2025 पर्यंत मीन राशीत राहणार राहू, या 3 राशींवर टाकणार नकारात्मक प्रभाव

| Updated on: Dec 04, 2023 | 3:10 PM

राहूची उलटी चाल काही राशींवर नकारात्मक प्रभाव टाकू शकते. त्यामुळे या तीन राशीच्या लोकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. 2025 पर्यंत राहू मीन राशीमध्ये राहणार आहे.

2025 पर्यंत मीन राशीत राहणार राहू, या 3 राशींवर टाकणार नकारात्मक प्रभाव
गुरू गोचर लोकांना सकारात्मक परिणाम देते. 2024 मध्ये गुरू 12 वर्षांनी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. गुरूचे संक्रमण काही राशींच्या समस्या वाढवणार आहे. ज्यामुळे त्या राशींच्या लोकांना आव्हानांना सामोरे जावे लागेल. 1 मे 2024 रोजी दुपारी 2:29 वाजता गुरु वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.
Follow us on

Rahu Transit  : राहू हा असा ग्रह आहे ज्याची प्रत्येक चाल महत्त्वाची मानली जाते. राहूची उलटी चाल काही लोकांसाठी हानिकारक ठरू शकते आणि काही लोकांसाठी नशिबाचे कुलूप देखील उघडू शकते. राहू सध्या मीन राशीत असून उलट गतीने भ्रमण करत आहे. 30 ऑक्टोबर रोजी राहूने मेष राशीतून मीन राशीत प्रवेश केलाय. राहू 2025 पर्यंत मीन राशीत राहणार आहे. त्यामुळे राहूची ही उलटी चाल काही राशींसाठी अडचणी निर्माण करू शकते. कोणत्या आहेत त्या तीन राशी जाणून घ्या.

धनु

राहूचे हे संक्रमण धनु राशीच्या लोकांसाठी संमिश्र परिणाम देणारे आहे. कुठे जागा विकत घेत असाल किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ते टाळावे. घरात वाद होण्याची शक्यता आहे. काही कामे बिघडू शकतात. यावेळी आरोग्याची देखील विशेष काळजी घ्यावी लागेल.

मेष

राहूची उलटी चाल मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायक नसणार आहे. राहू बाराव्या घरात प्रवेश करत असल्याने तुमचा खर्च वाढू शकतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. वैवाहिक जीवनात देखील काही समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पार्टनरसोबत वाद टाळावे.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी देखील राहूचे संक्रमण अशुभ ठरणार आहे. या राशीच्या लोकांनी आरोग्याशी काळजी घ्यावी. आरोग्य बिघडल्याने खर्च वाढू शकतात. वादापासून लांब राहा.

अस्वीकरण: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य असल्याचा दावा आम्ही करत नाही. वरील माहिती जोतिषशास्त्राच्या आधारावर देण्यात आली आहे. कोणतीही समस्या असेल तर संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्यावा.