बंगळुरु : भारताच्या चांद्रयान-3 मिशनच्या यशाच सगळे कौतुक करतायत. त्याचवेळी भारताने फक्त 615 कोटी रुपयांमध्ये मिशन यशस्वी कसं केलं? यामुळे अनेक देश हैराण आहेत. जिथे एका चित्रपटाच्या निर्मितीचा खर्च चांद्रयान-3 च्या बजेटपेक्षा दुप्पट असतो, त्यापेक्षा पण कमी पैशात भारताने चांद्रयान मिशन यशस्वी केलं. त्याचवेळी एयरोस्पेसशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये हजारो कोटींची गुंतवणूक सुरु आहे. 13 स्पेस बेस कंपन्याच्या शेअर्सच मार्केट कॅप जवळपास 31 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे.
चांद्रयान-3 साठी इस्रोला मॉड्यूल आणि सिस्टिम सप्लाय करणारी स्मॉलकॅप कंपनी सेंटम इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअरमध्ये या आठवड्यात 26 टक्के वाढ पाहायला मिळाली. अवंटेल, लिंडे इंडिया, पारस डिफेंस आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्सच्या शेअर्समध्ये डबल डिजीटचा वेग दिसून आला. गोदरेज इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 8 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ दिसून आली.
मिशन चांद्रयानमध्ये लार्सन एंड टुब्रोच काय योगदान?
भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला. आज भारताने जे यश मिळवलय त्यामागे अनेक कंपन्यांच योगदान सुद्धा आहे. लार्सन एंड टुब्रोने (एलएंडटी) चंद्र मोहिमेसाठी सबसिस्टम निर्मितीसह मिशन ट्रॅकिंगची उपकरण बनवली. डिफेंस पीएसयू मिश्र धातु निगमने एलवीएम 3 एम 4 साठी महत्त्वाच्या सामुग्रीचा पुरवठा केला.
कुठल्या भारतीय कंपन्यांनी योगदान दिलं?
पीटीसी इंडस्ट्रीजने पंप इंटरस्टेज हाउसिंगचा पुरवठा केला. एमटीएआर विकास इंजिन आणि टर्बो पंप आणि बूस्टर पंपसह क्रायोजेनिक इंजिन सबसिस्टम सारख्या साहित्याचा पुरवठा केला. पारसने चांद्रयान-3 साठी नेविगेशन सिस्टमचा पुरवठा केला. पीएसयू बीएचईएलने टायटेनियम टँक आणि बॅटरीचा पुरवठा केला.
स्पेस आणि डिफेंस स्टॉक एक मेगा ट्रेंड
यात अनेक भारतीय कंपन्या 447 अब्ज डॉलरच्या ग्लोबल स्पेस मार्केटमध्ये जगाच लक्ष आपल्याकडे वेधून घेऊ शकतात. गगनयान, आदित्य एल1, या इस्रोच्या पुढील मोहीमा आहेत. स्पेस आणि डिफेंस स्टॉक एक मेगा ट्रेंड आहे, त्यावर गुंतवणूकदारांनी लक्ष देण्याची गरज आहे, असं सॅमको सिक्योरिटीजचे अपूर्व शेठ यांनी सांगितलं.