Shukra Gochar 2023 : नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी शुक्र ग्रह दुसऱ्यांदा भ्रमण करणार आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला संपत्ती आणि कीर्तीचे कारण मानले जाते. अशा स्थितीत काही राशींना लव्ह लाईफमध्ये लाभ मिळेल तर काही राशींच्या लोकांच्या संपत्तीत वाढ होईल. 30 नोव्हेंबर रोजी शुक्र कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र सकाळी 01:14 वाजता तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्याचा प्रभाव सकारात्मक आणि नकारात्मक अशा सर्व राशींवर दिसून येईल.
मेष आणि मिथुन राशीच्या लोकांना शुक्र गोचरमुळे त्यांच्या प्रेम जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील. मेष राशीच्या लोकांना त्यांच्या जोडीदाराकडून अपार प्रेम मिळेल, मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यात प्रेमाचा प्रवेश होईल. जर तुम्ही खरे प्रेम शोधत असाल तर तुमचा शोध पूर्ण होणार आहे.
शुक्र गोचरमुळे कन्या राशीला विशेष लाभ होणार आहे. त्यांची प्रगती होणार आहे. आर्थिक फायदा देखील होताना दिसत आहे. जोडीदाराचं प्रेम आणि सहकार्य दोन्ही मिळणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी देखील हा काळ चांगला असणार आहे.
तूळ राशीच्या लोकांचा मान वाढणार आहे. आरोग्याच्या बाबतीही त्यांना फायदा होऊ शकतो. संपत्तीतही वाढ होणार आहे. कला क्षेत्राशी निगडीत लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. मकर राशीच्या लोकांचीही प्रतिष्ठा वाढणार आहे.
शनिदेव हे सध्या कुंभ राशीत विराजमान आहेत. कुंभ राशीच्या लोकांसाठी साडे सतीचा पहिला चरण सुरू आहे. पण शुक्र गोचरमुळे कुंभ राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळणार आहे.
अस्वीकरण-”या लेखात दिलेली माहितीच्या विश्वासार्हतेची हमी दिलेली नाही. ही माहिती विविध माध्यमांतून/ज्योतिषशास्त्र याच्यातून संकलित करून देण्यात आली आहे.