ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 26th August 2024) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
आज महत्त्वाच्या लोकांशी भेटीगाठी होतील. जुन्या वादावर पडदा पडेल. तुमची मेहनत आणि हिंमतीमुळे कुटुंबातील एखादं काम मार्गी लागेल. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी मिळेल. काही वेळ आत्मचिंतनात घालवा. प्रचंड आत्मविश्वास तुमच्या अंगाशी येऊ शकतं. गुंतवणूक करताना पूर्ण माहिती घ्या. कुणाशीही चर्चा करताना नकारात्मक शब्द वापरू नका. नाही तर तुमचे संबंध बिघडतील.
काही समस्या राहतील, पण तुम्ही विचारपूर्वक त्या समस्यांवर मार्ग काढाल. ऑनलाइन शॉपिंगमधील घडामोडीत तुमचा वेळ जाईल. एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या घरी जाण्याचं निमंत्रण मिळेल. घरातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाची अवहेलना करू नका. एखाद्या अपरिचित व्यक्तीला व्यक्तिगत गोष्टी सांगू नका. पतीपत्नीमधील वाद दूर होतील. घरातील वातावरण चांगलं राहील. व्यवसाय उद्योगातील लोकांनी आज घाईत निर्णय घेऊ नका. तुमच्यासाठी ते नुकसानकारक ठरेल. गॅसचा त्रास जाणवेल. पातळ पदार्थांचं सेवन करा.
एखादं सरकारी प्रकरण अडकलेलं असेल तर आज मार्ग निघेल. गोंधळाच्या परिस्थिती अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. तुमच्यासाठी ते फायद्याचं ठरेल. योग्यवेळी आव्हानांचा सामना करणं योग्य ठरेल. निर्णय घेताना अधिक विचार करू नका. परिस्थितीनुसार कार्यप्रणालीत बदल करा. ऑफिसमध्ये महत्त्वाची जबाबदारी मिळेल. तुमच्या सामंजस्याने घरातील व्यवस्था मधूर ठेवा. दोस्तांसोबत गेट टुगेदर कराल. आरोग्याची काळजी घ्या. आळस घालवण्यासाठी पिकनिकला जाण्याचा प्लान कराल.
संपूर्ण दिवस बिझी राहाल. खास मित्रांची भेट होईल. त्यांच्याकडून महत्त्वाची बातमी मिळेल. तुमची योग्यता आणि क्षमता लोकांसमोर जाहीर करण्याची ही योग्यवेळ आहे. एखादी महत्त्वाची गोष्ट चोरी होईल. व्यवसायात चांगलं उत्पन्न होईल. एखादी महत्त्वाची डील होण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गाने सावध राहण्याची गरज आहे. कुटुंबात एकमेकांबद्दल गैरसमज होईल. पण काळाच्या ओघात हा गैरसमज दूर होईल. लव्ह अफेयर्सच्या प्रकरणात तुम्ही लकी राहाल. डोकेदुखी आणि ब्लड प्रेशरचा त्रास जाणवेल. काही वेळ आराम करण्यासाठी काढा.
तुमच्या व्यवस्थित कार्यप्रणालीमुळे एखादं खास कार्य होईल. तसेच विशिष्ट व्यक्तीचं सहकार्य मिळेल. तुमचं एखादं काम सफलतापूर्वक पूर्ण होणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. काही चुकीच्या प्रवृत्तीचे लोक तुमच्या कामात विघ्न आणतील. अशा लोकांपासून दूर राहा. उद्योग व्यवसाय बरा चालेल. नवीन उद्योग सुरू करण्याचा विचार कराल. उद्योगात नवं तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबिक जीवनात सर्व काही सुरळीत राहील. एखाद्या धार्मिक कार्यात भाग घ्याल.
नवीन संपर्क होतील. एखाद्या आदर्श व्यक्तीपासून प्रेरणा घ्याल. अडकलेलं काम मार्गी लागेल. संघर्षानंतर तुम्हाला यश मिळेल. घाईत आणि जोशात कोणताही निर्णय घेऊ नका. शुभचिंतकांनी दिलेला सल्ला अंमलात आणा. एखाद्या कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे निराश व्हाल. शांततापूर्ण निर्णय घ्या. दाम्पत्यांमध्ये जवळकी वाढेल. लव्ह मॅरेजसाठी घरातून होकार मिळेल. त्यामुळे एकदाचं गंगेत घोडं न्हाऊन निघेल. योगा आणि मेडिटेशनने दिवसाची सुरुवात करा. खाण्यापिण्यावर लक्ष द्या.
