मुंबई : मेष आणि वृषभ राशींच्या लोकांचा आठवडा कसा जाईल? या आठवड्यात (Week) कोणते उपाय करावेत, जेणेकरून तुमचा काळ शुभ राहील. याशिवाय त्या कोणत्या गोष्टी आहेत, हे लक्षात ठेवून तुम्ही या आठवड्यात होणारे नुकसान (Damage) टाळू शकता. यासोबतच या काळात कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी. या आठवड्यात कुठल्या गोष्टींपासून दूर राहवे हे देखील तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. विशेष म्हणजे या आठवड्यात मेष आणि वृषभ राशींचा (Zodiac) लोकांनी काय करायला हवे हे देखील आपण बघणार आहोत.
आठवड्याची सुरुवात संघर्षाने सुरू होणार!
20 ते 26 मार्च हा आठवडा मेष राशींच्या लोकांसाठी संमिश्र जाईल. घरामध्ये आणि व्यवसायात योग्य सुसंवाद राखण्यास मदत होईल. कुटुंबाची काळजी आणि देखभाल करण्यासाठी तुमचे योग्य योगदान असेल. तुमची सकारात्मक वृत्ती कठीण काळात सर्वांना बळ देईल. आठवड्याच्या सुरुवातीला संघर्षाची परिस्थिती निर्माण होईल, तरीही तुम्ही परिस्थितीला अत्यंत कुशलतेने सामोरे जाल. काही जवळच्या नातेवाईकांकडूनच तुमच्यासाठी समस्या येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या मेहनतीनुसार व्यवसायात योग्य फळ मिळेल, परंतु सरकारी नोकरांशी व्यवहार करताना काळजी घ्या. वादात पडू नका.
समस्या वाढण्याची देखील शक्यता
वृषभ राशींच्या लोकांचा हा आठवडा कामामध्ये आणि व्यसस्तापूर्ण असणार आहे. व्यस्तता असूनही स्वत:साठीही थोडा वेळ काढणे आवश्यक आहे. जीवनाला सकारात्मक दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला उत्तम वातावरण मिळेल. घराच्या देखभालीशी संबंधित कामातही तुम्हाला रस राहील. धार्मिक आणि सामाजिक कार्यातही कल राहील. या आठवड्यात काही समस्याही राहतील.
कामांमध्ये इतरांचा हस्तक्षेप टाळाच
इतरांच्या बोलण्यावर विसंबून न राहता स्वतःच्या निर्णयाला प्राधान्य द्या. आणि तुमच्या वैयक्तिक कामांमध्ये कोणालाही हस्तक्षेप करू देऊ नका. वेळेनुसार दिनक्रम बदलणेही आवश्यक आहे. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत, परंतु तरीही आवश्यकतेनुसार काम चालू राहील. संयमाने काम करण्याची हीच वेळ आहे. तुमचा विश्वास असलेल्या लोकांच्या संपर्कात राहा. कार्यालयीन कामकाज सुरळीत चालू राहील.
संबंधित बातम्या :
Numerology | रॉयल कारभार, बुद्धिमान, सूर्याप्रमाणे तेजस्वी मानले जातात शुभ अंक 5 असणारे लोक