ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 18th September 2024) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
आजच्या दिवशी देवाणघेवाण करताना सावध राहा. तुम्ही तुमच्या कामासाठी अत्यंत मेहनत कराल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत खटपट झाल्याने तुम्ही त्रस्त व्हाल. जीवनसाथीला एखाद्या प्रकरणातून मोठा दिलासा मिळेल. तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा. वाढत्या खर्चावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करा. आईवडिलांचं सहकार्य आणि भरपूर साथ मिळेल.
तुमच्यासाठी आजचा दिवस अत्यंत सामान्य राहणार आहे. तुमच्यावर नवीन जबाबदारी येईल. अविवाहितांच्या आयुष्यात एखाद्या नवीन व्यक्तीचं आगमन होईल. नोकरीच्या ठिकाणी कामाबाबत काही अडचणी असतील तर आज बॉसशी बोलून घ्या. आज तुमचं मन कामात लागणार नाही. त्यामुळे तुमची असंख्य कामे पेंडिंग राहतील. तंत्रज्ञानाशी संबंधित लोकांना आज या क्षेत्रात काही लाभ मिळण्याची शक्यता आहे.
आजच्या दिवशी विचारपूर्वकच कामे करा. नोकरी पेशातील लोकांना एखाद्या योजनेवर काम करता येईल. राजकारणात असलेल्या लोकांना एखादं नवं पद मिळेल. तुमच्या पद प्रतिष्ठेत वाढ होईल. कौटुंबिक जीवनात आनंद वाढले. नोकरीच्या ठिकाणी काही सहकारी तुमच्याविरोधात राजकारण करतील, त्यांच्यापासून सावध राहा. तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न होईल. उधळ्या स्वभावामुळे तुम्ही आज वाजवीपेक्षा अधिक खर्च कराल.
आजचा दिवस तुमच्यासाठी गोंधळाचा असणार आहे. तुमची प्रकृती नरम गरम राहील. तुमची महत्त्वाची कामे वेळेत मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. तुमचं एखादं काम दीर्घकाळापासून थांबलेलं असेल तर ते लगेच मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक व्यवसायात तणाव असेल. तुमच्या मनात एखादी समस्या राहील. मार्केटिंगशी संबंधित लोकांना थोडं सावध राहावं लागेल. तुमची एखादी चूक कुटुंबातील सदस्यांच्या समोर येऊ शकते.
आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र फलदायी असा आहे. तुमचा आनंदही वाढेल आणि एखाद्या कामामुळे तुम्ही त्रस्तही असाल. एखादं घर, दुकान खरेदी करण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होईल. कुटुंबात खटपट होईल. त्यामुळे दुरावा वाढणार आहे. तुमचा व्यवसाय पहिल्या दिवसापासूनच वाढेल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळणार आहे. तुमचे अधिकारी तुम्हाला कामात साथ देतील. करिअरमध्ये तुम्हाला नवीन संधी मिळेल.
जोखमीच्या कामापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या दीर्घकालीन योजनांना गती मिळेल. कार्यक्षेत्रात तुम्ही चांगली कामगिरी कराल. प्रेमात पडलेल्यांना विवाहाचा प्रस्ताव येईल. तुमची कौटुंबीक समस्या चर्चा करून दूर करा. नाही तर नात्यात तणाव वाढेल. एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. रोजगाराच्या शोधात असलेल्यांना आज चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे.
आजचा दिवस पद प्रतिष्ठा वाढवणारा आहे. जीवनसाथीचं सहकार्य आणि सहवास मिळेल. कार्यक्षेत्रात तुमचा बॉस तुमच्या कामावर खूश असेल. प्रमोशन मिळाल्याने तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागेल. तुम्ही तुमचं काम पूर्ण करण्यासाठी एखादी नवीन ट्रिक वापरू शकता. एखादं कायदेशीर प्रकरण तुम्हाला त्रासदायक ठरेल. पण त्यातून मार्ग काढण्यासाठी बसून चर्चा करा.
आजच्या दिवसात तुम्ही असंख्य परोपकारी कामे कराल. एखाद्या कामाबाबत तुम्हाला अत्यंत घाई करावी लागेल. आज तुम्हाला तुमच्या जुन्या चुकीचा पश्चात्ताप होईल. तुम्ही प्रगतीच्या मार्गावर पुढे जाल. नोकरी करणाऱ्यांना आज कामात अधिकारी वर्गाकडून मोठं सहकार्य मिळेल. तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आई वडिलांच्या आशीर्वादाने रखडलेली कामे मार्गी लागतील. गावाकडे जाण्याचा योग आहे.
आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य राहणार आहे. तुमच्या विरोधकांपासून सावध राहा. लोकांसोबत कमीत कमी मतलब ठेवा, हेच तुमच्यासाठी चांगलं राहील. तुमच्या जबाबदाऱ्या वाढल्याने तुमचं मन त्रस्त होईल. तुम्हाला एखाद्या कामानिमित्ताने अचानक दूरचा प्रवास करावा लागेल. तुमच्या व्यवसायात तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न होईल. मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लान कराल.
आजचा दिवस तुम्हाला लाभदायक राहणार आहे. कुणालाही पैसे उधार देवू नका. आज तुमचं मन इकडच्या तिकडच्या कामात राहील. भागिदारीत एखादी डील फायनल होऊ शकते. तुमची कामं उद्यावर ढकलू नका. तुमच्या आरोग्यात चढउतार होईल. त्यामुळे तुम्हाला तणाव येईल. तुम्ही एखाद्या दूरच्या प्रवासाला जाण्याचा प्लान करू शकता. कौटुंबिक समस्या चर्चेतून सोडवा. गावाला जाण्याचा योग आहे. कोर्टकचेरीच्या कामातून मुक्तता होईल.
आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत चांगला राहणार आहे. तुमच्या कामाबाबत उतावीळपणा दाखवू नका. तुमची जीभ आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा. तुमचा बिझनेस आधीपासून अधिक चांगला चालेल. त्यामुळे तुम्हाला आनंदच होईल. पण काही योजनेसाठी तुम्हाला पुढे जाण्याची गरज आहे. तुमचं एखादं अडलेलं काम आज मार्गी लागणार आहे. आर्थिक उत्पन्नात संतुलन ठेवा. तुमच्या मान सन्मानात वाढ होईल.
आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत खर्चिक ठरणार आहे. तुमची मुलं तुमच्याकडे एखाद्या गोष्टीची मागणी करू शकतात. त्यांना हवी ती गोष्ट नक्की द्या. वैवाहिक जीवनात आनंद राहील. तुम्हाला डोकेदुखी किंवा अंगदुखीचा त्रास होऊ शकतो. बऱ्याच काळानंतर एखाद्या मित्राची भेट होईल. तुमचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्याचा प्रयत्न करत असाल तर लवकर करा. आजचा दिवस शुभ आहे. नोकरीत मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)