मुंबई : राग ही एक नैसर्गिक भावना आहे जी प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. पण काही लोक जन्मजात रागीट असतात. रागाच्या भरात एखादी व्यक्ती आपला विवेक गमावून बसते. या स्थितीत व्यक्ती योग्य निर्णाय ही घेत नाही. राशीचक्रात प्रत्येक राशीला स्वतःचा स्वभाव असतो, या गोष्टीचा परिणाम त्या राशीच्या व्यक्तीवरही परिणाम होतो. चाला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.
या राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळाची प्रकृती अत्यंत ज्वलंत आहे. त्यांच्या नाकावर नेहमीच राग असतो. या राशींच्या लोकांना राग यायला वेळ लागत नाही. त्यांच्याशी वाद घालणे म्हणजे छोट्या गोष्टीलाही मोठी स्वरुप देण्यासारखे असते. .
या राशीचे लोक खूप हट्टी असतात. त्यांना सर्वत्र जुळवून घेता येत नाही. ते इतरांवर वर्चस्व गाजवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात आणि जर कोणी त्यांचा मार्ग अवलंबला नाही तर मात्र त्यांना राग येतो. जर तुम्ही त्यांच्याशी वाद घालण्याची चूक केली तर त्यांचा राग सातव्या आसमानावर पोहोचू शकतो. रागाच्या भरात ते स्वतःचे नुकसान करतात.
सिंह राशीच्या लोकांना कोणाच्याही हाताखाली काम करणे आवडत नाही. म्हणूनच ते कोणाची बंधने सहन करू शकत नाहीत. त्यांना एखाद्या बाबतीत चुकीचे म्हटले तर ते लढायला तयार होतात. जेव्हा त्यांना राग येतो तेव्हा ते सर्व नातेसंबंध विसरतात.
तूळ राशीचे लोक मनाने स्वच्छ असतात, पण राग आला की काहीही बोलतात. त्याचे बोलणे लोकांना अंगावर काटा आणते. रागाच्या भरात समोरच्या व्यक्तीला आपल्याबद्दल किती वाईट वाटू शकते हे त्यांना कळत नाही. मात्र, त्यांचा राग शांत झाल्यावर त्यांनाही त्यांची चूक कळते.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
इतर बातम्या :
Astro tips for house | घर बांधताय? मग वास्तुशास्त्राचे 5 नियम नक्की वाचा, भरभराट नक्की होणार