आपण जेव्हा एखादी नवीन गोष्ट घरात आणतो, तेव्हा वास्तुशास्त्रानुसार त्याची मांडणी करतो. ज्यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी निर्माण होईल. तसेच घरामध्ये आनंद वातावरण राहण्यासाठी अनेक जण वास्तूशास्त्रात सांगितल्याप्रमाणे उपाय करत असतात. वास्तूशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत. ज्या एका व्यक्तीकडून मागून घेऊन त्याचा वापर केल्यास त्या वस्तूबरोबर आपल्या घरामध्ये नकारात्मकता आणि वास्तुदोष वाढवतात. अनेक लोकांना इतरांच्या वस्तू उधार मागून घालण्याची सवय असते. पण असे करणे वास्तूनुसार अशुभ मानले जाते. या वस्तू कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.
कपडे : इतर व्यक्तीचे कपडे मागून कधी घालू नये. याचे कारण म्हणजे कपड्यांमध्ये सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा असते. जर तुम्ही इतरांचे कपडे उधार घेऊन किंवा एकमेकांना शेअर करून घालत असाल, तर त्यातून एका व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा दुसऱ्या व्यक्तीकडे जाते. त्यामुळे कोणाकडूनही उधार घेऊन कपडे घालू नका.
अंगठी : इतर दुसऱ्या व्यक्तीची अंगठी कधीही मागून घालू नये. मग ती अंगठी कोणत्या धातूची किंवा रत्नाची असली, तरी परिधान करणे टाळा. असे केल्याने आपण कळत-नकळत आपल्याला ग्रहदोषासारखा समस्यांचा धोका निर्माण होऊ शकतो.
घड्याळ : असे म्हटले जाते की व्यक्तीचे नशीब घड्याळाशी निगडीत असते. एखाद्या व्यक्तीने परिधान केलेले घड्याळ केवळ वेळच नाही, तर त्याचा चांगला आणि वाईट काळही सांगते. त्यामुळे कधीही दुसऱ्या व्यक्तीचे घड्याळ घालू नये.
फूटवेअर :चप्पल, बूट यासारखे फुटवेअर बदलणे देखील तुम्हाला महागात पडू शकते. धार्मिक मान्यतेनुसार शनी पैशात राहतो. अशावेळी जर तुम्ही दुसऱ्याचे बूट आणि चप्पल उधार घेऊन घातलीत तर ती व्यक्ती तुमच्यावर संकट आणू शकते.
( डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)