वैदिक दिनदर्शिकेनुसार सूर्य देव हे सध्या मिथुन राशीत विराजमान आहेत. 16 जुलै रोजी रात्री 11:08 वाजता सूर्य देव हे आपली दिशा बदलून कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. त्यावेळी शनी हे कुंभ राशीत आहेत. सूर्य गोचर मुळे दोन्ही ग्रह सहाव्या आणि आठव्या भावात असल्याने षडाष्टक योग तयार होईल. जे अशुभ मानले जाते. यामुळे माणसाच्या जीवनात दुःख, चिंता, रोग आणि विविध संकटे येतात. चला जाणून घेऊया यावेळी षडाष्टक योगामुळे कोणत्या राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल.
कुंभ
नोकरी करणाऱ्या लोकांच्या जीवनात काही आर्थिक अडचणी येऊ शकतात. आरोग्याच्या बाबतीतही चढ-उतार होऊ शकतो. विद्यार्थ्यांना देखील अडचणींचा सामना करावा लागू शकतो. व्यावसायिकाला व्यवसायात मोठे नुकसान होऊ शकते.
मीन
नोकरी करणाऱ्या लोकांच्या कामात दबावामुळे त्रस्त राहतील. व्यावसायिकांना हवा तसा नफा मिळणार नाही, त्यामुळे तुमची निराशा होईल. विद्यार्थ्यांचे मित्रच त्यांच्यासाठी अडचणीचे कारण बनू शकतात.
वृषभ
नोकरदार वर्गाचे मित्रच त्यांच्या महत्त्वाच्या कामात अडथळे निर्माण करण्यात यशस्वी होतील. व्यावसायिक कामाच्या दबावामुळे तणावात राहतील, त्यामुळे त्यांचे आरोग्यही बिघडू शकते. नात्यात असलेल्या लोकांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो.
धनु
विवाहित लोकांमधील संबंध खराब होऊ शकतात, ज्यामुळे तणाव निर्माण होईल. व्यावसायिकाच्या सुख-सुविधांमध्ये घट होईल, त्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. विद्यार्थी मित्रांच्या वाईट संगतीत पडू शकतात, ज्यामुळे त्यांच्या पालकांना तणाव निर्माण होईल.
मेष
विवाहितांना खर्चात वाढ झाल्यामुळे पैशाची कमतरता जाणवेल. वैवाहिक जीवनात समस्या वाढू शकतात. आईच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. फुफ्फुसाच्या समस्यांमुळे त्रस्त राहू शकता.
अस्वीकरण: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. टीव्ही ९ याला दुजोरा देत नाही.