National Hamburger Day 2022 : धावते जग आणि धावती जीवन पद्धती यामुळे आपले जीवन ही धावते झाले आहे. आपण उठता बसता जेवणाचा विचार केला की, आधी समोर येतं ते फास्टफूड (Fast-food) आणि त्यातल्या त्यात आमचा वडा-पाव. पण यापेक्षा ही वेगळे काही खाणारे आपल्याकडे माप आहेत. त्यात सगळ्यात जास्त आवडीने खाणारे हे बर्गर खातात. ते ही मॅकडीत आणि मोठ्या मॉलमध्ये गेल्यावर. पण बर्गर (Burger) खाणाऱ्यांनो तुम्हाला या बर्गर बद्दल का माहित आहे का? बर्गर खायला कोणाला आवडत नाही, पण तुमचा आवडता बर्गर खाताना तुम्ही कधी विचार केला आहे का की, एक दिवस जग हॅम्बर्गर डे (Hamburger Day) साजरा करेल. होय, 28 मे हा जगभरात हॅम्बर्गर डे म्हणून साजरा केला जातो. चला तर मग जाणून घेऊ हॅम्बर्गर डेबद्दल काही मजेदार गोष्टी.
प्रत्येक वर्षात येणाऱ्या मे महिन्याच्या 28 मे रोजी, नॅशनल हॅम्बर्गर डे म्हणून जगभरात साजरा केला जातो. बर्गर हा अमेरिकेतील सर्वात प्रतिष्ठित खाद्यपदार्थ असल्याने हा दिवस साजरा केला जातो. अमेरिकन लोक वर्षाला तब्बल 50 अब्ज पेक्षा जास्त बर्गर खातात. बर्गरचा उगम हा हॅम्बर्ग, जर्मनी येथील आहे. त्यामुळे त्याला आजही हॅम्बर्ग म्हटलं जातं. तर जगातील सर्व आरोग्य कर्मचारी या प्रकारचे अन्न खातात. तर जगभरातील तरुणांमध्ये तो खूप लोकप्रिय आहे. तसाच तो भारतासह सर्व देशांत ही लोकप्रिय आहे.
तर जे बॅचलर आहेत. ज्यांचे लग्न झालेले नाही. असे लोक हॅम्बर्ग मोठ्या प्रमाणावर खातात. हॅम्बर्गरमध्ये मोठे दोन पाव त्यात बटाटे आणि त्यावर मांस ठेवून खाल्ले जाते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अमेरिकेत दरवर्षी 50 अब्ज बर्गर खाल्ले जातात, म्हणजेच अमेरिकेतील प्रत्येक व्यक्ती एका आठवड्यात 3 बर्गर खातो.
हॅम्बर्गरच्या उत्पत्तीप्रमाणेच राष्ट्रीय हॅम्बर्गर डेचा इतिहास देखील काही विवादित आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की हॅम्बर्गरची उत्पत्ती हॅम्बर्ग, जर्मनीमध्ये झाली आहे. दुसरीकडे काही लोकांचा असा विश्वास आहे की त्याचा उगम अमेरिकेत झाला आहे. पण सत्य काय आहे हा वाद अजूनही कायम आहे. मानव बर्याच शतकांपासून हॅम्बर्गर खात आला आहे. आणि तो खात राहतील ही.
यूएस आणि इतर देशांतील रेस्टॉरंट्स त्यांच्या ग्राहकांना आंतरराष्ट्रीय हॅम्बर्गर दिनानिमित्त विशेष सवलत देतात. दरवर्षी प्रमाणे, या वर्षी देखील राष्ट्रीय हॅम्बर्गर दिवस 2022 हा अन्न दिन म्हणून साजरा केला जाईल. पण या वर्षी हा सण कोरोनानंतर येत असल्याने या वर्षी खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाईल.
जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की जगातील सर्वात जुने फास्ट फूड रेस्टॉरंट व्हाईट कॅसल फ्रँचायझी आहे, जे 1921 मध्ये लोकांना सेवा देण्यासाठी उघडण्यात आले होते. अमेरिकन लोक एकतर रेस्टॉरंटमध्ये सर्वाधिक बर्गर खातात. किंवा कुठेतरी जाताना वाटेत जेवायला थांबतात तेंव्हा.
आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हॅम्बर्गरचे वजन किती हे माहित आहे का? तर सर्वात मोठ्या हॅम्बर्गरचे वजन 1164 किलोपेक्षा जास्त होते. आणि ते 2017 मध्ये पिलस्टिंग, जर्मनी येथे बनवले गेले. तर सुमारे 300 कारागिरांनी तो तयार केला. तो खाण्यासाठी आणि दान करण्यासाठी लोकांमध्ये वाटला गेले.
जरी अमेरिकेत बर्गर फक्त बीफ आणि रोटी सोबतच मिळतो. हॅम्बर्गर हॅमपासून बनवले जातात या वस्तुस्थितीबद्दल बर्याच लोकांना गोंधळात टाकले जाते. पण ते बहुतेक गोमांसाचे बनलेले असतात. आणि बर्याच लोकांमध्ये अशीही चर्चा आहे की ती खरोखर हॅम्बुर्गमध्ये बनत असावी.