कुंभ राशीचं आजचं राशीफळ, 26 जुलै : सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यात आपले विशेष योगदान राहील, नोकरी-धंद्याच्या ठिकाणी सर्व कामे सुरळीत सुरू राहील

| Updated on: Jul 26, 2021 | 12:57 AM

बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी आपल्या खाण्याच्या सवयी बदलणे आवश्यक आहे. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या.

कुंभ राशीचं आजचं राशीफळ, 26 जुलै : सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यात आपले विशेष योगदान राहील, नोकरी-धंद्याच्या ठिकाणी सर्व कामे सुरळीत सुरू राहील
Zodiac Signs
Follow us on

Horoscope 26July, 2021:

तुमचा आजचा दिवस कसा असणार आहे? कुंभ राशीवाल्यांना आज काय काय उपाय करायला हवेत ज्यामुळे त्यांचा दिवस शुभ असेल. एवढच नाही तर काय केलं पाहिजे म्हणजे आजच्या दिवशी नुकसान होणार नाही. कुठल्या गोष्टींपासून सावध राहीलं पाहिजे? आजच्या दिवशी तुमच्यासाठी कोणता रंग, कोणता नंबर आणि कोणतं अक्षर शुभ असेल हे सगळं जाणून घेऊयात. पाहुयात 26 जुलैचं राशीफळ काय आहे.

Kumbha Rashifal(कुंभ राशीफळ) 26 जुलै-

सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यात आपले विशेष योगदान राहील. प्रत्येक काम सहजतेने करण्याच्या तुमच्या विशिष्ट हातोटीमुळे आजही तुमचे कार्य सहजपणे पार पडेल. घराच्या देखभाल योजनादेखील केल्या जातील. वास्तूच्या नियमांचेही अवश्य पालन करा.

कधीकधी घाईगडबड आणि निष्काळजीपणा तुमच्या सिद्धीला जात असलेल्या कामामध्ये अडथळा आणू शकतो. उणीवा दूर करा. विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊन मौजमस्ती करण्याकडे लक्ष जाईल. ज्याचा त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो.

नोकरी-धंद्याच्या ठिकाणी सर्व कामे सुरळीत सुरू राहील. पेमेंट वेळेवर पूर्ण होतील. नोकरदार महिलांना त्यांच्या कामाबद्दल थोडा ताण जाणवेल. घर आणि व्यवसायात सुसंवाद राखण्यासाठी त्यांना अडचणींचा सामना करावा लागेल.

प्रेमसंबंध – वैवाहिक जीवन आनंदी राहील. प्रेम संबंधांमध्येही मर्यादा असतील.

खबरदारी : बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी आपल्या खाण्याच्या सवयी बदलणे आवश्यक आहे. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या.

भाग्यवान रंग – गुलाबी
भाग्यवान अक्षर – न
अनुकूल क्रमांक – 9

 

लेखक अजय भांबी-
डॉ. अजय भांबी हे ज्योतिषमधलं नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. डॉ. भांबी हे नक्षत्र ध्यानचे जाणकार आणि उपचारकर्ता आहेत. एक ज्योतिषी म्हणून अजय भांबींना जग ओळखतं. इंग्रजी आणि हिंदी भाषेत अनेक पुस्तकांचं लिखाण केलं. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांसाठी लेखही लिहितात. थायलंडच्या उपपंतप्रधानांकडून बँकॉकमध्ये त्यांना World Icon Award 2018 सन्मानित करण्यात आलं आहे.