वास्तुशास्त्रानुसार असे काही प्लांट्स आहेत जे ऑफिस डेस्कवर ठेवणं शुभं मानलं जातं.जी तुमचं मन शांत ठेवतात. सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात व वातावरण प्रसन्न ठेवतात. अशी काही रोपं आहेत जी फक्त सकारात्मकताच निर्माण करत नाही तर चमत्कारिक फायदे देखील देतात. सुख आणि समृद्धीचं प्रतिक मानली जातात ही रोपं. हिरवीगार रोपं तुमच्या सभोवतालची सकारत्मकता आणि सौंदर्य देखील वाढवतात.
मनी प्लांट - वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट ऑफिसमध्ये डेस्कवर ठेवल्याने ते तुमचं भाग्य उजळू शकतं. मनी प्लांट तुम्हाला आश्चर्यकारकपणे फायदेशीर देखील ठरू शकतं. मनी प्लांटने ऑफिस डेस्कची सुंदरताच वाढत नाहीतर. तुमच्या जीवनात समृद्धी देखील येते.
जेड प्लांट - हे प्लांट धन आणि भाग्याचे प्रतिक मानले जाते. हे प्लांट लावल्याने सौभाग्य आणि समृद्धी प्राप्त होते. हे दक्षिणेला किंवा पूर्व दिशेला ठेवू शकता.
लिली प्लांट - हे शांततेचे प्रतिक मानलं जातं. हे तुमचं मन प्रसन्न ठेवायचं काम करतात. हे प्लांट आनंदी वातावरण निर्माण करते. पर्यावरण चांगले ठेवायला देखील मदत होते. तुम्ही हे प्लांट तुमच्या आवडत्या व्यक्तीला भेट ही देऊ शकता.
लकी बांबू ट्री - तुम्ही ऑफिसममधील डेस्कवर लकी बांबू ट्री ठेवलं पाहिजे. वास्तू शास्त्रात याला खूपच शुभ मानलं गेलं आहे.'लकी बांबू' उन्नती, सौभाग्याचेही प्रतीक मानलं जातं. असे केल्याने धन, समृद्धी आणि उदंड आयुष्या सारखे बरेच फायदे मिळतात.