लग्नासाठी जर 36 पैकी एवढे गुण मिळाले तर समजा तुमचे संबंध आयुष्यभर टिकतील!

| Updated on: Jul 27, 2021 | 9:28 PM

मान्यतांनुसार, मुला-मुलीमध्ये कोणत्याही लग्नासाठी जितके अधिक गुण मिळतात तेवढे ते लग्न उत्तम आणि श्रेष्ठ समजले जाते. आज आम्ही आपल्याला परिपूर्ण विवाहित जीवनासाठी आवश्यक असलेल्या गुणांच्या संख्येविषयी महत्त्वपूर्ण माहिती देणार आहोत.

लग्नासाठी जर 36 पैकी एवढे गुण मिळाले तर समजा तुमचे संबंध आयुष्यभर टिकतील!
Marriage
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मात लग्नासारख्या शुभ कार्यात अनेक प्रकारच्या प्रथा पाळल्या जातात. या चालीरितीनुसार कोणत्याही व्यक्तीच्या लग्नाआधी त्यांची कुंडली जुळली जाते. ज्यामध्ये मुलगा आणि मुलगी यांचे गुण जुळवले जातात. हिंदू रिवाजानुसार प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीत एकूण 36 गुण असतात. हे 36 गुण मुला-मुलीचे गण, तारा, भकूट, वैश्य, नाडी, योनी इत्यादींशी संबंधित असतात. मान्यतांनुसार, मुला-मुलीमध्ये कोणत्याही लग्नासाठी जितके अधिक गुण मिळतात तेवढे ते लग्न उत्तम आणि श्रेष्ठ समजले जाते. आज आम्ही आपल्याला परिपूर्ण विवाहित जीवनासाठी आवश्यक असलेल्या गुणांच्या संख्येविषयी महत्त्वपूर्ण माहिती देणार आहोत. (If so many of the 36 points in the horoscope match, the marital life will be successful)

लग्नासाठी कमीत कमी 18 गुण जुळणे आवश्यक

जसे आपण नुकतेच सांगितले आहे की, हिंदू धर्मानुसार कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत एकूण 36 गुण असतात. कोणत्याही जोडप्याच्या लग्नासाठी मुलगा आणि मुलीच्या 36 गुणांपैकी कमीत कमी 18 गुण जुळणे आवश्यक असते. ज्या मुला-मुलींचे 18 गुणही जुळत नाहीत, त्यांचे कुटुंब त्यांचे लग्न करत नाहीत. आनंदी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी मुलगा आणि मुलगी यांचे गुण जुळणे फार महत्वाचे असते. मान्यतांनुसार 18 पेक्षा कमी गुण जुळल्यास विवाह यशस्वी होत नाहीत आणि वधू-वरांना त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप अडचणींचा सामना करावा लागतो. असे म्हणतात की, ज्यांचे 18 गुण जुळत नाहीत, त्यांचे नातेही फार काळ टिकत नाही आणि त्यांचे ब्रेक-अप होण्याची शक्यता असते.

32 ते 36 गुण जुळणे सर्वोत्तम मानले जाते

विवाहासाठी कमीत कमी 18 गुण जुळणे खूप महत्वाचे आहे. लग्नासाठी 18 ते 25 गुण जुळणे चांगले म्हटले जाते. दुसरीकडे, 25 ते 32 गुण खूप चांगले मानले जातात. ज्या जोडप्यांच्या कुंडलीत 25 ते 32 गुण जुळतात, त्या लोकांचे वैवाहिक जीवन चांगले असते आणि त्यांना वैवाहिक जीवनात जास्त त्रास सहन करावा लागत नाही. अशा लोकांचे जीवन खूप आनंदी असते. याशिवाय 32 ते 36 गुण सर्वोत्तम मानले जातात. ज्या लोकांच्या कुंडलीत 32 ते 36 गुण जुळतात, त्यांचे वैवाहिक जीवन खूप विलासी, आनंददायी आणि सुखी असते. तथापि, लग्नासाठी 32-36 गुण फारच कमी लोकांचे जुळतात. (If so many of the 36 points in the horoscope match, the marital life will be successful)

इतर बातम्या

NIOS Public Exam 2021 : एनआयओसच्या दहावी बारावी परीक्षांसाठी नोंदणी सुरु, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर

राऊत म्हणाले, ‘विरोधी पक्षनेत्यांचा पर्यटन दौरा’, दरेकर म्हणाले, ‘आम्हीही व्यवस्थेचा भाग, लोकशाहीची थट्टा करु नका’