मुंबई : आचार्य चाणक्य यांची गणना देशातील महान व्यक्तींमध्ये केली जाते. ते इतके हुशार आणि तीक्ष्ण बुद्धीचे होते की त्यांच्या क्षमतेने त्यांनी भारतीय इतिहासाचा प्रवाह बदलला आणि नवीन विक्रम प्रस्थापित केले. आजही आचार्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे लोक अनुसरण करतात आणि त्यांच्याकडे एक उत्तम व्यवस्थापन प्रशिक्षक म्हणून पाहिले जाते. त्यांनी त्यांच्या चाणक्य नीति या पुस्तकात सांगितलेल्या गोष्टी आजही प्रासंगिक आहेत.
आचार्यांच्या गोष्टी ऐकायला आणि वाचण्यास कठोर वाटू शकतात, पण प्रत्यक्षात ते जीवनातील वास्तवतेवर खरे ठरतात. जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या शब्दांचा खरा अर्थ समजला आणि तो जीवनात त्यांनी पाळला तर ते सर्व आव्हानांवर सहजपणे मात करु शकतो. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या अशाच काही गोष्टी जाणून घ्या ज्या तुम्हाला लोकांची ओळख करण्यास मदत करतील –
1. आचार्य म्हणायचे की जेव्हा आपत्ती येते तेव्हा महासागरही आपला संयम गमावतो आणि मोठेपण विसरतो आणि किनारे उध्वस्त करतो. पण, सज्जन व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत आपला संयम गमावत नाही आणि त्याच्या मर्यादा ओलांडत नाही.
2. चाणक्य नीतिप्रमाणे, ज्याप्रमाणे कोकीळा काळी असूनही त्याच्या बोलण्यामुळे तिला सुंदर म्हटले जाते. त्याचप्रमाणे स्त्रीचे सौंदर्य तिच्या गुणांमध्ये आणि तिच्या कुटुंबाप्रतीच्या समर्पणात असते आणि कुरुप पुरुषाचे सौंदर्य त्याच्या बुद्धी आणि क्षमाशीलतेत असते.
3. आचार्य चाणक्यांच्या मते, व्यक्ती कितीही देखणी असली तरी जर त्याने शिक्षण घेतले नसेल, तर त्याची स्थिती त्या पलाशच्या फुलासारखी आहे, जो सुंदर असूनही सुगंधहीन आहे.
4. एखाद्या विषारी सापापेक्षा वाईट व्यक्ती ही अधिक प्राणघातक असते. साप फक्त तेव्हाच दंश करतो जेव्हा त्याच्या जीवाला धोका असतो. पण जेव्हा जेव्हा एखाद्या वाईट माणसाला संधी मिळते तेव्हा तो तुमचा जीव धोक्यात घालू शकतो.
5. जे सामर्थ्यवान आहेत त्यांच्यासाठी कोणतेही काम कठीण नाही, जे व्यापारी आहेत त्यांच्यासाठी कोणतेही ठिकाण दूर नाही, जे शिकलेले आहेत त्यांच्यासाठी कोणताही देश दूर नाही आणि जे मृदूभाषी आहेत त्यांच्यासाठी कोणीही शत्रू नाही.
Chanakya Niti | आनंदी आयुष्य हवंय, तर आचार्य चाणक्य यांच्या या धोरणांचं पालन कराhttps://t.co/nCshiLsbBf#ChanakyaNiti #AcharyaChanakya #Spiritual
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 31, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Chanakya Niti | नाती दृढ ठेवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात