मुंबई : गुरुवार 3 जून 2021 आहे. गुरुवारचा दिवस हा भगवान नारायण यांना समर्पित असतो (Rashifal Of 03 June 2021). हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल. भगवान नारायण यांची कुणावर कृपा असेल. जाणून घेण्यासाठी पाहा संपूर्ण राशीभविष्य . (Rashifal Of 03rd June 2021 Horoscope Astrology Of Today)…
आज खूप काम असेल. परंतु योग्य यश मिळाल्याने आपण थकवा आणि तणाव विसरुन जाल. आपली क्षमता आणि प्रतिभा जागृत करण्याची ही वेळ आहे. आपले व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी कठोर परिश्रम करा.
चुलतभावांसोबतच्या संबंधात काही कारणामुळे दुरावा येऊ शकतो. आपल्या स्वभावावर नियंत्रण ठेवा. बोलताना योग्य शब्द वापरा. मालमत्तेसंबंधित बाबींकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
कामाच्या ठिकाणी तुमच्यावर बर्याच जबाबदाऱ्या असू शकतात. पण, कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आपण परिस्थिती हाताळण्यास देखील सक्षम असाल. तरुणांच्या कारकीर्दीत सुरु असलेल्या समस्या दूर होतील आणि स्थिरता येईल.
लव्ह फोकस – कौटुंबिक वातावरण आनंददायी आणि सुसंवादी राहील. प्रेम संबंधातही जवळीक वाढेल.
खबरदारी – जास्त थकवा आणि तणाव यामुळे शारीरिक दुर्बलता जाणवेल. आपल्या विश्रांतीसाठी थोडा वेळ काढणे देखील आवश्यक आहे.
लकी रंग – आकाशी
लकी अक्षर- अ
फ्रेंडली नंबर- 8
आजच्या दिवसाचा बहुतेक वेळ कौटुंबिक कामकाजामध्ये आणि गुंतवणुकीशी संबंधित कामात व्यतीत होईल. दीर्घकाळापासून असणाऱ्या चिंतेवर तोडगा काढाल. कोणताही राजकीय संपर्क आपल्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग शोधू शकतो.
क्षुल्लक गोष्टींमुळे कोणाशीही वादविवाद करु नका. आपल्या कार्याकडे लक्ष केंद्रित करा. आपल्या कोणत्याही योजनेची अंमलबजावणी करण्यापूर्वी आपण योग्य विचार केला पाहिजे. घाई केल्याने समस्या उद्भवू शकतात.
कार्यक्षेत्रातील विशिष्ट व्यक्तीची मदत तुमच्या प्रगतीसाठी फायदेशीर ठरेल. नोकरीशी संबंधित विभागीय परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करावे, इच्छित निकाल मिळू शकतात.
लव्ह फोकस – विवाहित जीवनात इतर कोणत्याही व्यक्तीला हस्तक्षेप करु देऊ नका. कुटुंबातील कोणतीही समस्या आपापसांत बसून सोडविण्यातच शहाणपण आहे.
खबरदारी – अधिक प्रदूषण आणि गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळा. एलर्जी सारखी समस्या असू शकते.
लकी रंग – गुलाबी
लकी अक्षर- के
फ्रेंडली नंबर- 9
कोणतेही काम करण्यापूर्वी त्याबद्दल सखोल ज्ञान मिळवणे आवश्यक आहे, यामुळे चांगले निकाल मिळतील. सर्जनशील आणि मनोरंजक कामात थोडा वेळ घालवून तुम्ही मानसिकरित्या रिलॅक्स असाल.
यावेळी आपल्याकडे बर्याच योजना आहेत, परंतु त्या अंमलात आणण्यात काही अडचण येईल. आपले अनावश्यक खर्च मर्यादित करा. कारण बजेट गोंधळात टाकू शकतो. तरुणांनी कोणाच्या बोलण्यावरुन कोणत्याही चुकीच्या मार्गाचा अवलंब करु नये.
व्यवसायात एखादा प्रकल्प सुरु करण्याची योजना असल्यास त्या कार्यान्वित करण्यासाठी ही अनुकूल वेळ आहे. लवकरच नफ्याच्या संधी मिळतील. लक्षात ठेवा की नोकरी करणारे लोक एखाद्या प्रकारच्या राजकारणात अडकू शकतात.
लव्ह फोकस – अत्यधिक व्यस्ततेमुळे आपण कुटुंबासोबत जास्त वेळ घालवू शकणार नाही. परंतु जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य घरची व्यवस्था परिपूर्ण ठेवेल.
खबरदारी – कोणताही जुना आजार पुन्हा उद्भवू शकतो. निष्काळजीपणाने वागू नका आणि नियमित तपासणी करत रहा.
