मुंबई : तसं तर गप्पा, चर्चा, बोलणं तर अनेक जण करतात. पण प्रत्येकाकडे इम्प्रेस करण्याचा गुण असेलच असं नाही. वाकपटुता हा जन्मजात गुण मानला जातो. बोलण्याची अशी खास कला असणाऱ्या लोकांचं व्यक्तीमत्व इतरांपेक्षा वेगळं असतं. ते तसं ठेवण्याचा कायम प्रयत्न करतात. एवढच नाही तर ते ज्यावेळेसही कुणाशी संवाद साधतात त्यावेळेस शब्दांची निवड खुप काळजीपुर्वक करतात. त्यामुळेच ऐकणारे त्यांचे फॅन होतात. ज्योतिष शास्त्रानुसार अशा तीन राशी आहेत, ज्या फक्त लोकांचच मन जिंकतात असं नाही तर मुलींनाही खास इम्प्रेस करतात…. (Three Zodiac Signs boys Ability to impress Girls)
मिथून राशीच्या लोकांमध्ये हा गुण खच्चून भरलेला असतो. ही मंडळी जेवढी मृदूभाषी असतात, तेवढेच ते दिसायला एकदम साधे सुधे वाटतात. यांच्या बोलण्यावर कुणीही सहज भाळतं. लोक अशांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात. मिथून राशीचे मुलं हे आत्मविश्वासू असतात आणि एकदा जर एखादी गोष्ट साध्य करायची ठरवलं तर ते मिळवल्याशिवाय शांत होत नाहीत. त्यासाठी त्यांना खोटं बोलावं लागलं तर ते त्याचीही पर्वा करत नाहीत. त्यांचा साधासुधा चेहरा पाहुन आणि आत्मविश्वास बघून कुणाला ते खोटं बोलत असल्याचाही पत्ता लागत नाही.
तुला राशीचे लोक हे खुप रोमँटीक असतात. त्यांची बोलण्याची पद्धतच अशी असते. की मुली सहज इम्प्रेस होतात. समोरच्याला खुश करण्यासाठी तुला राशीचे मुलं एकदम पटेल असं बोलतात. ह्या मंडळींना खरोखर ओळखायचं असेल तर त्यांच्यासोबत काही काळ राहिल्याशिवाय ते कळत नाहीत.
कुंभ राशीचे मुलं हे खुप बुद्धिमान आणि स्टायलिश असतात. संवाद करण्यात ते एकदम पट्टीचे असतात. एकदा ते तुमच्याशी बोलायला लागले तर त्यांच्यावर अविश्वास टाकण्याचं काही कारणच उरत नाही. मुलीही त्यांच्या ह्या क्वालिटीनं इम्प्रेस होतात. कुंभ राशीचे मुलं हे धाडसी असतात, आत्मविश्वासू असतात. परिस्थिती कुठलीही असू द्या, तिचा सामना करण्याचं काळीज त्यांच्याकडे असते. ते जर एखाद्याशी जोडले गेले तर ते पूर्ण मनानं जोडले जातात.
(Three Zodiac Signs boys Ability to impress Girls)
Chanakya Niti: अशी तीन कामं, जे तुमचा मान सन्मान कमी करतात, कधीच करु नका!https://t.co/TOnKpFKkjk#Chanakya #ChanakyaNiti #AcharyaChanakya
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2021
हे ही वाचा :
Zodiac Signs | या तीन राशींना लवकरच मिळणार प्रमोशन, तुमची राशी तर नाही यात
Zodiac Signs | या तीन राशींच्या व्यक्ती असतात खूप फ्लर्टी, योग्य पारख करुनच विश्वास ठेवा