Mithun Rashifal 2023: मिथुन राशीच्या लोकांना नवीन वर्षात होणार आर्थिक लाभ , फक्त या गोष्टी ठेवा लक्षात

| Updated on: Jan 01, 2023 | 2:23 PM

एप्रिल, मे आणि जूनच्या दुसऱ्या तिमाहीपासून लाभात आणखी सुधारणा होईल. नोकरी व्यवसायात जबाबदारी वाढेल...

Mithun Rashifal 2023: मिथुन राशीच्या लोकांना नवीन वर्षात होणार आर्थिक लाभ , फक्त या गोष्टी ठेवा लक्षात
वार्षिक राशी भविष्य
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, नवीन वर्ष 2023 (2023 Yearly Horoscope Gemini)  मिथुन राशीच्या लोकांसाठी यश मिळवून देणारे आहे. मिथुन राशीच्या लोकांसाठी विशेषत: व्यवसायात हे वर्ष विशेष लाभदायक ठरेल. पैसा, नातेसंबंध, करिअर-व्यवसाय, शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत वर्षभरात कोणकोणती वळणं येतील? कोणकोणत्या बाबतीत तुम्हाला काळजी घ्यावी लागेल? 2023 हे वर्ष मिथुन राशीच्या लोकांसाठी करिअर आणि आरोग्याच्या बाबतीत कसे असेल ते जाणून घेऊया.

करिअर आणि व्यवसाय

बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या कामांना गती मिळेल. उच्च शिक्षणात यश मिळेल.  नोकरी किंवा व्यवसायाचा मार्ग खुला होईल. या वर्षी जानेवारीत शनिदेवाच्या भाग्यशाली राशी बदलाने सुरुवात हाेईल. शनि-गुरूचा प्रारंभिक सहवास दीर्घकालीन योजना आणि उद्दिष्टांना चालना देईल. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चचा पहिला तिमाही तुम्हाला संघर्षातून बाहेर काढेल आणि सुरळीत मार्गावर नेईल. मागील प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम होतील. लांबचे प्रवास घडतील. चांगली सुरुवात वर्षाच्या शेवटपर्यंत उत्साह टिकवून ठेवेल.

एप्रिल ते जून महिन्यात खर्च वाढेल

एप्रिल, मे आणि जूनच्या दुसऱ्या तिमाहीपासून लाभात आणखी सुधारणा होईल. नोकरी व्यवसायात जबाबदारी वाढेल. पदे प्रतिष्ठा आणि बढतीच्या संधी निर्माण हाेतील. लहान-मोठे ध्येय साध्य हाेतील. परंपरा नीट पाळाल. समाजात मान-सन्मान मिळेल. भविष्याभिमुख प्रयत्नांना गती देऊ शकाल. चांगल्या ऑफर्स मिळू शकतात. महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा विचार करत राहाल. अनपेक्षित खर्चामध्ये वाढ हाेईल. खर्चावर नियंत्रण ठेवा.

हे सुद्धा वाचा

ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान प्रगती दिसून येईल

ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये यशाचा मार्ग वेगवान होईल. जवळच्या व्यक्तींचा पाठिंबा राहील. राहू-केतूच्या राशी बदलामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात अस्वस्थता येईल. आर्थिक क्षेत्रात सुधारणा होईल. पदाच्या प्रतिष्ठेसाठी संघर्ष वाढेल. ज्येष्ठांचा सहवास ठेवा. वादाची परिस्थिती टाळा. सेवा क्षेत्रात प्रभावी राहील. विरोधक शांत राहतील. नोकरदार वर्गाला सुवर्ण काळ असेल. संयुक्त प्रयत्नांनी सुधारणा होईल. वैवाहिक जीवनात आपुलकी आणि विश्वास यावर भर द्याल.

आरोग्य आणि कुटुंब

कुटुंबासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल. प्रियजनांच्या आनंदात सहभागी व्हाल. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. जमीन, घर, वाहन खरेदीचे महत्त्वाचे निर्णय प्रत्यक्षात येतील. ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. पूर्वीचे अडथळे कमी होतील. आजार दूर होतील. मनोबल वाढेल. संकोच नियंत्रित होईल. नातेवाईकांसोबत आनंद वाटेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)