Horoscope 8th June 2021 | कर्क राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती सुधारेल, सिंह राशींच्या महिलांना व्यवसायात यश, जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य

| Updated on: Jun 07, 2021 | 11:41 PM

मंगळवार 8 जून 2021 आहे. मंगळवारचा दिवस हा भक्त हनुमानजींना समर्पित असतो (Rashifal Of 08 June 2021). मंगळवारी हनुमानजींची विधीवत पूजा केल्याने हनुमानजी प्रसन्न होतात.

Horoscope 8th June 2021 | कर्क राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती सुधारेल, सिंह राशींच्या महिलांना व्यवसायात यश, जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य
Horoscope
Follow us on

– डॉ. अजय भाम्बी

मुंबई : मंगळवार 8 जून 2021 आहे. मंगळवारचा दिवस हा भक्त हनुमानजींना समर्पित असतो (Rashifal Of 08 June 2021). मंगळवारी हनुमानजींची विधीवत पूजा केल्याने हनुमानजी प्रसन्न होतात. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. हनुमानजींची कुणावर कृपा असेल. जाणून घेण्यासाठी पाहा संपूर्ण राशीभविष्य . (Rashifal Of 08th June 2021 Horoscope Astrology Of Today)…

मेष राश‍ी ( Aries) –

आज आपल्याला एखाद्या खास व्यक्तीच्या सानिध्यात राहायला मिळेल, जो तुमच्यासाठी भाग्यवान असेल आणि तुम्ही कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाने आपले ध्येय देखील साध्य कराल. कोणत्याही शुभ माहितीमुळे घरात आनंदाचं वातावरण असेल.

कुटूंब किंवा कोणत्याही संबंशी जुन्या नकारात्मक गोष्टी पुन्हा उद्भवू शकतात. राग आणि उत्कटतेऐवजी धैर्य आणि संयमाने परिस्थिती सहजपणे हाताळली जाईल. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

व्यवसायाच्या दृष्टीकोनातून वेळ अनुकूल आहे. बिल्डर आणि प्रॉपर्टी डीलर आज वाजवी नफा कमवू शकतात. काही स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते. परंतु थोडी काळजी घेतल्यास यशही येईल.

लव्ह फोकस – वैवाहिक जीवन सुखद असेल. प्रेमसंबंधांमधील गैरसमजांमुळे तणाव वाढू शकतो.

खबरदारी – यावेळी तुम्हाला आत्मशक्तीची कमतरता आणि शारीरिक दुर्बलता जाणवेल. यासाठी मेडिटेशन हे योग्य समाधान आहे.

भाग्याचा रंग – पिवळा
लकी अक्षर – मे
फ्रेंडली नंबर – 3

वृषभ राश‍ी (Tauras)

विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक कामात अधिक परिश्रम करण्याची आवश्यकता आहे. त्यांचे मार्गदर्शन करणे आणि मनोबल वाढवणे हे पालकांचे कर्तव्य आहे. यावेळी योजना आखण्याबरोबरच त्यांना कार्यरुप देणेही आवश्यक आहे.

व्यवसायात केलेल्या परिश्रमानुसार तुम्हाला योग्य निकाल मिळेल. पण, आज मार्केटिंग आणि मीडिया संबंधित कामांपासून दूर रहा. कोणत्याही अडचणीत ज्येष्ठ सदस्याचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

लव्ह फोकस – प्रेमसंबंधात जवळीक वाढेल आणि हे नाते मर्यादित राहील. पती-पत्नीमध्येही योग्य सामंजस्य असेल.

खबरदारी – थायरॉईड आणि हार्मोन्सशी संबंधित समस्या वाढू शकतात. एक पद्धतशीर दिनचर्या ठेवा आणि योग्य उपचार घ्या.

