मुंबई : आचार्य चाणक्य एक महान विद्वान होते, ते सर्व विषयांचे जाणकार होते. पण आजच्या तरुण पिढीसाठी ते कुठल्या मॅनेजमेंट गुरुपेक्षा कमी नाही. जीवनातील सर्व चढउतार आणि आव्हानांना यशस्वीरित्या पार करायचे असेल तर आचार्य चाणक्य यांची धोरणे तुम्ही वाचलीच पाहिजेत. आचार्य यांची धोरणे आजही लोकांना मार्गदर्शन करतात आणि कठीण काळात योग्य निर्णय घेण्यास प्रेरित करतात. आचार्य चाणक्य यांच्या गोष्टी लक्षात घेतल्या तर सर्व अडचणींवर सहज मात करता येते. अशाच काही लोकांबद्दल जाणून घ्या ज्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नये, असं आचार्य चाणक्य सांगतात (Acharya Chanakya Advise To Do Not Trust These People In Chanakya Niti).
परोक्षे कार्यहन्तारं प्रत्यक्ष प्रियवादिनम्
वर्जयेत्तादृशं मित्रं विषकुंभम् पयोमुखम्
या श्लोकाद्वारे आचार्य चाणक्य सांगतात की, जे व्यक्ती खूप गोड बोलतात आणि तुमच्या पाठीमागे तुमच्याबाबत वाईट बोलतात, अशा लोकांवर विश्वास ठेवण्याची चूक कधीही करु नका. असे लोक एका घागरीसारखे असतात ज्यांच्या मुखावर दूध दिसते, परंतु आत विष भरलेले असते. असे लोक, आपल्या गुप्त गोष्टी जाणून घेतात आणि आपल्यासाठी अडचणी निर्माण करण्याचे काम करतात. म्हणूनच, शक्य तितक्या लवकर आपण यांच्यापासून दूर व्हावे, अन्यथा आपल्या जीवनातील अडचणी कधीही कमी होणार नाहीत.
न विश्वसेत् कुमित्रे च मित्रे चाऽपि न विश्वसेत्
कदाचित् कुपितं मित्रं सर्वं गुह्यं प्रकाशयेत्
या श्लोकात आचार्य चाणक्य असे म्हणतात की ज्या मित्रांचा स्वभाव वाईट असेल त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नका. परंतु जे तुमचे चांगले मित्र आहेत त्यांच्यावरही एवढा विश्वास ठेवू नका की तुम्ही त्यांना तुमचे सर्व रहस्य सांगाल. हे लक्षात ठेवा की जर एखाद्या दिवशी आपला मित्र आपल्यावर चिडला असेल तर तो आपले सर्व रहस्य प्रकट करु शकतो आणि आपला सन्मान मातीमोळ करु शकतो.
मनुष्याचा सर्वात मोठा रोग आणि सर्वात मोठे सुख काय? जाणून घ्या चाणक्य नितीhttps://t.co/GQTv7npIHJ#chanakya |#Niti |#Manav |#Disease |#Happiness
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 27, 2021
Acharya Chanakya Advise To Do Not Trust These People In Chanakya Niti
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Chanakya Niti | अत्यंत आदरणीय असतात हे 7 व्यक्ती, यांना चुकूनही पाय लावू नये