ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 11 October 2024) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
आजचा तुमचा दिवस आनंदाचा असणार आहे. तुमचे चांगले विचार सोसायटीत नवीन ओळख निर्माण करून देण्यात उपयोगी ठरतील. आज तुम्ही घरात डेकोरेशनचं काम करू शकता. कंत्राटदारांना आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या लाभाचा आहे. वातावरणातील बदलामुळे तुमच्यातील अस्वस्थपणा वाढेल. भरपूर पाणी प्या. आज तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये बदल करा. एखादं काम करण्याची नवी पद्धत शोधल्याने तुम्हाला फायदा होणार आहे.
आजचा दिवस उत्तम राहणार आहे. एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही त्रस्त असाल. कुटुंबासोबत बाहेर सिनेमा पाहायला जाण्याची शक्यता आहे. मित्रांच्या बर्थडे पार्टीला जाऊ शकता. इतर मित्रांसोबत एन्जॉय करण्याची संधी मिळेल. नवीन स्किल शिकाल. त्याचा भविष्यात लाभ होणार आहे. मार्केटमध्ये लॉन्च झालेली नवीन कार तुम्ही खरेदी करण्याचा विचार कराल. आज आर्थिक गोष्टींसाठी एखाद्या एक्सपर्टचा सल्ला घ्या.
तुमचा आजचा दिवस संमिश्र राहील. एकाग्र मनाने काम केल्याने ते फलदायी ठरणार आहे. कपल्ससाठी आजचा दिवस अत्यंत चांगला जाणार आहे. एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊ शकता. एखाद्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करू नका. तुमचं आरोग्य चांगलं राहील. कमीत कमी वेळात कामं आटोपून घेण्याचा प्रयत्न करा. नोकरदारांना अधिकाऱ्यांकडून मदत होणार आहे. रिअल इस्टेटचं काम करणारे आज नव्या हाऊसिंग प्रकल्पाचं लॉन्चिंग करतील.
तुमचा दिवस पूर्वीपेक्षा चांगला राहणार आहे. तुम्ही कुटुंबीयांसोबत वेळ घालवाल. जीवनसाथीसोबत तुमचा चांगला संवाद होईल. त्यामुळे नात्यात घट्टपणा येईल. मित्रांसोबत घरीच सिनेमा पाहण्याचा प्लानिंग कराल. आज एका अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिशी भेट होईल. त्याचा तुम्हाला भावी आयुष्यात मोठा फायदा होणार आहे. एखाद्या खास कामात फायदा होणार आहे. गावाला जाण्याचा योग आहे. पण दूरचा प्रवास टाळा.
आज तुमच्या दिवसाची सुरुवात अनुकूल होणार आहे. एखाद्या बिझनेस ट्रिपला जात असाल तर घरच्यांचा आशीर्वाद घेऊन जा. आज तुमचं काम यशस्वी होणार आहे. आज तुमच्या जीवनसाथीला प्रगती करण्याची संधी मिळणार आहे. कुरिअरचा व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला फायदा होणार आहे. तुमची मेहनत आणि कर्तव्यदक्षता पाहून तुमचे ज्युनिअरही आवाक होतील. कोर्ट कचेरीची कामे मार्गी लागतील. राजकारणात असणाऱ्यांना आज नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
तुमचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. बिझनेसमध्ये मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचे शत्रू तुमच्यापासून अंतर ठेवून राहतील. लाकडाचा व्यापार करणाऱ्यांना आज मोठा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. लेखक आज एखादी कथा लिहू शकतील. लोकांना त्यांची ही कथा आवडेलही. या राशीचे जे लोक पेंटिंग्जचे काम करतात, त्यांची पेंटिग्ज आज प्रदर्शनात लावली जाण्याची शक्यता आहे. घरात दु:खद घटना घडेल. आरोग्याची काळजी घ्या. सर्दी, पडसे होण्याची शक्यता आहे.
