मुंबई : जेव्हा मुले अधिक प्रमाणात वाचन करतात, तसेच त्या वाचनाच्या माध्यमातून आपली लेखणाची आवड जोपासतात, त्यावेळी मुलांची स्वप्ने आकार घेतात, असे म्हटले जाते. अधिक प्रमाणात वाचन केल्यामुळे मुले परिपक्व बनतातच, त्याचप्रमाणे त्यांची करिअरमध्ये अनेक संधी मिळवण्याचीही क्षमता तयार होते. अशाच प्रयत्नांतून अनेक जण आपले करिअर घडवतात. करिअरमध्ये यश मिळवण्याचे काहींचे स्वप्न खूप लवकर पूर्ण होते, तर काही लोकांना आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. विशेषत: सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात करिअर करणे हे एक मोठे आव्हान बनले आहे. कारण सध्याच्या महामारीच्या संकट काळात अनेक लोकांचे करिअर सुरू होण्याआधीच थांबले आहे. काही जण आपले करिअर टिकवण्यासाठी रात्रंदिवस संघर्ष करत आहेत. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक प्रभावी उपाय सांगितले गेले आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या स्वप्नाप्रमाणे करिअरमध्ये मोठी भरारी घेऊ शकता. (This solution would be very lucky for a career; know the solution to make your dream come true)
1. जर तुमचे करिअर सुरू होण्याआधीच थांबले असेल तर तुम्ही प्रत्येक रविवारी एका गाईला गुळासह भाकरी देणे सुरू केले पाहिजे. सलग 11 रविवारी हा उपाय करा. श्रद्धा आणि विश्वासाने हा उपाय केल्याने करिअरमध्ये नक्कीच यश मिळेल. बेरोजगारांना रोजगार मिळेल.
2. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी बुधवारी घरात श्वेतार्क गणपती आणा आणि घराच्या पूजेच्या ठिकाणी त्या गणपतीची विधीवत प्रतिष्ठापना करा. तुमची इच्छा असल्यास तुम्ही आपल्या तिजोरीमध्ये श्वेतार्क गणपतीची प्रतिष्ठापना करू शकता आणि दररोज त्याची पूजा करू शकता. करिअरमध्ये यश मिळवण्याचा हा एक अतिशय सिद्ध आणि प्रभावी मार्ग आहे, ज्याद्वारे करियरसह आर्थिक समृद्धी मिळेल.
3. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी शुक्रवारी मोर पंख तुमच्या घरात आणा. ते तुमच्या पूजेच्या घरात ठेवा. धूप-दीप दाखवून रोज त्याची पूजा करा. जर तुम्ही रोज पूजा करू शकत नसाल तर किमान शुक्रवारी तरी त्याची विशेष पूजा करा.
4. जर तुम्ही एखाद्या मुलाखतीसाठी घराबाहेर जात असाल किंवा तुमचे करिअर घडवण्यासाठी एखाद्या व्यक्तीची मदत घेत असाल. तसेच जर तुम्हाला तुमच्या प्रयत्नांना 100% फळ मिळावे असे वाटत असेल, तर यासाठी तुम्ही घरातून बाहेर पडताना तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर पूर्वेकडे नागकेसर ठेवायला हवे. नंतर तुमचे जे काही इच्छित काम असेल ते बोलत पुढे जा. पुढे जाताना पहिले उजवे पाऊल टाकायला विसरू नका. (This solution would be very lucky for a career; know the solution to make your dream come true)
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक श्रद्धांवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. सर्वसाधारण हित लक्षात घेऊन येथे सादर करण्यात आले आहे.)
Solapur Corona Update : सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यात 13 ऑगस्टपासून कडक निर्बंध! कारण काय? https://t.co/MQvEJhoDOk @SpSolapurRural @bharanemamaNCP @OfficeofUT @AjitPawarSpeaks #coronaguidelines #solapurcollectoroffice #SolapurCoronaUpdate #Pandharpur #Madha #Malshiras #sangola
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 8, 2021
इतर बातम्या
Video | हेल्मेट घालून थाटात निघाली, मध्येच कारला धडकली, थरारक अपघाताचा व्हिडीओ व्हायरल
भगवान शिवशंकरांनी आपल्या गळ्यात नाग का धारण केला? जाणून घ्या यामागील कारण