प्रायव्हेट नोकरीत ध्येय प्राप्त करण्याचा दबाव राहील. तुम्ही त्यात यशस्वी ही व्हाल.

सिंह राश‍ी (Leo)-

गेल्या काही काळापासून सुरू असलेली सर्व बेचौनी त्रासपासून सुटकारा मिळेल. जी कामं गेल्या काही काळापासून रखडली होती ती थोड्याश्या प्रयत्नांनी पूर्ण होतील. कोणत्या नातेवाईकांशी संबंधीत चांगली बातमी मिळाल्याने आनंद होईल. त्याचबरोबर घरातील मोठ्या लोकांचं सहकार्य घरातील वातावरण चांगलं ठेवेल.
घराची डागडूजी किंवा इतर काही रिनोव्हेशन वगैरे सुरू असेल तर बराचसा खर्च वाढू शकतो. वाईट नियतींच्या लोकांपासून दूर रहा. वाईट सवयी असलेल्या लोकांपासून दूर रहा. तुमची मानहानी किंवा अपमान होवू शकतो. कोर्टाचे काही काम सुरू असेल तर सध्या ते थांबवा.
व्यवसायातील प्रतिस्पर्धेत तुमचा विजय निश्चित आहे. काही नुतनीकरण किंवा विस्तारा संबंधी योजना असतील तर त्यावर लक्ष केंद्रीत करा. त्यात उच्च अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभेल. नोकरीत नवे योग आणि नव्या संधी मिळतील.

कन्या राश‍ी (Virgo)-

गेल्या काही काळापासून ज्याकामात अनेक विघ्न आणि बाधा येत होत्या आता ती कामं होतील. राजकीय आणि सामजिक कामचा व्याप वाढेल. नवे महत्वपूर्ण संबंध होतील. लांबत चाललेल्या योजना पूर्ण करण्याचा योग्य वेळ. मुलांच्या कामात तुमचं योगदान महत्वपूर्ण राहील.
सामाजिक कामांसोबत कौटुंबिक मुद्द्यांवर लक्ष देणं आवश्यक आहे. घरातील कामं रखडल्याने टेंशन येण्याची शक्यता. यावेळी कोणताही प्रवास करणं स्वास्थ्यांच्या दृष्टीने अनुकूल नाही. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरून आणि व्यर्थ कामात लक्ष देण्यापेक्षा अभ्यासात लक्ष द्या.
तरूणांनी आपल्या करिअर मध्ये लवकर यशस्वी होण्यासाठी कोणताही चुकीचा मार्ग निवडू नये. कामाच्या ठिकाणी कर्माचारी आणि सहकाऱ्यांच्या कामाला दुर्लक्षित करू नका. त्याच्या एखाद्या वागण्याने तुम्हाला कमी पणा येऊ शकतो. गुंतवणूकी संबधी कामात कोणतेही निर्णय घेण्याआधी त्यावर विचार करा.

तूळ राश‍ी (Libra)-

भविष्यातील योजनां आमलात आणण्याची योग्य वेळ. काही रखडलेली कामं पुन्हा होतील. महत्वपूर्ण लोकांसोबत वेळ घालवून तुमच्या व्यक्तीत्वात सकारात्मक बदल होतील. कोणत्याही महत्वपूर्ण व्यक्तीला मदत केल्याने आनंद मिळेल.
आठवड्याच्या शेवटाला परिस्थिती प्रतिकूल असेल. भाडेकरुच्या बाबतीतल विवादाची स्थिती निर्माण होऊ शकते. क्रोध आणि रागाला तुमच्यावर नियंत्रण घेवू देऊ नका. चांगली चाललेली कामं बिघडतील. कोणत्याही जवळच्या व्यक्तींच्या संबंधी अप्रिय घटना घडल्याने मन व्यथित राहील.
व्यवसाय वाढविण्यासाठी कोणासोबत पार्टनरशीप करत असाल तर ते फायदेशीर ठरेल. व्यवसाय आणि नोकरी संबंधित कोणत्याही कामाचा निर्णय स्वत: च घ्या. कामाच्या क्वलिटी मध्ये कमतरता असणं तुम्हाला त्रासदायक पडू शकतं. बॉस आणि अधिकाऱ्यांची नाराजगी सहन करावी लागू शकते.

वृश्चिक राश‍ी (Scorpio)-

अचानक कोणत्यातरी मित्रांशी भेट तसंच नातेवाईकांशी भेट रोजच्या तणावाच्या वातावरणातून आनंद देईल. नव ऊर्जा मिळेल. ज्या शुभ बातमीची तुम्ही वाट बघत होता ती तुम्हाला मिळेल. कुटूंबातील समस्यांना दूर करण्यासाठी तुमची मेहनत कामाला येईल.
काही नकारात्मक प्रवृत्तीचे लोक तुमच्यासाठी त्रासदायक वातावरण निर्माण करू शकतात. तुम्ही त्याचं ध्येय पूर्ण होऊ देणार नाही. खर्च अधिक असेल. ज्यामुळे महत्वपूर्ण कामं थांबू शकतात. तणावात आणि चिंतेत वेळ घालविण्या व्यतिरिक्त धैर्य आणि संयमाने वेळ घालवा.

