ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 12th August 2024) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच शुभ आहे. तुम्हाला लोकांचा आदर आणि सन्मान मिळेल. नोकरदारांनो तुमच्या कामामुळे तुमचे बॉस तुमच्यावर खूप खुश होतील आणि तुम्हाला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही घर, गाडी किंवा इतर काही संपत्ती खरेदी करण्याचा विचार करू शकता. तुमचे जे काम बऱ्याच दिवसांपासून अडकले होते, ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तुम्ही ते पैसे परत करण्यास सक्षम व्हाल. तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाणार आहात.
आजचा दिवस नोकरी शोधणाऱ्या लोकांसाठी चांगला जाणार आहे. कार्यक्षेत्रात त्यांना काही मोठी उपलब्धी मिळू शकते. आई-वडिलांची सेवा करण्यासाठी तुम्ही तत्पर असाल. तुम्हाला काही शारीरिक त्रास होत असली तरी, तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाणार आहात. तुमचे वडील जर तुम्हाला काही सल्ला देतील, तर तुम्ही त्यावर नक्कीच अंमल करा. तुम्हाला तुमच्या कामांमध्ये समजूतदारपणा दाखवावा लागेल, नाहीतर कार्यक्षेत्रात काही चूक होण्याची शक्यता आहे.
आज तुमच्या व्यवसायात काही चांगली बातमी येण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मागील अनुभवांपेक्षा वेगळे काहीतरी करण्याची संधी मिळेल. जर तुम्ही परदेशात व्यापार करत असाल, तर आज तुमची मोठी डील होऊ शकते. जर तुम्ही सरकारच्या कोणत्याही योजनात पैसा गुंतवला असेल तर तुम्हाला चांगला नफा होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबावर जास्त लक्ष द्याल. जर तुम्ही कुटुंबात काही गोष्टींवर चिंता करत असाल तर ती निरर्थक ठरेल. तुम्ही इतरांचे बोलणे ऐकून त्यावर विश्वास ठेवू नका.
आजचा दिवस तुमच्यासाठी सुखकर असणार आहे. तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ मिळेल, कारण तुम्ही ज्याही कामात हात घालाल त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळेल. परंतु तुमच्या एखाद्या सहकाऱ्याशी मतभेद होऊ शकतात आणि तुम्हाला तुमच्या एखाद्या विरोधकाच्या बोलण्यात येण्यापासून सावध राहावे लागेल. तुम्हाला दूर राहणाऱ्या एखाद्या नातेवाइकाची आठवण येऊ शकते. तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी काही गुंतवणूक करावी लागेल. संतान पक्षाकडून तुम्हाला काही निराशाजनक बातमी ऐकायला मिळू शकते.
आजचा दिवस तुमच्यासाठी एक मोठी उपलब्धी घेऊन येणार आहे. तुमचे शत्रू प्रबळ असतील. व्यवसायात तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागेल आणि मुलांनाही तुम्ही काही जबाबदारी द्याल, तर ते त्याचं सोनं करतील. जीवनसाथी तुमच्याशी एखाद्या गोष्टींवर नाराज होऊ शकते. त्यामुळे पत्नीचा तुम्हाला समजतू काढावी लागेल. अविवाहित व्यक्तींना आज गोड बातमी मिळेल. आज त्यांचा जोडीदाराचा शोध संपेल. सामाजिक क्षेत्रात कार्यरत लोकांना काही पुरस्कार मिळू शकतो.
आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी ठरणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे, कारण तुमच्या स्थगित झालेल्या योजनांना पुन्हा सुरुवात करण्याची शक्यता आहे. मात्र, कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या तब्येतीची चिंता तुम्हाला सतत सतावेल. यासाठी तुम्हाला धावपळही करावी लागू शकते. कुटुंबात मंगल कार्य असल्याने उत्साही वातावरण असेल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संभावना आहे. नोकरीत काम करणाऱ्यांना आपले काम पूर्ण करण्यासाठी सहकाऱ्यांची मदत घ्यावी लागू शकते.
आज तुमच्याकडे पैसे येण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या मुलांच्या कामाबद्दल आनंदी व्हाल. तुमचा जोडीदार तुमच्यासोबत खूप छान राहील. काही गोष्टींमुळे तुम्हाला काही समस्या येऊ शकतात, पण तुमचे बंधूभगिनी तुम्हाला मदत करतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू इच्छित असाल तर आजचा दिवस चांगला आहे. गावाकडे जाण्याचा योग आहे. कोर्टकचेरीच्या कामातून मुक्त व्हाल.
आजचा दिवस तुमच्यासाठी भरपूर ऊर्जा देणारा असेल. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन लागेल आणि इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करणार नाहीत. सासूरवाडीतून पाहुणे येण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळाल्याने ते खूप आनंदी होतील. आज घर शांत राहील, म्हणून तुम्ही कोणत्याही गोष्टीचे वचन देण्याआधी विचार करा. धार्मिक कार्यात भाग घ्याल. दूरचा प्रवास घडेल. अविवाहितांच्या आयुष्यात आज मोठी घटना घडणार आहे. आज त्यांचे विवाहाचे योग जुळून येतील.
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगलाही असेल आणि थोडा खराबही. तुम्हाला पैशांची चिंता वाटेल आणि तुमच्या भाऊ-बहिणींशी वाद होऊ शकतात. पण मोठे लोक तुमची मदत करतील. तुमच्या जोडीदाराला कामात यश मिळेल. गाडी चालवताना सावध रहा, नाहीतर खर्च वाढू शकतात. कोणाकडून पैसे उधार घेऊ नका. व्यवसायात नवीन मशीनरी खरेदी कराल. वाहन खरेदी करण्याचा योग आहे.
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही बरेच दिवसांपासून जे काम करायचे होते ते पूर्ण होईल. घरातली समस्या सुटतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन काम मिळू शकते. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागेल. तुम्हाला तुमचा जुना मित्र भेटेल. पैशांची गुंतवणूक करायची असेल तर कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. सासूबाईच्या घरातून तुम्हाला पैसा मिळण्याची शक्यता आहे.
आजचा दिवस तुमच्यासाठी चढउतारांनी भरलेला राहणार आहे. तुमच्या कामात काही गोंधळ होत असेल तर तुम्हाला तो दूर करण्याची गरज आहे. नोकरीत काम करणाऱ्या लोकांनी कोणत्याही राजकारणात पडण्यापासून दूर राहावे. तुम्हाला तुमच्या भाऊ-बहिणींचा पूर्ण साथ मिळेल. परस्पर सहकार्याची भावना तुमच्या मनात राहील. कोणत्याही गोष्ट कोणालाही सांगण्यापूर्वी तुम्ही विचार करावा. कुटुंबातील प्रश्न तुम्ही एकत्र बसून सोडवाल तर तुमच्यासाठी चांगले राहील.
आजचा दिवस तुमच्यासाठी शुभदायी ठरणार आहे. नवीन लोकांसोबत मैत्री करण्यात तुम्हाला यश मिळेल, विशेषत: सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांसोबत. विद्यार्थी मित्रांना एखाद्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळू शकते. तुमच्या कामात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत कुठे तरी फिरायला जाण्याचा तुमचा प्लान यशस्वी होईल. जर तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या नात्यात काही मतभेद असतील तर तुम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न कराल. तुमचे पालक जे काही सल्ले देतील, त्यांच्याकडे लक्ष देणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)