मुंबई, 2022 वर्षातील शेवटचे पूर्ण चंद्रग्रहण आज 8 नोव्हेंबर 2022 रोजी पाहायला मिळाले. या वर्षातील हे दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण होते. सुमारे 14.39 मिनिटांनी ग्रहणाला सुरुवात झाली आणि सुमारे 15.46 वाजता ग्रहण पूर्ण टप्प्यात पोहोचेल. आता चंद्रग्रहण पाहण्यासाठी लोकांना आणखी वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. पुढील चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2023) 5 मे 2023 आणि 29 ऑक्टोबर 2023 रोजी आहे. पंचांगनुसार 29 ऑक्टोबर 2023 रोजी चंद्रग्रहणाची वेळ 01.06 वाजता सुरू होईल आणि 02.22 वाजता संपेल. स्थानिक ग्रहणाचा कालावधी एक तास सोळा मिनिटे आणि सोळा सेकंद असेल. भारतात दिसणारे पुढील संपूर्ण चंद्रग्रहण 7 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे.
2023 सालातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी होणार आहे. हे ग्रहण मेष राशीत होईल. ज्याचा प्रभाव मेष, कर्क, तूळ आणि मकर राशींवर होईल. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. पंचांगानुसार हे ग्रहण सकाळी 7.04 ते दुपारी 12.29 पर्यंत असेल. 2023 मधील दुसरे सूर्यग्रहण 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हे ग्रहण भारतातही दिसणार नाही. हे पश्चिम आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अटलांटिका आणि आर्क्टिकामध्ये दृश्यमान असेल.