धनु राश‍ी (Sagittarius)-

हा आठवडा सुखात जाईल. गडबडीच्या आयुष्यातून थोडा विळ निवांत मिळेल. कोणत्याही महत्वाच्या कामात झोकून देऊन काम करा. त्याने तुम्हाला त्याकामात यश नक्की मिळेल. विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यू किंवा संमेलनात महत्वपूर्ण संधी मिळतील. एकूणच वेळ अनुकूल आहे. त्याचा सदुपयोग करा.
फायानान्स संबंधी कामं आठवड्याच्या सुरूवातीलाच करून टाका. नंतर परिस्थिती प्रतिकूल असू शकते. शेजाऱ्यांसोबत भाडण तांटा होण्याची स्थिती उद्भवू शकते. फालतू गोष्टीत वेळ वाया घालवू नका. तुमच्या कामालाच महत्व द्या.
व्यवसायात एका नंतर एक टेंशन सुरू राहतील. तुम्ही तुमचं धैर्य आणि आत्मबल कायम ठेवा. समस्यांचं समाधान नक्की मिळेल. कामामुळे प्रवास होईल जो लाभदायक आहे. ऑफिस मध्ये सुरू असलेलं टेंशन कमी होईल.

मकर राश‍ी (Capricorn)-

जे काम करायचं ठरावाल ते काम पूर्ण झाल्यावरच शांत बसाल. तुमचे राजकीय संबंध अधिक मजबूत बनवा. महत्वपूर्ण संधी तुमची वाट पाहत आहेत. यावेळी ग्रह ग्रोचर तुमच्या बाजूने आहे. कोणत्याही जवळच्या नातेवाईकांसोबत महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा विचार होऊ शकतो.
राजकीय कामात तुमची प्रतिमा खराब होणार नाही याची काळजी घ्या. नकारात्मक वृत्तीच्या लोकांपासून दूर रहा. कोणाची मदत करण्याआधी तुमच्या बजेटकडे लक्ष द्या. तुमच्या स्वभावात स्वार्थीपण आणा.
व्यवसायात विस्तारा संबंधी ज्या योजान आखल्या गेल्या आहेत त्याचा एकदा पुनर्विचार करा. कसी मोठी ऑर्डर किंवा डील मिळेल याकडे लक्ष द्या. कोणत्याच व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका. शेअर मंदी अशात विचार पूर्वक पैसे गुंतवा. ऑफिसचे वातावरण शांततेच रहील.

कुंभ राश‍ी (Aquarius)-

काही वेळ तुमची आवड आणि मनाप्रमाणे कामात लावला तर तुमचा कामतील उत्साह वाढेल. गेल्या काही काळापासून ज्या दीर्घकालीन योजना होत होत्या त्या पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आहे. आध्यात्मिक आणि सामाजिक कामात वेळ जाईल. घरातील वृद्धांची काळजी घेण्यात वेळ जाईल.
मुलांच्या समस्यांमुळे थोडी चिंता असेल. शांतपणे त्यांच्या समस्या सोडवा. काही लोक तुमच्या मागे काहीतरी कटकारस्थाना करत आहेत. अनोळखी व्यक्ती व्हिडिओ दुर्लिक्षित करू नका. आर्थिक संकंट ही येतील.
व्यवसायात जे बदल केले आहेत त्याचे योग्य परिणाम मिळतील. लवकरच तुम्ही तुमचं ध्येय गाठू शकता. चांगल्या ऑर्डर मिळतील. रागावर आणि घाई करण्यावर नियंत्रण ठेवा. होत आलेली कामं शेवटच्या टप्प्यात रखडू शकतात.

मीन राश‍ी (Pisces) –

ग्रह गोचर आणि भाग्य तुमच्या बाजूने काम करत आहे. तुमच्या कोणत्याही समस्येचे समाधान मिळविण्यासाठी वेळ योग्य आहे. प्रयत्न करत रहा. युवा वर्गाला कोणतीही महत्वपूर्ण संधी मिळाल्याने आनंदी रहाल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल.
तुमच्या भावना आणि उदारपणाचा चुकीचा फायदा घेतला जाऊ शकतो. म्हणून कोणत्याही व्यक्तिसोबत संपर्क करताना विचार करा. महत्वाची वस्तू न मिळाल्याने टेंशन राहील. दुसऱ्यांच्या कामात लक्ष देण्यापेक्षा आपल्या कामात लक्ष द्या.
जमीनाच्या तसंत वाहनां संबंधित व्यावसायिक कामात सुधार होईल. पार्टनरशीप करण्यासाठी योग्य वेळ नाही. उच्च अधिकाऱ्यांसोबत संबंध खराब होण्याची शक्यता.

 

(टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…)