मुंबई : हिंदू धर्मात राशींच्या चिन्हांचे (Rashichakra) खूप महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह आणि राशिचक्र एकमेकांशी संबंधित आहे. ग्रहांच्या राशीवर वाईट नजर पडल्यामुळे जीवनात (Life) संकटे येतात. अनेक वेळा आपल्या राशीच्या वाईट स्थितीमुळे आपल्याला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत जर तुम्हाली राशींच्या संबंधीत धातू (Metal)किंवा गोष्टी स्व:ता जवळ ठेवल्यात तर आयुष्यात तुम्हाला अपेक्षित यश मिळण्यात मदत होईल. कधी कधी आपण खूप मेहनत करतो पण आपल्याला हवे तसे यश मिळत नाही. अशात ज्योतिषशास्त्राती गोष्टी तुम्ही केल्यात तर त्याचा तुम्हाला फायदाच होईल. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी ज्यामुळे तुमचे आयुष्य बदलून जाईल.
जाणून घ्या राशीनुसार काय ठेवावे
1- मेष: या राशीच्या लोकांनी तांब्यापासून बनलेला सूर्य नेहमी सोबत ठेवावा.
2- वृषभ: जर तुमची राशी वृषभ असेल तर तुम्ही तुमच्यासोबत पांढऱ्या रंगाचा शंख ठेवावा.
3- मिथुन: या राशीच्या लोकांनी शक्यतो जवळ गणेशाची हिरवी मूर्ती ठेवावी.
4- कर्क: कर्क राशीच्या लोकांनी पांढऱ्या रंगाचा क्रिस्टल बॉल ठेवला तर ते शुभ असते.
5- सिंह : सिंह राशीच्या लोकांनी तांब्याचे नाणे लाल कपड्यात बांधून ठेवले तर धनलाभ होतो.
6- कन्या : कन्या राशीच्या लोकांनी पितळेची मूर्ती सात ठेवल्यास ती फलदायी असते.
7- तूळ: या राशीच्या लोकांसाठी श्रीयंत्र जवळ ठेवणे शुभ असते.
8- वृश्चिक: वृश्चिक राशीच्या लोकांनी तांब्याचे भांडे किंवा कलश सोबत ठेवावा.
9- धनु: धनु राशीच्या लोकांनी पितळेचे नाणे सोबत ठेवले तर यश मिळते.
10- मकर: मकर राशीच्या लोकांना घोड्याचा नाल सोबत ठेवल्याने फळ मिळते.
11- कुंभ: कुंभ राशीच्या लोकांनी सुगंधी अगरबत्ती किंवा लाकूड सोबत ठेवावे. त्यापासून बनवलेल्या अगरबत्ती सोबत ठेवा.
12- मीन: जीवनात यश मिळवण्यासाठी मीन राशीचे लोक काचेच्या भांड्यात गंगेचे थोडे पाणी सोबत ठेवू शकतात.
या राशींच्या व्यक्तींनी ही खबरदारी अवश्य पाळा
1- या वस्तू तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा पूजास्थळी ठेवाव्यात.
२- या वस्तू वापरण्यापूर्वी त्यांना गंगाजलाने शुद्ध करा.
३- त्यांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या, त्यांच्यावर धूळ किंवा घाण जमू नये.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
संबंधीत बातम्या :
Tulsi Benefits | भगवान विष्णूच्या आवडत्या तुळशीचे धार्मिक महत्त्व काय ? जाणून घ्या रंजक गोष्टी