ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 4th August 2024) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
प्रेमी युगुलांमधील गैरसमज दूर होतील. दूरचा प्रवास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुटुंबांपासून थोडा काळ दूर राहावं लागणार आहे. नव्या योजना अंमलात आणण्याचा प्रयत्न करणार असाल तर त्याची अंमलबजावणी आतापासूनच करा. जमीन जुमल्याशी संबंधित व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज कामाचा व्याप असेल. सकारात्मक भूमिका, आत्मविश्वास यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल.
प्रेमीयुगुलांसाठी आजचा दिवस अत्यंत चांगला आहे. लग्नाची बोलणी करण्यासाठी अनुकूल दिवस. आज तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होणार आहेत. तुम्ही नेहमीच पर्यटनाच्या माध्यमातून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत असता. आजपासून तुमच्या या रोजनिशीला सुरुवात होणार आहे. व्यवसायात आज मोठी देवाणघेवाण होईल. आज तुम्ही जे काम कराल ते यशस्वी होणार आहे. मालमत्तेची प्रकरणे मार्गी लावण्याचा प्रयत्न कराल. आज घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे.
अविवाहितांनी मित्रांच्या पार्ट्यांमध्ये सहभागी व्हावं. तिथेच तुमची तुमच्या जोडीदाराशी भेट होईल. कुटुंबासह पिकनिकला जाण्याचा प्लान करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. आरोग्य सेवेतील लोक आज व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करतील. राजकारणातील व्यक्तींना मोठी ऑफर येण्याची शक्यता आहे. आज तुमचे आरोग्य ठणठणीत राहील. बऱ्याच दिवसांपासूनची रेंगाळलेली कामे मार्गी लावाल. आज एखादी दु:ख बातमी ऐकायला मिळणार आहे.
आज कामानिमित्ताने अशा व्यक्तीची भेट होईल की ज्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल. त्या व्यक्तीकडे तुम्ही आकर्षित व्हाल. घरातील ज्येष्ठांची आज घरात दादागिरी असेल. घरातील काही वादामुळे तुम्हाला पिकनिकचा प्लान किंवा बाहेरगावी जाण्याचा प्लान रद्द करावा लागू शकतो. नोकरीतील काही लोक तुमच्याशी गोड बोलण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्यापासून सावध राहा. व्यापारातील लोकांना आज मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
वरिष्ठ आणि अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनामुळे घरातील सदस्यांना लाभ होणार आहे. लहानांनी वरिष्ठांशी वागताना तारतम्य ठेवावं. तुमच्या वागण्यामुळे बुजुर्ग दुखावले जाऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या. पावसाळी आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. आज अत्यंत सुखद अनुभव मिळण्याची शक्यता आहे. आवडलेल्या व्यक्तीला प्रपोज कराल. पण समोरच्या व्यक्तीकडून नकार येईल. त्यामुळे नैराश्य येईल.
गावाकडचं घर बांधण्याची योजना आखाल. आज बऱ्याच वर्षापासूनचं गाडी घेण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. सोसायटीच्या मिटिंगमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जीभेवर नियंत्रण ठेवा. व्यापार आणि उद्योगातील गुंतवणुकीबाबतचा ज्येष्ठांकडून सल्ला घ्याल. नवीन तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी प्रयत्न कराल. डोकेदुखी, पाठदुखी आणि दातदुखीमुळे तुम्ही गेल्या काळापासून त्रस्त आहात. आज या आजारातून तुम्हाला मुक्ती मिळेल.
आज एखाद्या प्रिय व्यक्तीबाबतची दु:खद बातमी ऐकायला मिळेल. तुमच्या उपस्थितीमुळे संबंधितांना धीर मिळेल. अविवाहित लोक आज नव्या व्यक्तीच्या संपर्कात येतील. पण या भेटीपासून सावध राहा. चांगल्या आणि नव्या कामाचा शोध घ्याल. नातेवाईकांच्या घरी जाल. गेल्या काही दिवसांपासून अत्याधिक आजारी असणाऱ्यांना आज आराम मिळेल. गावाला जाण्याचा योग आहे. आज प्रचंड खर्च होणार आहे.
आज तुमच्यात अनेक सकारात्मक बदल होताना पाहायला मिळणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत चांगला आहे. फक्त मित्रांसोबत वेळ वाया घालवू नका. क्रीडा क्षेत्रातील लोकांना आज पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. आजारी असलेल्या नातेवाईकांना भेटायला जाण्याचा योग आहे. जवळच्या नातेवाईकाला आज कायमचं मुकाल. मात्र, अशा प्रसंगाला धैर्याला सामोरे जा. आज आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.
तुमचे जुने नातेसंबंध सुधारण्याचा प्रयत्न कराल. थंड हवा आणि शीतपेयाची अॅलर्जी असणाऱ्यांनी त्यापासून दूर राहावं. वातावरणातील बदलामुळे तब्येतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जे लोक नोकरीचा शोध घेत आहेत, त्यांनी निसंकोचपणे इतरांना नोकरीबाबत विचारलं पाहिजे. त्यातूनच तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे. विधी क्षेत्राशी संबंधित लोकांना मोठा फायदा होणार आहे. तुमच्या आयुष्यात आज नवीन व्यक्तीचा प्रवेश होणार आहे. घरात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. गावाकडे जाण्याचा विचार कराल. शेतीची कामे मार्गी लागतील.
घरात उत्सवाचं वातावरण असेल. सामिष भोजनावर ताव माराल. छोटीमोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. वाहने जपून चालवा. बाहेर फिरायला जाण्याचा बेत रद्द होईल. जंगल, नद्या आणि डोंगरावर जाताना सावध राहा. अचानक घरी पाहुणे येतील. सोमवारच्या महत्त्वाच्या गोष्टीचं नियोजन करतील. राजकारणात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. चुकीच्या आरोपामुळे खचून जाल. नियमित ध्यानसाधणा आणि योगा केल्यास आयुष्यात मोठा फरक पडेल. कुटुंबाला आज भरपूर वेळ द्याल.
अविवाहितांना आज विवाहाचा प्रस्ताव येईल. सिनेमा, नाटकाला जाण्याचा बेत अचानक रद्द झाल्याने मनोभंग होईल. आज नवीन पुस्तक वाचून काढाल. आज रात्री पुरेशी झोप येईल. कर्जाचा बोझा दूर होईल. मित्राची भेट झाल्याने मन प्रसन्न होईल. कुणालाही उधार देऊ नका. नाही तर दिलेला पैसा परत मिळण्याची शक्यता कमी आहे. भर पावसात भिजण्याचा आनंद घ्याल. कोर्टकचेरीच्या कामांची आजच तयारी कराल. धार्मिक कार्यात स्वत:ला वाहून घ्याल. आज छोटेखानी सामाजिक कार्यक्रमात भाग घ्याल.
अविवाहित लोक आज एखाद्या आकर्षक व्यक्तीला भेटतील. त्या व्यक्तीला पाहताच त्यांच्या प्रेमात पडाल. आज बाजारात बरीच खरेदी कराल. अधिक गुंतवणूक करण्याचा प्रयत्न कराल. डॉक्टरांकडून आरोग्याचा सल्ला घ्याल. शेजाऱ्यासोबत वाद होण्याची शक्यता आहे. कोणत्याही वादात पडू नका. सोसायटीच्या मिटिंगमध्ये आज प्रभाव पाडाल. आज खिशात चार पैसे जास्त येतील. अचानक धन लाभ होईल, पण खर्चही तेवढाच होईल. घराचे थकलेले हप्ते भरून टाकाल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)