लकी रंग – गुलाबी
लकी अक्षर- न
फ्रेंडली नंबर- 8

मिथुन राश‍ी (Gemini)

या बदलत्या वातावरणामुळे आपण केलेले नियोजन आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. परिश्रम आणि आत्मविश्वासामुळे यश तुमच्या जवळ असेल. एखाद्या प्रिय व्यक्तीशी बोलून कोणतीही समस्या सोडविली जाईल.

आज बहुतेक वेळ बाहेरील कामात व्यतीत होईल, परंतु योग्य निकाल न मिळाल्यामुळे निराशा पदरी पडेल. इतरांच्या नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देऊ नका. घराच्या वडीलधाऱ्यांचा आदर आणि सन्मान करण्याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे.

व्यवसायिक स्तरावर कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. यावेळी काही सुधारणेसंबंधित बदल करण्याचीही आवश्यकता आहे. कर्मचार्‍यांच्या कार्यामुळे थोडा त्रास होऊ शकतो. परंतु, तणाव घेण्याऐवजी समजुतदारपणे तोडगा काढणे अधिक योग्य ठरेल.

लव्ह फोकस – कौटुंबिक वातावरण सुखद राहील. प्रेम संबंधात घनिष्ठता वाढेल

खबरदारी – राग आणि उत्तेजनेवर नियंत्रण ठेवा. रक्तदाब इत्यादीची समस्या वाढू शकते.

लकी रंग – केशरी
लकी अक्षर- ला
फ्रेंडली नंबर- 9

कर्क राश‍ी ( Cancer)

ग्रहांचे संक्रमण अनुकूल आहे. समजुतदारीने निर्णय घेतल्यास आणि बहुतेक कामे स्वतःच करण्याचा प्रयत्न केल्यास नक्कीच तुम्हाला यश मिळेल. ठप्प झालेली कोणतीही रक्कम थोडी थोडी प्राप्त होईल, परंतु आर्थिक परिस्थिती चांगली होईल.

सामाजिक उपक्रमांवरही लक्ष द्या. जास्त स्वकेंद्रित असणे देखील चांगले नाही. मुलांचे लक्ष त्यांच्या अभ्यासातून विचलित होत आहे. यावेळी पालकांनी त्यांच्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा.

व्यवसाय क्षेत्रात बरीच स्पर्धा होऊ शकते. पण घाई करू नका आणि काम संयमाने पूर्ण करा. आपल्या कामाच्या गुणवत्तेकडे देखील लक्ष द्या. ऑफिसमध्ये बरीच कामे होतील.

लव्ह फोकस – तुमच्या जोडीदाराशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा. प्रियकर/प्रेयसीची परस्पर समरसता योग्य राहील.

खबरदारी – युरीन इनफेक्शनसारख्या समस्या टाळण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या. यावेळी महिलांनी आपल्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते.

लकी रंग – हिरवा
लकी अक्षर- अ
फ्रेंडली नंबर- 5

सिंह राश‍ी (Leo)

आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. कारण कर्म केल्यास नशिबाला आपोआप बळ मिळेल. समाजातही आदर आणि वर्चस्व कायम राहील. आपल्याला सरकारी सेवानिवृत्त व्यक्तीकडून पाठिंबा आणि योग्य सल्ला मिळू शकेल.

कधीकधी आपले मन विचलित करणारी अवस्था निर्णय घेण्यास थोडी त्रास देऊ शकते. आपण तरी यावर मात कराल. बाहेरील व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे घरात एक छोटीशी गोष्ट मोठ्या समस्येचं स्वरुप धारण करु शकते.

सार्वजनिक व्यवहार, मीडिया, मार्केटिंग यांसारख्या व्यवसायात काही वेग येईल. परंतु आतासाठी कठोर परिश्रम करणे आवश्यक असेल. व्यावसायिक महिलांना यश मिळण्याची दाट शक्यता असते. नोकरीमध्ये प्रवासासंबंधी अधिकृत ऑर्डर मिळू शकते.

