ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 3 rd August 2024) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
तुमची प्रगती पाहून तुमचे शत्रू तुमच्यावर जळतील. पण खटपटी करूनही त्यांना तुमचं काहीच करता येणार नाही. कारण ते तुमच्या बाजूने असतील. आज तुम्ही दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाल. त्यामुळे तुमचा सामाजिक क्षेत्रात प्रभाव वाढेल. नोकरीत तुमच्यावर ताण असेल आणि तुम्हाला नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थी नवीन कोर्सला प्रवेश घेण्याची शक्यता आहे. मनपसंत ठिकाणी फिरायला जाण्याचा बेत आखाल.
आजचा दिवस शुभ राहणार आहे. आज तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदी दिवस घालवाल. तुम्हाला मनपसंत जेवणाचा आनंद घेता येईल. आज दुपारी तुम्हाला गुड न्यूज मिळू शकते. तुमच्या जीवनसाथीकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. एका अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री होईल. जोडीदारासोबत कडाक्याचं भांडण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सबुरीने घ्या.
आज तुमच्यावर लक्ष्मी नारायणाची कृपा होईल. आईवडिलांचे आशीर्वाद लाभतील. त्यामुळे तुमचा दिवस आनंदात जाईल. कार्यक्षेत्रात काही तरी नवीन करण्याची संधी मिळेल. नोकरीत वरिष्ठांच्या कृपेने तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला एखादी किमती वस्तू मिळण्याची शक्यता आहे. जीवनसाथीकडून लाभ आणि सहकार्य मिळेल. गावाला जाण्याचा योग आहे. वाहने जपून चालवा.
आज मनातील इच्छा पूर्ण होतील. आज तुमच्या मान सन्मान आणि पद प्रतिष्ठेत वृद्धी होईल. बँकेतून लोन घेण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला लोन मिळण्याची शक्यता आहे. आज तुमचे विरोधक शांत राहतील. ते शांत आहेत, म्हणून गाफिल राहू नका. काड्या करण्याचा त्यांचा स्वभाव सुरूच राहील. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. नाही तर भविष्यात मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या.
शेजाऱ्यासोबत वाद होण्याची शक्यता आहे. मात्र, वाद विनाकारण वाढवू नका. तुमच्या कष्टाचे आज तुम्हाला फळ मिळणार आहे. नोकरीत बढती मिळेल. संध्याकाळी मित्र घरी येतील. पिकनिकला जाण्याचा बेत आखाल. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. नाही तर पोटाशी संबंधित विकार जाणवतील. थंड ठिकाणी जाऊ नका, वाताचा त्रास होईल. व्यवसायात आज चांगला लाभ होईल. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कराल.
आज तुमच्यासाठी अत्यंत चांगला दिवस आहे. आज एखाद्या धार्मिक किंवा मंगल कार्यात भाग घ्याल. गेल्या काही काळापासून घरात काही समस्या असतील तर त्या आज संपुष्टात येतील. त्यामुळे सुटकेचा नि:श्वास सोडाल. विपरित परिस्थितीत रागावर नियंत्रण ठेवा. मित्रांसोबत मौजमस्ती कराल. अपरिचित ठिकाणी जाण्याचा योग आहे. खरेदी करण्यावर भर द्याल. त्यामुळे बराच पैसा खर्च होईल. खर्चावरील नियंत्रण सुटेल.
विरोधकांना शह देण्यात यशस्वी व्हाल. वेळेप्रसंगी हजरजबाबीपणा कामाला येईल. त्यामुळे अचूक निर्णय घ्याल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत आज तुम्हाला मिळू शकतात. त्याचा तुम्हाला लाभच होईल. धावपळ आणि वातावरणातील बदल यामुळे तब्येतीवर परिणाम होईल. व्यसन करणं टाळा. जे लोक विदेशात व्यापार करतात त्यांना आज चांगली बातमी मिळेल. गावाला जाणं टाळा. नवीन वाहन खरेदी करताना आर्थिक स्थितीचा विचार करा.
तुमचा अडलेला पैसा आज तुम्हाला मिळेल. कार्यक्षेत्रात नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या संकटात असलेल्या एखाद्या मित्राला मदत कराल. एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटल्याने मन प्रसन्न होईल. जीवनसाथीला आनंद वाटावा म्हणून फिरायला घेऊन जाल. शेजाऱ्यांशी भांडू नका, वाद घालू नका. तुमच्या जीभेवर नियंत्रण ठेवा.
आज तुम्हाला भौतिक सुखसुविधांचा लाभ मिळेल. कुणाशी आर्थिक व्यवहार करणार असाल तर बिल्कूल करू नका. कारण तुमचं नुकसान होऊ शकतं. एखादं प्रकरण कोर्टात सुरू असेल तर त्यात तुम्हाला यश येईल. एखाद्या अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शन मिळेल. तुमचे शत्रू तुमच्याविरोधात षडयंत्र रचण्याची शक्यता आहे. पण त्यात त्यांना काडीचंही यश येणार नाही. नोकरीत आजचा दिवस अत्यंत चांगला जाईल. तुमच्या अनुभवाचा इतरांना फायदा होईल.
नोकरी आणि व्यापारात तुम्हाला तुमच्या मनासारखा रिझल्ट मिळेल. तुम्हाला प्रसन्न वाटेल. तुम्ही ठरवलेली योजना मार्गी लागेल. तुम्ही प्रगती कराल. आज संध्याकाळी एखाद्या मित्राकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश येईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. जुगारापासून लांब राहा. गावाला जाण्याचा प्लान कराल. नातेवाईकांकडून दु:खद बातमी येईल. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल.
आरोग्याची काळजी घ्या. आरोग्याशी संबंधित तक्रारी वाढतील. तुम्ही तुमची संपत्ती खरेदी करणे किंवा विकण्याचा विचार कराल. मात्र हे करताना कायदेशीर मार्ग चपापून पाहा. नाही तर डीलमध्ये फसवणूक होईल. आज मन बैचेन राहील. कसली तरी हूरहूर लागेल. काही वर्षापूर्वी केलेल्या एखाद्या कृत्याचा पश्चात्ताप होईल. खर्चावर नियंत्रण राहणार नाही. संध्याकाळनंतर परिस्थितीत सुधारणा होईल. मनाला प्रसन्नता वाटेल.
आज तुमचे मन अध्यात्मात लागेल. वैवाहिक जीवनात आनंदी राहाल. व्यापारात लाभ मिळेल. दूर राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळेल. बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्यांना आज पदोन्नतीची संधी आहे. बेरोजगारांना रोजगार मिळेल. नको त्या भानगडीत पडू नका. पार्टनरसोबत डेटिंगला जायचा विचार कराल. शेतीतील कामे मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)