Gemini/Cancer Rashifal Today 25 June 2021 | विद्यार्थ्यांना यश मिळेल, अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर विश्वास ठेवू नका

| Updated on: Jun 24, 2021 | 11:19 PM

मिथुन आणि कर्क राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल. (Gemini/Cancer Daily Horoscope Of 25 June 2021 Mithun And Karka Rashifal Today)

Gemini/Cancer Rashifal Today 25 June 2021 | विद्यार्थ्यांना यश मिळेल, अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर विश्वास ठेवू नका
Gemini_Cancer
Follow us on

डॉ. अजय भाम्बी –

मुंबई : आज शुक्रवार 25 जून 2021 (Gemini/Cancer Rashifal). हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. मिथुन आणि कर्क राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या शुक्रवारचं संपूर्ण राशीभविष्य (Gemini/Cancer Daily Horoscope Of 25 June 2021 Mithun And Karka Rashifal Today) –

मिथुन राश‍ी (Gemini), 25 जून

धार्मिक प्रवृत्तीच्या एखाद्या व्यक्तीस भेटल्यामुळे विचारात सकारात्मक बदल होतील. एखादा इंटरव्ह्यू किंवा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना यश मिळेल.

मित्रांसह प्रवासात आपला वेळ वाया घालवू नका. आपली महत्त्वपूर्ण कागदपत्रे आपल्याकडे ठेवा. कोणीही त्यांचा गैरवापर करू शकतो. मुलांबरोबरही थोडा वेळ घालवा, यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल.

कामाच्या ठिकाणी काही नवीन कार्य पद्धतीविषयक योजना तयार केल्या जातील. दैनंदिन उत्पन्नही वाढेल. नोकरी केलेल्या व्यक्तीने आपले कार्य अत्यंत काळजीपूर्वक करावे. एखादी चूक होण्याची शक्यता आहे.

❇️ लव्ह फोकस – वैवाहिक जीवन आनंदी राहील. प्रेम प्रकरणांना मान्यता मिळेल

❇️ खबरदारी – धोकादायक व्यक्तींपासून दूर रहा. जास्त गर्दी किंवा प्रदूषण असलेल्या ठिकाणी जाणे टाळा.

लकी रंग – हिरवा
लकी अक्षर – क
फ्रेंडली नंबर – 5

कर्क राश‍ी ( Cancer), 25 जून

आपल्या चुकांमधून काही ना काही शिकत कार्यपद्धतीत बदल करा. त्यामुळे तुम्ही उत्कृष्ट असल्याचे सिद्ध व्हाल. एखाद्या व्यक्तीशी अचानक भेट किंवा संभाषण केल्याने आनंदी वाटेल.

घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. काही काम अडकल्यामुळे तणाव वाढेल. एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही तयार केलेल्या धोरणांकडेच लक्ष द्या.

कामाच्या ठिकाणी खूप कष्ट करावे लागतील. प्रत्येक उपक्रमात तुमची उपस्थिती ठेवणे महत्वाचे आहे. काही महत्वाची माहिती पसरु शकते. त्यामुळे तुमच्या योजना गुप्त ठेवा.

❇️ लव्ह फोकस – कौटुंबिक वातावरण सुखी राहील. एखाद्या जुन्या मित्राशी भेट झाल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.

❇️ खबरदारी – उष्णतेमुळे अस्वस्थता आणि चक्कर येणे असे त्रास उद्भवतील. हलके अन्न घ्या आणि भरपूर पाणी प्या.

लकी रंग – क्रीम
लकी अक्षर – अ
फ्रेंडली नंबर – 4

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

(Gemini/Cancer Daily Horoscope Of 25 June 2021 Mithun And Karka Rashifal Today) –

संबंधित बातम्या : 

Zodiac Signs | अभ्यासात खूप हुशार असतात या 6 राशीचे मुलं, कुटुंबांचा मान वाढवतात

Zodiac Signs | ‘या’ 4 राशींच्या व्यक्तींकडे दुर्लक्ष केलेलं त्यांना मुळीच पटत नाही, नेहमी हवं असते अटेंशन