लव्ह फोकस – पती-पत्नीमधील संबंध सौहार्दपूर्ण असतील. घराचे वातावरण देखील शिस्तबद्ध आणि सभ्य राहील.

खबरदारी – कोणत्याही प्रकारच्या पोटाशी संबंधित समस्या टाळण्यासाठी आपला आहार संतुलित ठेवा. थोडी काळजी आपल्याला निरोगी ठेवेल.

लकी रंग- लाल
लकी अक्षर- जी
फ्रेंडली नंबर- 2

कन्या राश‍ी ( Virgo)

दिनचर्येशीसंबंधित योजना कोणाबरोबर शेअर करु नका. शांतपणे काम केल्याने तुम्हाला नक्कीच यश मिळेल. युवकांना कोणत्याही स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे.

कधीकधी खूप घाई आणि हट्टी असणे देखील हानिकारक ठरु शकते. या उणिवांची दुरुस्ती करा. जवळच्या नातेवाईकांशी संबंधात तणाव येऊ देऊ नका. कारण या क्षणी मतभेद असल्याचे दिसते आहे.

मालमत्तेसंबंधित व्यवसायात फायद्याची परिस्थिती राहील. पण मार्केटिंगसंबंधित काम आज स्थगित करा. कोणतेही नवीन काम सुरु करण्यापूर्वी आपल्याला त्याबद्दल पूर्ण माहिती मिळणे आवश्यक आहे.

लव्ह फोकस – व्यस्त असूनही तुम्ही तुमच्या कुटुंबाला योग्य वेळ द्याल. परस्पर समरसतेने घराचे वातावरण योग्य राहील.

खबरदारी – कफचा त्रास असलेल्या व्यक्तींनी सध्याच्या वातावरणापासून स्वत: चे रक्षण केले पाहिजे. आरोग्य सुरक्षा नियमांचे गंभीरपणे पालन करा.

लकी रंग – हिरवा
लकी अक्षर- प
फ्रेंडली नंबर- 5

तूळ राश‍ी (Libra)

एखादे विशिष्ट कामे पूर्ण करण्यात तुमची मेहनत यशस्वी होईल. नित्यक्रमापासून थोडा वेळ काढून काही वेळ तुमच्या आवडत्या कामांमद्ये घालवा. यामुळे मानसिक शांतता कायम राहील. तसेच राजकीय संपर्क बळकट करण्यावर भर द्या.

घराशी संबंधित कोणताही वाद आपापसात बसून समजावून सांगण्याने सुटेल. दिवसाच्या सुरुवातीच्या काळात आपली महत्त्वपूर्ण कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, कारण ग्रहांची स्थिती दुपारनंतर काही अडथळे आणू शकते.

यावेळी, कामाच्या ठिकाणी व्यवसायासंबंधी कुठला करार होऊ शकतो. म्हणून अनावश्यक गोष्टींकडे लक्ष देऊ नका आणि आपल्या कामावर आपली संपूर्ण क्षमता लावा. तसेच कर्मचार्‍यांचे योग्य सहकार्यही असेल.

लव्ह फोकस – कामाबरोबरच कुटुंबाची काळजी आणि सहकार्यातही वेळ घालवणे आवश्यक आहे. प्रियकर आणि प्रेयसीला भेटण्याची संधी मिळू शकेल.

खबरदारी – जास्त काम केल्यामुळे डोकेदुखी आणि मानसिक तणाव येऊ शकतो. ध्यान आणि मेडिटेशन करण्यात थोडा वेळ घालवा.

लकी रंग- लाल
लकी अक्षर- स
फ्रेंडली नंबर- 8

वृश्चिक राश‍ी (Scorpio)

घराची व्यवस्था अधिक चांगली करण्यासाठी काही योजना तयार केल्या जातील. व्यस्त असूनही, आपल्या आवडीच्या कामांसाठी आपल्याला वेळ मिळेल. घरातील ज्येष्ठ सदस्यांचा अनुभव आणि मार्गदर्शनानंतर सौभाग्य लाभेल.

