मुंबई : आचार्य चाणक्य हे कुशल राजकारणी, मुत्सद्दी, समाजशास्त्रज्ञ आणि प्रख्यात अर्थतज्ज्ञ होते. त्यांचे वचन आजच्या काळातही स्मरणात आहेत. त्यांची क्षमता आणि दूरदृष्टी याचा अंदाज यावरुनच घेता येतो की आजही लोकांमध्ये त्याची प्रतिमा मॅनेजमेंट गुरुसारखी आहे जी जीवनातील सर्व परिस्थितींना सहजपणे कसे सामोरे जावे हे सांगते. आचार्यांच्या वचनांचे पालन केल्याने, समस्या येण्यापासून रोखता येतात आणि त्यामध्ये अडकल्यास सहज बाहेर पडता येते.
लोकांच्या जीवनशैलीमध्ये सुधार करण्यासाठी आचार्यांनी जवळजवळ प्रत्येक विषयावर आपले विचार मांडले आहेत. आचार्य यांनी आहाराशी संबंधित सर्व नियमांबद्दल सांगितले आहे, जेणेकरून लोक निरोगी राहून आपले जीवन जगू शकतील. आचार्यांनी आहाराविषयी सांगितलेल्या विशेष गोष्टी जाणून घ्या.
गुरच औषधि सुखन में भोजन कहो प्रमान,
चक्षु इंद्रिय सब अंश में, शिर प्रधान भी जान
– या श्लोकाद्वारे आचार्यांनी गुरचा गुणधर्म म्हणजेच गिलोयचे वर्णन केले आहे आणि ते सर्वोत्तम औषध म्हणून सांगितले आहे. श्लोकात आचार्य चाणक्य म्हणतात की गुरचा हे औषधांपैकी सर्वोत्तम आहे आणि अन्न हे सर्व सुखांमध्ये परम आनंद आहे. डोळे सर्व इंद्रियांमध्ये सर्वात महत्वाचे आहेत आणि मेंदू सर्वात प्रमुख आहे. म्हणून निरोगी अन्न खा, गुरचचे सेवन करा, डोळ्यांची काळजी घ्या आणि डोक्याला तणावमुक्त ठेवा.
राग बढत है शाकते, पय से बढत शरीर,
घृत खाये बीरज बढे, मांस मांस गम्भीर
– या श्लोकात आचार्यांनी सांगितले आहे की, शाक खाल्ल्याने रोग वाढतात आणि दूध प्यायल्याने शरीर मजबूत होते. तूप खाल्याने वीर्य वाढते आणि मांस फक्त तुमच्या शरीरातील मांस वाढवते.
चूर्ण दश गुणो अन्न ते, ता दश गुण पय जान,
पय से अठगुण मांस ते तेहि दशगुण घृत मान
– या श्लोकाद्वारे, आचार्य म्हणतात की धान्याचे पीठ हे उभ्या धान्यापेक्षा 10 पट अधिक पौष्टिक आहे. दुध हे पीठापेक्षा दहापट अधिक पौष्टिक आहे. मांस दुधापेक्षा आठ पट पौष्टिक आहे आणि तूप मांसापेक्षा 10 पट पौष्टिक आहे.
Chanakya Niti | मुलांना वाईट गोष्टी शिकवू शकतात आई-वडिलांच्या या सवयी, मुलांसमोर वागताना काळजी घ्याhttps://t.co/d4J5tkqGCs#ChanakyaNiti #AcharyaChanakya #Spiritual
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 18, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :