Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थी यावर्षी मंगळवार, 19 सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी शुभ योग तयार होणार असून याचा शुभ प्रभाव चार राशींवर होणार आहे. या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो तसेच अनेक समस्या ही दूर होतील. १९ सप्टेंबर रोजी स्वाती नक्षत्र प्रथम ध्वजा आणि नंतर विशाखा नक्षत्र आल्याने श्रीवत्स नावाचे दोन शुभ योग तयार होत आहेत. वैधृती नावाचा आणखी एक योगही या दिवशी असणार आहे. जो स्थिर कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो.
मकर राशीच्या लोकांवर ही गणेशाची कृपा होणार आहे. येत्या 10 दिवसात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मान-सन्मानही वाढणार आहे. काही समस्या दूर होतील. वेळ अनुकूल राहणार आहे.
गणेश चतुर्थीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांवर श्री गणेशाची कृपा पाहायला मिळणार आहे. ज्यामुळे त्यांना आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच प्रलंबित कामे ही मार्गी लागू शकतात. मुलांकडूनही पालकांना चांगली बातमी मिळू शकते. गुंतवणुकीसाठी हा चांगला दिवस आहे.
सिंह राशीचा स्वामी सूर्यदेव आहे. या राशीलाही गणपती बाप्पाची साथ लाभणार आहे. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित प्रकरणे त्यांच्या बाजूने येऊ शकतात. नोकरीत टार्गेट पूर्ण झाले तर वरिष्ठ त्यांच्यावर खूश होतील आणि त्यांना अपेक्षित वेतनवाढ आणि पदोन्नतीही मिळू शकेल.
मिथून राशीच्या लोकांना देखील याचा फायदा होणार आहे. व्यवसायात भरभराटी येणार आहे. नोकरीतही अपेक्षित बढती मिळू शकते. आधी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो. आरोग्यही चांगले राहील.
(वरील माहिती ही सामान्य माहितीच्या आधारे देण्यात आली असून टीव्ही ९ मिडिया याची पुष्टी करत नाही.)