यावेळी कोणत्याही कामासाठी कर्ज घेण्याचे टाळा. आपल्या स्वत:च्या अपेक्षांवर नियंत्रण ठेवणे कधीही बरे. शेजार्‍यांशी वाद घालण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा.

यावेळी, केवळ कार्यक्षेत्रातील सद्यपरिस्थितीवर लक्ष केंद्रित करा. कोणत्याही प्रकारच्या भविष्यातील कामांची योजना तयार करण्यासाठी वेळ अनुकूल नाही. कार्यस्थळाची अंतर्गत व्यवस्था अद्याप आणखी चांगली करण्याची गरज आहे.

लव्ह फोकस – घराचे वातावरण सुखद आणि आनंददायी राहील. प्रेम संबंधांमध्ये काही गैरसमज निर्माण होऊ शकतात.

खबरदारी – कामाच्या ओझ्यामुळे तुम्हाला कंटाळा आणि अशक्तपणा जाणवेल. अन्न आणि विश्रांतीची काळजी घेणे देखील आवश्यक आहे.

लकी रंग – निळा
लकी अक्षर- ब
फ्रेंडली नंबर- 6

धनू राश‍ी (Sagittarius)

कोणताही निर्णय घेण्यासाठी घाई करु नका. जर तुम्ही विचारपूर्वक कार्य केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शनही मिळेल. घरातील कोणतीही वादग्रस्त बाब वडीलधाऱ्यांच्या मदतीने सोडविली जाईल.

कोणत्या प्रकल्पात इच्छित परिणाम न मिळाल्यामुळे मुलं निराशा होतील. यावेळी मुलांचे मनोबल टिकविण्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचे जोखीम घेण्याचा प्रयत्न करु नका. यामुळे नुकसान देखील होऊ शकते.

व्यवसायातील कामे सामान्य होतील. आज नवीन ऑर्डर किंवा डील फायनल केली जाऊ शकते. मार्केटिंगचे काम आत्ताच पुढे ढकलून द्या आणि फक्त कार्यक्षेत्रातील प्रलंबित काम पूर्ण करण्यात वेळ घालवा. अज्ञात व्यक्तींच्या संपर्कात येण्याचे टाळा.

लव्ह फोकस – पती-पत्नीमधील भावनिक संबंध दृढ असतील. प्रेम प्रकरण बाहेर जाहीर होऊ शकतात.

खबरदारी – काहीजणांना शारीरिक दुर्बलता जाणवेल. नकारात्मक प्रवृत्ती असलेल्यांपासून अंतर ठेवा.

भाग्याचा रंग – पिवळा
लकी अक्षर- न
फ्रेंडली नंबर- 4

मकर राश‍ी (Capricorn)

कोणत्याही धार्मिक संस्थेशी जुळणे आणि सहकार्य केल्याने आपल्याला आत्मिक आनंद मिळेल. मालमत्तेशी संबंधित कोणतेही नियोजन सुरु असल्यास त्याला मूर्तरुप देण्याची आज योग्य वेळ आहे. तरुणांना त्यांच्या परिश्रमाचे योग्य फळ मिळेल.

बाहेरच्या किंवा मित्रांचा सल्ला तुमच्यासाठी हानिकारक ठरु शकतो. दुसर्‍याच्या बोलण्यावर विश्वास न करता आपल्या निर्णयाला सर्वोपरी ठेवणे कधीही चांगले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करु नये.

नवीन कामाशी संबंधित बनविलेल्या योजनेवर लक्ष केंद्रित करा आणि त्यावर कार्य करा. येणाऱ्या काळात हे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. आपल्याला जुन्या पार्टींकडून योग्य ऑर्डर मिळण्याची अपेक्षा आहे.