आज तुम्ही चांगले निर्णय घ्याल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आयुष्याबाबतच्या घेतलेल्या निर्णयाचं कौतुक होईल. मित्रांच्या संपर्कात राहिल्याने महत्त्वाची बातमी मिळेल. एखादी व्यावसायिक डील करताना विचार करूनच निर्णय घ्या. एखादी चूकही महागात पडू शकते. सरकारी सेवेतील लोकांना अतिरिक्त लाभ मिळेल. दाम्पत्य जीवन सुखद राहील. प्रेम-प्रेमिकांदरम्यान भावनिक नातं तुटण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या कुरबुरी जाणवतील. महिलांना आरोग्याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे.
तुमच्या मनासारख्या गोष्टी आज घडतील. घरातील वातावरण शिस्तबद्ध राहील. दुसऱ्यांची मदत करण्यात तुम्ही पुढाकार घ्याल. असं केल्याने तुम्हाला आनंद मिळेल. दुसऱ्यांच्या प्रकरणात हस्तक्षेप करू नका. एखाद्यासोबत वाद होण्याची शक्यता आहे. एखादा प्रवास करणार असाल तर काही उपयोग होणार नाही, ज्या कामासाठी जाल, ते होण्याची शक्यता नाही. त्यामुळे आज शक्य झाल्यास अनावश्यक खर्च टाळा. स्त्री वर्गाशी संबंधित व्यवसाय यशस्वी होईल. नोकरदार वर्गाचं आपल्या कार्यक्षेत्रात वर्चवस्व वाढेल. घरात आनंदी वातावरण राहील. प्रेम प्रसंगात परिस्थिती जैसे थे राहील.
तुम्ही उधार दिलेले पैसे तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. चर्चेतून प्रश्न मार्गी लागतात. आज तुम्ही चर्चेतून मार्ग काढण्यावर भर द्या.आळसामुळे अधिक विचार करणं टाळा. वैवाहिक संबंधातील गोडवा कायम राहील. छोट्यामोठ्या नकारात्मक गोष्टी दूर करा. प्रेमसंबंधात भावना प्रधान राहाल. योगा आणि मेडिटेशन करण्यावर भर द्या. सरकारी सेवेतील लोकांना आज फायदा होणार आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. गावाकडे जाण्याचा योग आहे. एखादं वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे.
एखाद्या मित्रामुळे आज अडतमीत याल. तुमच्या आयुष्याला आज नवा प्रारंभ होणार आहे. गावाकडे जाण्याचा योग आहे. नको त्या भानगडीत पडू नका. एखादं जुनं प्रकरण डोकंवर काढण्याची शक्यता आहे. जुगारापासून दूर राहा. व्यसनांपासून दूर राहा. समुद्र किनारी फिरायला जाल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. हाडं दुखण्याचा त्रास होईल. कौटुंबिक स्थिती चांगली असेल. आर्थिक ओढताण आता संपणार आहे. कुणाकडून पैसे उधार घेतले असतील तर ते देऊन टाका. नाही तर मोठ्या संकटात सापडाल. खोटं बोलण्याची सवय सोडा. नाही तर अडचणी येतील.
उत्पन्न जसं वाढेल तसा खर्चही वाढणार आहे. तुमचा बजेट व्यवस्थित ठेवा. दुसऱ्यांच्या व्यक्तिगत प्रकरणात हस्तक्षेप करू नका. नाही तर अडचणी होतील. व्यावसायिक कामात सुधारणा होईल. नोकरीत अतिरिक्त जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. प्रेमप्रकरणापासून दूर राहा. इतरांच्याही भानगडीत पडू नका. बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्यांना विदेशात जाण्याची संधी आहे. अवेळी जेवल्यामुळे पोट बिघडेल. त्यामुळे दिवसभर हैराण राहाल. आज तुमची एखादी महत्त्वाची गोष्ट हरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घ्या.
सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहा आणि सकारात्मक बना. आज अडलेली सर्व कामे मार्गी लागतील. एखाद्या कार्यक्रमाला जाण्याचं निमंत्रण मिळेल. वडिलोपार्जित मालमत्तेची प्रकरणं मार्गी लागतील. अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन घरात प्रवेश केल्याने मन प्रसन्न होईल. नवीन घर खरेदी करण्याचा विचार करा. एखादं वाहन खरेदी करण्याचा विचार कराल. वैवाहिक जीवनात खटके उडतील. पतीच्या त्रासामुळे प्रकृतीवर परिणाम होईल. नोकरदार महिलांसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल. रेल्वेतून प्रवास करताना काळजी घ्या.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)