Lal Kitab: आयुष्यात पैशांची कमतरता असेल, व्यवसाय चालत नसेल, तुमच्यावर कर्ज वाढत असेल, नोकरीत समस्या येत असतील किंवा तुमचे आरोग्य चांगले नसेल तर याचे कारण तुमचे ग्रह दोष देखील असू शकतात. विशेषत: जेव्हा केतू ग्रहाचा प्रभाव नकारात्मक असतो तेव्हा व्यक्तीला आर्थिक, मानसिक आणि आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. यासंदर्भात ज्योतिष ग्रंथ असलेल्या लाल किताबमध्ये उपाय दिले आहे. त्यानुसार केतू ग्रहाच्या शांतीसाठी कुत्र्यास चपाती किंवा त्याच्या आवडीची वस्तू खाऊ घाला.
कुत्रा हा केतू ग्रहाचा प्रतीक आहे. पांडव यांच्या स्वर्गयात्रे दरम्यान युधिष्ठर यांच्यासोबत कुत्राच स्वर्गात गेला होता. यामुळे कुत्र्याची सेवा केल्यास केतू प्रसन्न होतो. त्यानंतर जीवनात कोणतीही समस्या येत नाही. कुत्र्यास फक्त भाकरी आणि दूध दिल्यावर काम पूर्ण होणार नाही. ज्या पद्धतीने व्यक्ती एकाच पद्धतीचे जेवण करुन बोर होतो, तसे कुत्र्याचेही असते. कुत्र्यास वेगवेगळे स्वाद आवश्यक असतात. त्यामुळे कुत्र्यास आवडणाऱ्या वस्तू त्याला खाण्यास दिल्या पाहिजे.