लव्ह फोकस – पती-पत्नीमध्ये काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. परस्पर समजुतदारपणा दाखवून ते सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल.

खबरदारी – डोकेदुखी आणि मायग्रेनसारख्या समस्यांपासून आराम मिळविण्यासाठी सर्वप्रथम, आपला नित्यक्रम आणि आहार नियोजित ठेवा.

लकी रंग- लाल
लकी अक्षर- ब
फ्रेंडली नंबर- 5

कुंभ राश‍ी (Aquarius)

धार्मिक व्यक्तींशी संभाषण केल्याने आपल्या विचारधारेमध्ये सकारात्मक बदल येईल. आपल्या संतुलित नित्यकर्मामुळे सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. परस्पर मतभेद देखील आपल्या समजुतीने सोडवला जाईल.

आपली महत्त्वपूर्ण कागदपत्रे आपल्याकडेच ठेवा. मुलाच्या कोणत्याही नकारात्मक कृतीमुळे आपल्या सन्मान कमी होऊ शकतो. पण त्यांना चांगल्या पालकांप्रमाणे मार्गदर्शन करा.

दैनंदिन उत्पन्न वाढेल. मोठे कंत्राट मिळण्याचीही शक्यता आहे. परंतु कर्मचार्‍यांच्या कामांवर लक्ष ठेवणे देखील आवश्यक आहे. केवळ आपले काही विरोधक आपल्यासाठी समस्या निर्माण करु शकतात. कार्यालयीन वातावरण चांगले असेल.

लव्ह फोकस – कौटुंबिक वातावरण सुखद असेल. मित्राला भेटल्याने जुन्या आनंदी आठवणी स्मरण होतील.

खबरदारी – घशात संक्रमण आणि ताप यांसारख्या समस्यांपासून मुक्तता मिळविण्यासाठी सर्वप्रथम पद्धतशीर दिनचर्या ठेवा आणि आयुर्वेदाचा वापर करा.

लकी रंग – जांभळा
लकी अक्षर – अ
फ्रेंडली नंबर – 2

मीन राश‍ी (Pisces)

गेल्या काही काळापासून रखडलेली कामे अत्यंत सहजरित्या आणि सोप्या पद्धतीने सोडविली जातील. एखाद्या विश्वासू व्यक्तीच्या सल्ल्यानुसार आणि समर्थनामुळे तुमचा आत्मविश्वास आणखी वाढेल. वेळ अनुकूल आहे.

यावेळी उधळपट्टी टाळा. अचानक असे काही खर्च येतील, ज्यावर कपात करणे शक्य होणार नाही. कोणतेही काम करण्यापूर्वी, त्यातील चांगल्या-वाईट दोन्ही बाजुंचादेखील विचार करणे आवश्यक आहे. मुलांबरोबरही थोडा वेळ घालवा.

व्यवसायिक कामे सुरळीत सुरु राहतील. मालमत्तेचे सौदे करताना काळजी घ्या. आपण कोणत्याही नवीन कामात रस घेत असाल तर त्याबाबत गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.

लव्ह फोकस – नवरा-बायकोच्या नात्यात मधुरता येईल. बाहेरच्या व्यक्तीला आपल्या विवाहित जीवनात हस्तक्षेप करु देऊ नका.

खबरदारी – अपचन किंवा भूक न लागणे यांसारख्या समस्या तुम्हाला त्रास देतील. आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.

भाग्याचा रंग – पिवळा
लकी अक्षर – जी
फ्रेंडली नंबर – 6

Rashifal Of 08th June 2021 Horoscope Astrology Of Today

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Horoscope 7th June 2021 | मीन राशीचं गुपित उघड होऊ शकतं, कन्या राशीच्या व्यक्तींनी धोकादायक कामं टाळावी, जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य

Zodiac Signs | या चार राशीच्या व्यक्तींच्या पोटात कुठलंही गुपित राहत नाही, सिक्रेट सांगताना चारदा विचार करा