Special Story | शाळा ऑनलाईन पण ‘फी’साठी पालकांच्या पाठीमागे तगादा…

| Updated on: Jan 30, 2021 | 7:47 AM

कोरोनामुळे प्रत्येक क्षेत्राचं मोठं नुकसान झालंय जे कधीही न भरुन येणारं आहे. अनेक लोकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली होती.

Special Story | शाळा ऑनलाईन पण फीसाठी पालकांच्या पाठीमागे तगादा...
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : कोरोनामुळे प्रत्येक क्षेत्राचं मोठं नुकसान झालंय जे कधीही न भरुन येणारं आहे. अनेक लोकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली होती. शिक्षणाकडे उद्याचं भविष्य म्हणून पाहिलं जातं मात्र, कोरोनाच्या या कठीण काळात जगणं मुश्कील होतं तिथं शिक्षणाची काय कथा होती. अत्यावश्यक सेवेतील लोक सोडली तर सगळ्यांनाच घरात बंदिस्त रहावं लागलं. साहजिकच लाखो मुलांना शाळेत जाता आलं नाही. पर्यायाने काही महिने शिक्षणापासून वंचित रहावं लागलं. कोरोनामुळे सर्वसामान्य पालकांचे आर्थिक नियोजन कोसळले होते. आपल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये असे पालकांना वाटत होते तर कोरोनाच्या परिस्थितीत आर्थिक अडचणींनी त्यांना ग्रासलं होतं. आता कुठेतरी परिस्थिती सुधारत आहे. (Schools started after Corona, but parents were tensed about the student’s school fees)

अनलॅाकमध्ये आता हळूहळू महाराष्ट्रतील शाळा सुरू होत आहेत. काही जिल्हातील 27 तारखेपासून शाळा सुरू झाल्या आहेत तर मुंबईमधील शाळा अद्याप सुरू झाल्या नाहीत. मात्र, आता शाळा सुरू झाल्यानंतर पालकांना एक चिंता सतत सतावत आहे ती, म्हणजे शाळेच्या फी ची कारण 2020 हे शैक्षणिक वर्ष कोरोनामुळे ऑनलाईन पध्दतीनेच सुरू झाले शिक्षण जरी ऑनलाईन पध्दतीने सुरू शाळा असले तरी देखील खाजगी शिक्षण संस्था फी साठी पालकांकडे तगादा लावत होत्या. मात्र, कोरोना काळात अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या आणि अनेकजण बेरोजगार झाले होते. तर त्यावेळी अनेक संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित देखील ठेवले होते.

मात्र, अनेक पालकांनी शाळा सुरू झाल्यानंतर मुलांची फी भरतो आता शिक्षण द्यावे अशी विनंती केली होती त्यानंतर विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू झाले मात्र, आता शाळा सुरू होऊन दोन ते तीन दिवस उलटल्यानंतर लगेचच खासगी संस्था फी साठी पालकांकडे तगादा लावताना दिसत आहेत. एकीकडे शाळा सुरू होऊन तिसऱ्याच दिवशी मिरजेतील आलफ़ोन्सा स्कूलच्या विरोधात पालक आक्रमक झाले होते. पालकांचे म्हणणे होते की, कोरोना काळात ऑनलाईन पध्दतीने शिक्षण सुरू असताना त्यामध्ये अनेक अडचणी आल्या आणि मुलांना व्यवस्थित शिक्षण मिळाले नाही.

आमच्या पगार कपात झाल्या नोकऱ्या गेल्या अशात आम्ही पुर्ण फि देऊ शकत नाहीत. यासाठी पालकांनी शाळेच्या परिसरात आंदोलन केले. पालक म्हणत आहेत विद्यार्थ्यांची फी 75% माफ करावी. तर 1 ते 4 च्या विद्यार्थ्यांची फि पूर्ण माफ करावी. यामुळे आता जरी शाळा सुरू झाल्या असतील तरी अजून पुढील आव्हाने मात्र संपलेली नाहीत.

(Schools started after Corona, but parents were tensed about the student’s school fees)