मुंबई : गुरुवार 24 जून 2021 आहे (Gemini/ Cancer Rashifal). गुरुवारचा दिवस हा जगाचे पालनहार भगवान नारायण यांना समर्पित असतो. गुरुवारी भगवान विष्णूंची विधीवत पूजा केल्याने ते प्रसन्न होतात. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. नारायणाची कुणावर कृपा असेल. मिथुन आणि कर्क राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या गुरुवारचं संपूर्ण राशीभविष्य (Gemini/Cancer Daily Horoscope Of 24 June 2021 Mithun And Karka Rashifal Today) –
शांततेत वेळ घालवाल. काही काळापासून जवळच्या नातेवाईकासोबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. आपण आपले नवीन तंत्रज्ञान वापरण्यात यशस्वी व्हाल.
परंतु, आपली कार्यशैली आणि योजना कोणाबरोबर शेअर करु नका. काही चतुर लोक आपल्या योजनांचा लाभ घेतील. तरुणांना त्यांच्या अभ्यासामध्ये किंवा करिअरशी संबंधित कामात अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.
काही काळापासून व्यवसायात ज्या समस्या येत होत्या त्यावर आज तुम्ही मेहनत आणि क्षमतेने मात कराल. व्यस्तता राहील. परंतु आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाल्याने आनंद आणि आत्मविश्वासही वाढेल.
लव्ह फोकस – पती-पत्नी एकमेकांच्या भावना समजून घेतील आणि त्यांचा आदर करतील. घरातही उत्तम सामंजस्य राहील.
खबरदारी – स्वतःवर जास्त तणाव आणि कामाचा ताण घेऊ नका. आपल्या आवडीच्या कार्यात थोडा वेळ घालवा.
लकी रंग – गुलाबी
लकी अक्षर- जी
फ्रेंडली नंबर- 6
एखाद्या प्रिय मित्राशी भेट होईल आणि महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा होईल. सकारात्मक राहा आणि आपले कार्य करा. कारण योग्य वेळी केलेल्या कामाचेही योग्य निकाल मिळतील. आर्थिक स्थितीही चांगली होईल.
परंतु सावधगिरी बाळगा, अचानक काही अडचण समोर येईल. कामाच्या दबावामुळे तुम्हाला खूप अडकल्यासारखे वाटेल. आपल्या कार्यात अडथळा आणण्यासाठी काही लोक सक्रिय असतील. ही वेळ सावधगिरी बाळगण्याची आहे.
व्यवसायिक योजनांवर कृती करण्याची ही अनुकूल वेळ आहे. विश्वसनीय लोकांचे सहकार्यही कायम राहील. परंतु वेळेवर काम पूर्ण करणे देखील आपल्या क्षमतेवर अवलंबून असते.
लव्ह फोकस – वैवाहिक जीवन सुखी राहील. प्रियकर/प्रेयसीला भेटण्याची संधी मिळेल.
खबरदारी – रक्तदाब आणि मधुमेहाशी संबंधित तपासणी नियमितपणे करा. याकडे दुर्लक्ष करणे आरोग्यास हानिकारक ठरेल.
लकी रंग – केशरी
लकी अक्षर- ह
फ्रेंडली नंबर- 3
Zodiac Signs | अभ्यासात खूप हुशार असतात या 6 राशीचे मुलं, कुटुंबांचा मान वाढवतातhttps://t.co/LnbahTP7Qe#zodiacsigns #Children #Clever
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 23, 2021
Gemini/Cancer Daily Horoscope Of 24 June 2021 Mithun And Karka Rashifal Today
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :