Gemini/Cancer Rashifal Today 22 July 2021 | घरातील वृद्ध व्यक्तीच्या आरोग्याबद्दल चिंता असेल,  कौटुंबिक बाबींवरून पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतात

| Updated on: Jul 27, 2021 | 12:47 AM

कोणत्याही राजकीय आणि अनुभवी व्यक्तीचा सल्ला व मदत तुमच्या व्यवसायाला नवी दिशा देईल. आर्थिक परिस्थिती सामान्य राहील.

Gemini/Cancer Rashifal Today 22 July 2021 | घरातील वृद्ध व्यक्तीच्या आरोग्याबद्दल चिंता असेल,  कौटुंबिक बाबींवरून पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतात
Gemini_Cancer
Follow us on

डॉ. अजय भाम्बी –

मुंबई : मंगळवार 27 जुलै 2021 (Gemini/Cancer Rashifal). मंगळवारचा दिवस हा सर्वांचे आराध्य दैवत गणपतीला समर्पित असतो. मंगळवारी गणपती बाप्पाची विधीवत पूजा केल्याने तो प्रसन्न होतो. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. बाप्पाची कुणावर कृपा असेल. मिथुन आणि कर्क राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरुन त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या मंगळवारचं संपूर्ण राशीभविष्य (Gemini/Cancer Daily Horoscope Of 22 July 2021 Mithun And Karka Rashifal Today)-

मिथुन राशी (Gemini), 27 जुलै

कोणत्याही समाजसेवी संस्थेमध्ये आपले विशेष योगदान आपला आदर वाढवेल. तुमची वैयक्तिक कामे देखील मोठ्या प्रमाणावर सहजतेने पूर्ण करू शकाल. तुमच्या कोणत्याही अडचणीत मित्रांची योग्य मदतही मिळेल. परंतु कधीकधी विचारांमध्ये अहंकारांमुळे कुटुंबातील सदस्य अस्वस्थ राहू शकतात. तुमच्यातील उणीवांवर मात करा. घरातील वृद्ध व्यक्तीच्या आरोग्याबद्दल चिंता असेल.

वैयक्तिक व्यस्ततेमुळे कामाच्या ठिकाणी जास्त लक्ष देऊ शकणार नाही. कर्मचाऱ्यांचे सहकार्य योग्य व्यवस्था राखण्यास मदत करेल. प्रभावशाली व्यक्तीच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला व्यवसायाशी संबंधित एक नवीन दिशा देखील मिळू शकते.

प्रेमसंबंध – कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. कौटुंबिक बाबींवरून पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतात.

खबरदारी – पावसाळ्यामुळे अ‍ॅलर्जी आणि इन्फेक्शनसारखे प्रश्न असतील. आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्या.

लकी रंग – निळा
लकी अक्षर – ब
लकी क्रमांक – 3

कर्क राशी (Cancer), 27 जुलै

थोडा वेळ अनुभवी आणि ज्येष्ठ सदस्यांसोबत घालवा. त्यांच्या अनुभवांपासून धडा घेऊन तुम्हाला तुमच्या जीवनातील काही सकारात्मक बाबींची जाणीव होईल. आज घरी कोणता तरी धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो.

किरकोळ आरोग्याच्या समस्यांमुळे, आपली काही कामे अपूर्ण राहू शकतात. परंतु जास्त ताण घेऊ नका. सकारात्मक राहण्यासाठी चांगले साहित्य वाचा तसेच चांगल्या लोकांशी संपर्क साधण्याचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

कोणत्याही राजकीय आणि अनुभवी व्यक्तीचा सल्ला व मदत तुमच्या व्यवसायाला नवी दिशा देईल. आर्थिक परिस्थिती सामान्य राहील. कोणती तरी मशिनरी खराब झाल्यामुळे मोठा खर्च होऊ शकतो. सरकारी नोकरदारांवर अतिरिक्त कामाचा ताण असेल.

प्रेमसंबंध – घराच्या संगोपनात पती-पत्नी दोघांचेही सहकार्य वातावरण चांगले ठेवेल. प्रेम संबंधांमध्येही जवळीक असेल.

खबरदारी – आरोग्याबाबत अजिबात बेफिकीर राहू नका. त्वचेसंबंधी अ‍ॅलर्जीचा त्रास होऊ शकतो.

लकी रंग – लाल
लकी अक्षर – व
लकी क्रमांक – 6

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…