मुंबई : आजचे राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे नाते, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. हे राशीभविष्य (Horoscope) वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकाल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानां (Challenge)चा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनंदिन राशीभविष्य वाचून तुम्ही परिस्थितीसाठी तयार होऊ शकता.
मानसिक सुख शांति राहील. कामं वेळेवर पूर्ण होतील त्याने समाधान लाभेल. मनात चाललेला गोंधळ कमी होईल. विद्यार्थी तसंच युवकांचा त्यांच्या मित्रांसोबत तसंच गुरुंच्या सानिध्यात वेळ जाईल.
पण, हे लक्षात ठेवा जी कामं तुम्हाला साधी आणि सहज वाटत आहेत. त्यात अडचणी येतील. नकारात्मक विचारांमुळे तुम्ही तुमच्या ध्येयापासून दूर जात आहात. दिवसातील काही वेळ चिंतन मनन करण्यात घालवा.
फायनान्स तसंच आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. सरकारी कामाच्या बाबतीत सफलता मिळेल. व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांच्या विरोधात चांगले परिणाम मिळतील. नोकरीत बॉस आणि अधिकारी तुमच्या कामाने संतुष्ट असतील.
लव फोकस – कामाच्या व्यापातून घरासाठी वेळ काढ. घरात कोणतंतरी शुभ कार्य होण्याची शक्यता.
खबरदारी – साथीच्या आजारपणा पासून सावधान. सध्या तुमची प्रकृती सांभाळणं गरजेचं आहे.
शुभ रंग – लाल
भाग्यवान अक्षर – न
अनुकूल क्रमांक – 9
दिनक्रमात काहीतरी नाविन्य आणाल. ज्यात कुटूंबातील लोकांचे सहकार्य मिळेल. संपत्ती संबंधी विवाद कोणाच्या मध्यस्थतातून सोडविण्याचा प्रयत्न करा. घरातील कोणत्यातरी व्यक्तीच्या लग्नाची तयारी कराल.
विनाकारण कोणाबरोबर वाद घालू नका. तुमच्या रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नाहीतर वाद -विवाद भांडणाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. कोणाला भेटताना दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर येऊ नका. निर्णय समजूतदारपणे करा.
व्यवसायात परिस्थिती तुमच्या बाजूने असेल. राजकीय कामात सफलता मिळेल. तरूणांना जॉब संबंधी शुभ बातमी मिळेल. पण, यावेळी तुमच्या व्यावसायिक निर्णयांना गुप्त ठेवणं गरजेचं आहे.
लव फोकस – वैवाहिक जीवनात सुख. प्रेम प्रकरणामुळे तुमच्या करिअर मध्ये दुर्लक्ष करू नका.
खबरदारी – प्रकृती बाबत सावधान आणि सतर्क राहणं गरजेचं आहे. नकारात्मक संगत आणि सवयीपासून दूर रहा.
शुभ रंग – सफेद
भाग्यवान अक्षर – क
अनुकूल क्रमांक – ६
जर तुम्ही जागा बदलण्याची योजना आखत असाल, तर आजच त्याच्याशी संबंधित कृती सुरू करण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. तुमची दिनचर्या व्यवस्थित ठेवल्याने तुमच्या आरोग्याला आणि व्यक्तिमत्त्वाला अधिक सौंदर्य मिळेल. सामाजिक कार्यातही थोडा वेळ घालवाल.
जर तुम्ही जागा बदलण्याची योजना आखत असाल, तर आजच त्याच्याशी संबंधित कृती सुरू करण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. तुमची दिनचर्या व्यवस्थित ठेवल्याने तुमच्या आरोग्याला आणि व्यक्तिमत्त्वाला अधिक सौंदर्य मिळेल. सामाजिक कार्यातही थोडा वेळ घालवाल.
पैशाच्या व्यवहाराबाबत जवळच्या नातेवाईकाशी संबंध बिघडू शकतात, त्यामुळे सावधगिरी बाळगा. करिअरबाबत गाफील न राहता तरुणांनी आपल्या ध्येयाकडे लक्ष दिले पाहिजे.
लव फोकस – कौटूंबिक सुख शांतीच्या दृष्टीने वेळ उत्तम. प्रेमप्रकरणात गैरसमज होऊ देऊ नका.
खबरदारी – वाहनं सावकाश चालवा.
शुभ रंग – हिरवा
भाग्यवान अक्षर – क
अनुकूल क्रमांक – 5