सर्वाधिक वाईन बनवणारी आणि विकणारी कंपनी आणतेय IPO, गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी

| Updated on: Dec 08, 2022 | 5:58 PM

भारतातील सर्वात मोठी वाईन बनवणारी कंपनी सुला वाइनयार्ड्स आपला आयपीओ बाजारात आणत आहे.

सर्वाधिक वाईन बनवणारी आणि विकणारी कंपनी आणतेय IPO, गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी
Follow us on

मुंबई : दारु बनवणारी कंपनी आता शेअर बाजारात गुंतवणूक करणार आहे. सुला विनयार्ड्स कंपनी (Sula Vineyards IPO) पुढील आठवड्यात आपला IPO लॉन्च करणार आहे.आयपीओची साईज 960.35 कोटींमध्ये असेल. हा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल असेल.

वाईन कंपनी सुला विनयार्ड्सचा IPO 12 डिसेंबर रोजी ग्राहकांसाठी खुला होऊ शकतो. जुलै 2022 मध्ये, कंपनीने ड्राफ्ट रेडहेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) बाजार नियामक सेबी (SEBI) कडे सादर केला होता. कंपनीने लॉन्च होण्यापूर्वी 1200-1400 कोटी रुपयांपासून इश्यू साईज कमी केला आहे. आता इश्यू साईज 960.35 कोटी रुपये असेल.

कंपनीने IPO साठी समभागांची किंमत निश्चित केली आहे. तो प्रति शेअर 340-357 रुपये ठेवण्यात आला आहे. माहितीनुसार, त्याची लॉट साइज 42 शेअर्सची असेल.

14 डिसेंबरपर्यंत पैसे गुंतवता येणार

सुला विनयार्ड्सने मात्र IPO अंतर्गत विकल्या जाणार्‍या समभागांची किंमत जाहीर केलेली नाही, परंतु इश्यू लॉन्चची तयारी पूर्ण झाली आहे आणि किंमत बँड कधीही अनावरण केले जाऊ शकते. सुला विनयार्ड्सचा हा IPO 12 डिसेंबरला सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल आणि गुंतवणूकदार 14 डिसेंबरपर्यंत त्यात गुंतवणूक करू शकतील. हा इश्यू 9 डिसेंबर रोजी गुंतवणूकदारांसाठी खुला होईल.

सुला विनयार्ड्स या वाइन उत्पादक कंपनीची स्थापना 1996 मध्ये झाली. गेल्या वर्षी 2021 मध्ये, कंपनी मद्य उत्पादन आणि विक्रीच्या बाबतीत आघाडीवर होती. 2021-22 या आर्थिक वर्षात त्याचा महसूल 453.92 कोटी रुपये होता आणि निव्वळ नफा 52.14 कोटी रुपये होता. नाशिकस्थित कंपनी रासा, दिंडोरी, द सोर्स, सातोरी, मदेरा आणि दिया यासह 13 ब्रँडच्या नावाखाली 56 लेबल वाइन तयार करते.