Surya Grahan 2022 या राशींसाठी सूर्यग्रहण ठरणार लक्की, मालामाल होण्याची हीच ती वेळ…

| Updated on: Apr 30, 2022 | 3:21 PM

असे म्हटले जात आहे की जर धनु राशीचे लोक व्यवसायाशी संबंधित असतील तर सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे त्यांना धनाचा लाभ निश्चितपणे मिळू शकतो. धनु राशीच्या लोकांच्या संपत्तीसोबतच कौटुंबिक सुख देखील मिळू शकते. तुमचे सामर्थ्य वाढेल आणि या ग्रहणामध्ये तुमचे शत्रू देखील तुमच्यापासून दूर जातील. मित्र मानला जातो त्यामुळे या राशीच्या लोकांना लाभ होऊ शकतो.

Surya Grahan 2022 या राशींसाठी सूर्यग्रहण ठरणार लक्की, मालामाल होण्याची हीच ती वेळ...
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : वर्षातील पहिले सूर्यग्रहण (Surya grahan) 30 एप्रिल 2022 रोजी म्हणजेच आज होणार आहे. विशेष म्हणजे या ग्रहणासोबतच शनि अमावस्या देखील आहे. खरे तर वैशाख महिना सुरू आहे आणि शनिवार त्याची पहिली अमावस्या आहे. त्यामुळे या दिवसाला शनी अमावस्या असे संबोधले जाते. असे म्हटले जाते की या काळात देव संकटात असतो, त्यामुळे या काळात कोणतेही शुभ कार्य अजिबात केली जात नाहीत. सूर्यग्रहण असले तरीही भारतातील लोकांसाठी हे ग्रहण (Grahan) शुभ किंवा अशुभ राहणार नाहीये. कारण हे सुर्यग्रहण आपल्या देशामध्ये दिसणारच नाहीये. परंतु ज्या देशात हे सूर्यग्रहण दिसणार आहे अशा लोकांना त्याचे सकारात्मक (Positive) आणि नकारात्मक परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

धनु

असे म्हटले जात आहे की जर धनु राशीचे लोक व्यवसायाशी संबंधित असतील तर सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे त्यांना धनाचा लाभ निश्चितपणे मिळू शकतो. धनु राशीच्या लोकांच्या संपत्तीसोबतच कौटुंबिक सुख देखील मिळू शकते. तुमचे सामर्थ्य वाढेल आणि या ग्रहणामध्ये तुमचे शत्रू देखील तुमच्यापासून दूर जातील. मित्र मानला जातो त्यामुळे या राशीच्या लोकांना लाभ होऊ शकतो. म्हणजेच हे ग्रहण धनु राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.

कर्क

कर्क राशींच्या लोकांसाठीही हे ग्रहण शुभ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांनी नोकरी केल्यास त्यांच्या कामाच्या ठिकाणी वाढ होऊ शकते. या लोकांना विकासाच्या चांगल्या संधी मिळू शकतात आणि समाजात त्यांची प्रतिमाही चांगली होऊ शकते. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे आणि धनलाभही मिळण्याची शक्यता आहे. कर्क राशीचे जे लोक नोकरी करतात त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधीच ठरणार आहे.

वृषभ

या राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण लक्की ठरू शकते. आर्थिक लाभ मिळू शकतात आणि कामातील अडथळेही दूर होऊ शकतात. वृषभ राशीचे लोक जर व्यापारी असतील तर त्यांना धनलाभ तर होईल. त्याच बरोबर इतर व्यावसायिक भागीदारांशी त्यांचे संबंध चांगले होऊ शकतात. या काळात तुम्ही कोणतीही नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ग्रहणाचा वेळी करा आणि फायदा मिळवा.