बिझनेस करणाऱ्यांनी वाणी कायम मधुर ठेवावी. डोक शांत ठेवावं. कडू आणि रागिट लोक कधी चांगला बिझनेस करू शकत नाहीत. तुमचं बोलणं हे कायम गोड आणि सोमरच्या व्यक्तीला भावणारं असलं पाहिजे.
राग कमी करा - रागिट लोक स्वत: साठी जास्त समस्या निर्माण करतात. असे लोक रागात अनेक वेळा चुकीचा निर्णय घेतात. त्याने ते समोर असलेल्या संधी पण गमावून बसतात. त्यामुळे राग त्याग करावा.
आळस - चाणक्य नीतिनुसार आळस हा माणसाचा सर्वात वाईट शत्रू आहे. माणसाने कधीही आळशीपणा करू नये. आळशी लोक आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत. त्यामुळे आळशीपणा टाळा.
गायत्री मंत्र जप - हिंदू धर्मात अनेक मंत्रांचा जप केला जातो. त्यात सर्वात शक्तिशाली गायत्री मंत्र मानला जातो. आचार्य चाणक्य यांच्या मते व्यक्तिने नियमित गायत्री मंत्राचा जप केला पाहिजे. त्याने मन शांत राहतं. जीवनातील सर्व समस्यांचा सामना करण्यासाठी शक्ती मिळते.
नवरा बायको आयुष्यभराचे जोडीदार असतात. त्यामुळे ते नातं टिकवण्यासाठी प्रत्येक गोष्ट करणं गरजेचं असतं. नात्यात दूरावा आणतील अशा चूक टाळल्या पाहिजेत. अशा चूका टाळल्या पाहिजेत ज्याने नात्यात दूरावा येतो. आचार्य चाणक्य यांनी अशा पाच चुका सांगितल्या आहेत, जे वैवाहिक जीवन बरबाद करू शकतात.