आज तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल. तुमच्या आईवडिलांची तुमच्यावरील नाराजी दूर होईल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस त्यांच्या बाजूचा राहील. महिलांसाठी आजचा दिवस अत्यंत चांगला राहील. बिझनेसमध्ये आज तुम्ही एखादी महत्त्वाची मिटिंग अटेंड करू शकता. एखाद्याकडून घेतलेल्या कर्जातून आज मुक्ती होईल. त्यामुळे तुमचं मोठं टेन्शन दूर होणार आहे. आज तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी फिरायला जाऊ शकता. एकंदरीत तुमचा दिवस चांगला राहणार आहे.
आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत चांगला राहणार आहे. तुमच्या आधीपासून सुरू असलेल्या समस्या आता मार्गी लागणार आहे. त्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. कुटुंबात धार्मिक कार्याची योजना आखाल. तुम्हाला चांगलं आरोग्य हवं असेल तर आतापासूनच डाएट सुरू करा. तुमच्या वागण्या बोलण्यात बदल होईल. तुम्हाला नवीन मित्र मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला दुसऱ्यांना मदत करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे तुमचा फायदाच होणार आहे.
आजचा तुमचा दिवस संमिश्र असेल. लवकरच अमेरिकेला जाण्याची संधी मिळणार आहे. तुमचं सर्व ध्यान काम पूर्ण करण्यावर असेल. नशीबाची साथ मिळणार नाही. ऑफिसातील एखाद्या कामाबाबत विचारविमर्श करावा लागेल. शत्रूपक्ष तुमच्या योजनांमुळे प्रभावित होतील. मोठ्या कंपनीत काम करणाऱ्या या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत खास असा आहे. आयुष्यात चालणाऱ्या सर्व अडचणी आता दूर होणार आहेत. या राशीच्या गृहिणी स्वत:चा व्यवसाय सुरू करतील. त्यांच्यासाठी आज चांगला योग बनत आहे.
तुमचा दिवस आज बरा राहील. व्यवसायात आज तुम्हाला नव्या संधी मिळतील. तुम्हाला प्रगतीच्या दिशेने नेणारा हा दिवस आहे. उधार दिलेले पैसे अचानक मिळतील. व्यापारात एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. भावा-बहिणीकडून तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळणार आहे. घरात एखादं फंक्शन असल्याने तुमच्या शेड्यूलमध्ये बदल होईल. आधीच सुरू केलेले काम आज पूर्ण होतील. धन लाभाचे नवीन मार्ग मिळतील. रणरणत्या उन्हात जाऊ नका. नाही तर त्याचा तब्येतीवर परिणाम होईल.
आजचा दिवस तुम्हाला अनुकूल राहणार आहे. तुमच्या योजनेनुसार सर्व कामे झाल्याने तुम्हाला प्रसन्न वाटेल. सामाजिक कार्यात तुमची रुची वाढेल. तुम्हाला तुमच्या जीवनसाथीकडून कामात पूर्ण सहकार्य मिळेल. व्यापारातील भागिदारीमुळे तुम्हाला फायदा होणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबतच्या संबंधात सुधारणा होईल. त्यामुळे तुमच्या नात्यातील मधुरता कायम राहणार आहे. मुलांकडून सुख मिळेल. एखादी गोपनीय गोष्ट तुम्हाला माहिती पडणार आहे. मित्रांसोबत वेळ घालवाल.
आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. फोनचा वापर कमीत कमी करा. पैशाच्या व्यवहारात लोकांवर नको तेवढा विश्वास टाकू नका. कुणालाही उधारीवर पैसे देताना विचारपूर्वकच निर्णय घ्या. जीवनसाथीसोबत एखाद्या धार्मिक ठिकाणी जाण्याची शक्यता आहे. घरी आज भरपूर पाहुणे येतील. अविवाहितांच्या लग्नाचा योग जुळून येईल. गृहिणींना आजचा दिवस त्रासाचा जाणार आहे. नोकरदार महिलांना प्रवासाची दगदग होईल. घरात कोणतीही समस्या असेल तर त्यावर तातडीने उपाय शोधा.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)