Rahu-Ketu Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह हा आपले स्थान बदलत राहतो. ग्रह एका राशीतून जेव्हा दुसर्या राशीत संक्रमण करतो तेव्हा त्याचा इतर राशींवर परिणाम होत असतो. राहू केतू हा इतर ग्रहांप्रमाणेच इतर राशींमध्ये प्रवेश करत राहतात. आता राहूने मीन राशीत प्रवेश केला आहे, तर केतूने तूळ राशीत प्रवेश केला आहे. यामुळे 18 मे 2025 पर्यंत ते आपापल्या राशीमध्ये राहणार आहे. यामुळेच पुढील दोन वर्षे चार राशींवर याचा प्रभाव पाहायला मिळणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत राहू-केतूचा अशुभ प्रभाव आहे त्यांनी यापासून वाचण्यासाठी शनिदेव आणि भैरवाची पूजा करावी. मीन राशीतील राहू आणि कन्या राशीतील केतूच्या संक्रमणाचा सर्व 12 राशींवर वेगवेगळे परिणाम होतील.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ होईल. अचानक धनप्राप्तीचे संकेत मिळत आहेत.
वृषभ
मीन राशीत राहुचा प्रवेश होत असल्याने वृषभ राशीच्या लोकांसाठी हे फायदेशीर ठरू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी राहूचा मीन राशीत प्रवेश आर्थिक लाभाचे संकेत आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरु झाले आहे. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
तूळ
वैवाहिक अडचणी आणि समस्या दूर होतील. आरोग्य सुधारेल. धंद्यात फायदा होईल. आपआपल्या क्षेत्रात यश मिळेल.
( सूचना : वरील माहिती ही जोतिषशास्त्राच्या माहितीच्या आधारावर देण्यात आली आहे. टीव्ही ९ याची पुष्टी करत नाही. )