लकी रंग – हिरवा
लकी अक्षर- ला
फ्रेंडली नंबर- 5
यावेळी ग्रहांची स्थिती आपल्यासाठी उत्कृष्ट परिस्थिती निर्माण करीत आहे. काम सुरळीत पार पाडल्यामुळे आत्मविश्वासही वाढेल. घरी काही नवीन वस्तू खरेदी करण्याचीही शक्यता आहे.
हे लक्षात ठेवा की आपल्या अहंकारामुळे केलेले कोणतेही कार्य खराब होऊ शकते. भावांबरोबर मतभेद होण्याची परिस्थिती उद्भवू शकते. आपल्या समजूतदारपणासह आणि शांततेत कार्य केल्याने परिस्थिती देखील चांगली होईल.
व्यवसायाच्या ठिकाणी नफ्यापेक्षा मेहनत अधिक होईल. आज कोणतेही विशेष यश मिळणार नाही, परंतु आपल्या भविष्यातील योजना सकारात्मक असतील. यावेळी मार्केटिंग संबंधित गोष्टींची जास्तीत जास्त माहिती मिळवा.
लव्ह फोकस – कौटुंबिक व्यवस्थेबाबत पती-पत्नीमध्ये काही वाद असू शकतात. प्रेम संबंधात घट्ट होतील.
खबरदारी – जास्त कामाच्या ताणामुळे थकवा, डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवतील. मधुमेह असलेल्या लोकांनी आपल्या आहाराची पूर्णपणे काळजी घ्यावी.
लकी रंग – केशरी
लकी अक्षर- रा
फ्रेंडली नंबर- 5
तुम्ही तुमच्या चांगल्या आणि संतुलित वागण्याने प्रत्येकाला मंत्रमुग्ध कराल. गेल्या काही अपयशांपासून धडा घेवून आपण आपल्या कामात अधिक चांगले करण्याचा प्रयत्न कराल आणि यशस्वी व्हाल. एखाद्या गुरुसारख्या माणसाबरोबर भेटण्याने तुमच्यात सकारात्मक उर्जा निर्माण होते.
स्वतःवर जास्त कामाचे ओझे घेऊ नका. अन्यथा, काम पूर्ण करण्याच्या दबावाखाली तुमचा ताण येईल. आपल्या स्वतःच्या धोरणांकडे लक्ष द्या. मित्रांशी अधिक संपर्क ठेवणे हानिकारक आहे. आपल्या वैयक्तिक कार्यांकडे अधिक लक्ष द्या.
नोकरी आणि व्यवसायात सुसंगतता असेल आणि उत्कृष्ट संधी देखील उपलब्ध होतील. एखाद्याच्या हस्तक्षेपामुळे आपल्या कामात अडथळा येऊ शकतो. आपली कार्यपद्धती कोणाबरोबर शेअर करु नका. अधिकृत भेट देखील शक्य आहे.
लव्ह फोकस – कौटुंबिक वातावरण सुखद राहील. प्रेम संबंधांमध्ये, सन्मान राखणे महत्वाचे आहे.
खबरदारी – सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी आणि ऊर्जावान वाटेल.
लकी रंग – पिवळा
लकी अक्षर- ब
फ्रेंडली नंबर- 8
गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ज्या कामासाठी प्रयत्नशील होते आज त्याचे शुभ परिणाम अपेक्षेपेक्षा जास्त असू शकतात. हरवलेली प्रतिष्ठा परत मिळाल्याने मनात प्रसन्न राहील. आत्मविश्वासही वाढेल.
उत्पन्न आणि खर्चामध्ये चांगले संतुलन राखा. इतरांच्या सूचना गांभीर्याने घ्या. बोलताना योग्य शब्दांचा वापर करा, आपल्याबद्दल कोणतीही नकारात्मक गोष्ट एखाद्याला दुखवू शकते.
यावेळी व्यवसायाचे नवीन मार्ग तयार होतील. परंतु हे लक्षात ठेवा की कोणतीही कामे करण्यापूर्वी योजना तयार करा आणि त्यासर्व बाबींचा विचार करुन अंमलबजावणी करा. नोकरीमध्ये परिस्थिती अनुकूल असेल.
लव्ह फोकस – कौटुंबिक वातावरण सुखद असेल. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
खबरदार – पोटाशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास आयुर्वेदिक गोष्टींचे सेवन केल्याने आरोग्य सुधारेल. नियमित रक्तदाब तपासणी करा.
