मुंबई : आचार्य चाणक्य यांची गणना अत्यंत विद्वान लोकांमध्ये केली जाते. त्यांच्याकडे कुशल मुत्सद्दीपणा, राजकारण आणि अर्थशास्त्राचे उत्तम ज्ञान होते. आपल्या आयुष्यातील कठीण परिस्थितीत त्यांनी कधीही हार मानली नाही. आचार्य चाणक्य यांचा सर्वात मोठा शत्रू घनानंद यांचा नाश करुन एका साध्या मुलाला चंद्रगुप्तला मौर्याला सम्राट बनवले होते. त्यांनी अनेक पुस्तके आणि ग्रंथ लिहिले. चाणक्य हे कौटिल्य आणि विष्णू गुप्त म्हणून ओळखले जातात.
चाणक्य यांनी नैतिकतेमध्ये जीवनातील विविध पैलूंबद्दल सांगितले आहे. त्यांनी संपत्ती, प्रगती, मैत्री, शत्रुत्व, यशाशी संबंधित गोष्टींचा उल्लेख केला आहे. चाणक्य यांनी आपल्या पुस्तकात अशा गोष्टींबद्दल सांगितले आहे ज्याचा त्याग करणे चांगले आहे, अन्यथा जीवनात नेहमीच सन्मानाचे नुकसान होते.
निंदा करणे
आचार्य चाणक्य यांच्या मते, एखाद्याने नेहमी निंदा करणे टाळावे. जे इतरांची निंदा करतात आणि त्यांच्या पाठीमागे त्यांच्याबाबत वाईट बोलतात. त्यांना आयुष्यात कधीच आदर मिळत नाही. अशा लोकांपासून नेहमी अंतर ठेवा. चाणक्य म्हणतात की जे इतरांचे वाईट करतात, ते नेहमी इतरांच्या हशा आणि घृणाचे कारण बनतात.
खोटे बोलणे
आपण नेहमी सत्याच्या मार्गावर चालायला हवे हे आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते. वाटेत कितीही अडचणी आल्या तरी सत्याचा मार्ग कधीही सोडू नये. चाणक्य यांच्या मते, जो माणूस यशस्वी होण्यासाठी असत्याचा मार्ग स्वीकारतो, त्याचे यश फार काळ टिकत नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे सत्य इतरांसमोर येते तेव्हा त्याला लाज वाटायला लागते. म्हणून, कोणीही कोणतेही काम करण्यासाठी कधीही खोटे बोलू नये.
अतिशयोक्ती
काही लोक इतरांसमोर अतिशयोक्ती करतात. हे लोक इतरांसमोर स्वतःला श्रीमंत आणि प्रतिभावान दाखवण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा अशा लोकांचे सत्य उघड होते तेव्हा त्यांना इतरांसमोर मान खाली घालावी लागते. चाणक्य यांच्या मते, एखाद्या व्यक्तीने त्याच्या सामान्य व्यक्तिमत्त्वाबद्दल कधीही खोटे बोलू नये. तुमचा तुमच्या संस्कार आणि बुद्धीवर विश्वास असावा.
Chanakya Niti | कुठेही घर बांधण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासून घ्या, आचार्य चाणक्य काय सांगतातhttps://t.co/W3uT9a59LV#ChanakyaNiti #AcharyaChanakya #Spiritual
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 25, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Chanakya Niti : व्यक्तीची पारख कशी करावी, या 4 गोष्टी लक्षात ठेवा
पत्नीवर संशय किंवा आर्थिक फटका, कधीही बोभाटा करु नये या 4 गोष्टींचा