लकी रंग- लाल
लकी अक्षर- स
फ्रेंडली नंबर- 6
एखाद्या कामात उत्कृष्ट यश मिळाल्याने मन प्रसन्न होईल. तसेच एखाद्या प्रभावशाली व्यक्तीचे सहकार्य तुमचे मनोबल वाढवेल. घरातील वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाचे नक्की अनुसरण करा. घरासाठी एक मौल्यवान वस्तू खरेदी करणे देखील शक्य आहे.
आपल्या काही वैयक्तिक बाबी सार्वजनिक होऊ शकतात. म्हणून जरा काळजी घ्या. गोष्टी दुपारपर्यंत प्रतिकूल राहू शकतात, दिवसाच्या सुरुवातीस आपल्या क्रियांची रुपरेषा ठेवणे चांगले.
जर आपण व्यवसायाच्या ठिकाणी काही बदल करण्याचा विचार करत असाल तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. व्यवसायात कर्मचार्यांचे पूर्ण सहकार्य असेल आणि उत्पादन क्षमता देखील वाढेल.
लव्ह फोकस – कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. परंतु व्यर्थ प्रेम प्रकरणांमुळे आपला व्यवसाय आणि पैसा दोघांचेही नुकसान होऊ शकते.
खबरदारी – आरोग्याशी संबंधित थोडी समस्या असू शकते, म्हणून आपला आहार आणि नित्यक्रमाची विशेष काळजी घ्या. प्रत्येक परिस्थितीत संयम बाळगा.
लकी रंग – पिवळा
लकी अक्षर- प
फ्रेंडली नंबर- 8
आपण आपल्या दिनचर्येत आणि विचारांमध्ये काही सकारात्मक बदल आणण्याचा प्रयत्न कराल आणि यशस्वीही व्हाल. बराच काळानंतर एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटण्याचा आनंद मिळेल. ही भेट एकमेकांसाठी खूप फलदायी ठरेल.
रिअल इस्टेटशी संबंधित काही कर्ज घेण्याची परिस्थिती उद्भवू शकते. काळजी करु नका, हे कर्ज देखील वेळेत परतफेड केले जाईल. आपली बोलण्याची शैली आणि रागावर नियंत्रण ठेवा. अन्यथा, विनाकारण स्वतःच एखाद्याशी भांडण करुन बसाल.
कार्यक्षेत्रात तुमची प्रगती पाहून विरोधकांना हेवा वाटू शकेल. म्हणून जास्त शो ऑफ करण्याची प्रवृत्ती टाळा. हे लक्षात ठेवा की भागीदारीशी संबंधित कोणतेही काम करताना जुन्या अडचणींचे सद्यस्थितीवर वर्चस्व होऊ देऊ नका. कर्मचार्यांचे पूर्ण सहकार्य असेल.
लव्ह फोकस – कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये परस्पर सामंजस्य आणि सहकार्याची भावना असेल. प्रियकर/प्रेयसीला भेटण्याची संधी मिळेल.
खबरदारी – घरातील सदस्याच्या आरोग्याच्या समस्या गांभीर्याने घ्या. निष्काळजीपणामुळे समस्या उद्भवू शकतात.
लकी रंग- लाल
लकी अक्षर- जी
फ्रेंडली नंबर- 6
काही काळापासू पूर्णत्वास येत नसलेल्या ज्या कामांची आशा गमावली होती, ती कामे आज सहज आणि सानुकूल पद्धतीने सोडवली जाऊ शकतात. मुलांच्या कर्तृत्वाशी संबंधित काही चांगली बातमी मिळेल आणि कुटुंबियांसह काही धार्मिक कामे होतील.
एखाद्याशी पैशांचा व्यवहार करताना सर्व बाबींचा विचार करुन पावले उचला. अन्यथा तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला आणि मार्गदर्शनाचे अनुसरण करा.
व्यवसायात विस्तारासाठी तयार केलेल्या रोडमॅपवर काम करण्याची योग्य वेळ आली आहे. नक्कीच तुम्ही प्रगती कराल. नोकरीमध्ये आपली कामे काळजीपूर्वक करा. निष्काळजीपणामुळे अधिकारी वर्गाला तुमच्या कामाचा राग येऊ शकतो.
लव्ह फोकस – घरात कोणत्याही समस्येबाबत आपल्या जोडीदाराबरोबर वैचारिक मतभेद असू शकतात. पण लवकरच परिस्थितीही पूर्वपदावर येईल.
खबरदारी – गॅस आणि अॅसिडिटीची समस्या वाढते. ज्यामुळे आपण जास्त ताण घेत आहात. मेडिटेशन नक्की करा.
लकी रंग – जांभळा
लकी अक्षर- द
फ्रेंडली नंबर- 4
कोणत्याही नात्याशी किंवा मालमत्तेशी संबंधित वाद असल्यास अनुभवी व्यक्तीच्या मध्यस्थीने तो सोडवण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला यश मिळेल. घरगुती वस्तुंच्या ऑनलाईन खरेदीमध्ये कुटुंबातील सदस्यांसह आनंदी वेळ घालविला जाईल.
खर्च करताना आपले बजेटकडेही लक्ष ठेवा. मुलाला कोणत्याही कामात इच्छित परिणाम न मिळाल्यास चिंताग्रस्त राहू शकता. यावेळी त्यांचे मनोबल उंचावणे महत्वाचे आहे. मानसिक शांततेसाठी थोडा वेळ आध्यात्मिक कार्यातही घालवा.
व्यवसायातील कामे सामान्य राहतील. यावेळी जास्त नफा अपेक्षित नाही. तरीही आवश्यकतेनुसार कामे सुरुच राहतील. नवीन पद्धतीशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी थोडा वेळ घ्या, हे भविष्यात फायदेशीर ठरेल.
लव्ह फोकस – तुमच्या जोडीदाराबरोबर सर्व काही सामायिक केल्याने समस्येवर योग्य तोडगा निघू शकेल. कौटुंबिक वातावरणही आनंददायी आणि सौहार्दपूर्ण राहील.
खबरदारी – घशात थोडं इंफेक्शन होण्याची समस्या असू शकते. आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवा.
लकी रंग – केशरी
लकी अक्षर- जे
फ्रेंडली नंबर- 1
दिनचर्या व्यस्त असेल. आपल्या प्रतिभेच्या जोरावर आपण समाजात आपली ओळख निर्माण करण्यास सक्षम असाल. आपल्याला काही खर्च आणि आव्हानांचा सामना करावा लागेल. परंतु आपण त्यांचे निराकरण करण्यात सक्षम व्हाल. स्वत: बरोबर एकांतात थोडा वेळ घालवा.
भावनांऐवजी, आपल्या जीवनात व्यावहारिक पद्धतींचा अवलंब करा. वेळेनुसार आपल्या वागण्यातही बदल आणणे आवश्यक आहे. आपल्या कोणत्याही इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणताही धोका घेऊ नका. अन्यथा नंतर पश्चात्ताप करावा लागेल.
कामाच्या ठिकाणी खूप व्यस्तता असेल. व्यवसायातील अडथळे दूर होतील. वित्त संबंधित कामांवर अधिक लक्ष द्या. सरकारी नोकरांना त्यांच्या कार्यालयात होणाऱ्या बदलांची माहिती मिळू शकेल.
लव्ह फोकस – प्रेम प्रकरणांच्या बाबतीत सतर्क रहा. आपले काही रहस्य सार्वजनिक होऊ शकतात. घराचे वातावरण आनंददायी राहील.
खबरदारी – आरोग्य चांगले राहील. सध्याच्या वातावरणामुळे संपूर्ण जागरुक होण्याची आवश्यकता आहे.
लकी रंग – हिरवा
लकी अक्षर – वा
फ्रेंडली नंबर – 2
घरात आणि व्यवसायामध्ये योग्य ती एकता कायम ठेवल्यास आनंद मिळेल. वडीलधाऱ्यांच्या अनुभवांचे पालन करणे फायदेशीर ठरेल. गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल आहे. परंतु त्याबद्दल सखोल चौकशी नक्की करा.
शेजारी किंवा मित्राशी वाद घालण्यासारखी परिस्थिती उद्भवू शकते. रागासारख्या उणिवांवर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे. यावेळी पैशांशी संबंधित व्यवहारही अत्यंत सावधगिरीने करणे आवश्यक आहे.
व्यवसायातील कामे मंद गतीने होतील. धैर्य ठेवा. भागीदारीशी संबंधित व्यवसायातही आज कोणताही नवीन निर्णय घेण्याची योग्य वेळ नाही. कार्यालयातील आपल्या उत्कृष्ट कार्य प्रणालीचे उच्च अधिकारी कौतुक करतील.
लव्ह फोकस – प्रेम संबंधांच्या बाबतीत एकमेकांबद्दल विश्वासाची भावना असणे महत्त्वाचे आहे. अन्यथा, नात्यामध्ये तडे जाऊ शकतात. घरातील वातावरण योग्य राहील.
खबरदारी – कोणत्याही धोकादायक कामात रस घेऊ नका आणि वाहन काळजीपूर्वक चालवा.
लकी रंग – मेहरुन
लकी अक्षर – न
फ्रेंडली नंबर – 7
Rashifal Of 03rd June 2021 Horoscope Astrology Of Today
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :