मुंबई : आचार्य चाणक्या यांचे शब्द अर्थातच ऐकायला थोडे कठोर वाटतात. पण जर तुम्ही त्याची व्यावहारिक पातळीवर चाचणी घेण्याचा प्रयत्न केलात, तर तुम्हाला कळेल की आचार्य चाणक्य जे काही बोलतात ते एखाद्या व्यक्तीचे जीवन सुधारण्यासाठी आहे. कुशल राजकारणी, मुत्सद्दी, अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ असण्याबरोबरच आचार्य एक उत्तम शिक्षकही होते. आपल्या आयुष्यात त्यांनी सर्व शिष्यांचे भविष्य उज्ज्वल केले.
ते इतके दूरदर्शी होते की ते येणाऱ्या परिस्थितीचा अंदाज ते आधीच लावायचे आणि त्यानुसार स्वतःला तयार करायचे. त्यांच्या दूरदृष्टीचा पुरावा त्यांच्या नीतिशास्त्रातही आढळतो. या लोकप्रिय पुस्तकात, शतकांपूर्वीचे आचार्यांचे शब्द आजच्या काळातही अचूक असल्याचे सिद्ध होतात. जर एखाद्या व्यक्तीने त्यांना आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर ती सर्व अडचणींवर सहजपणे मात करु शकते. आचार्यांनी प्रत्येकाला काही सवयी सोडायला सांगितल्या आहेत, अन्यथा व्यक्तीचा आदर कमी होऊ शकतो, जाणून घ्या त्या गोष्टी कोणत्या?
काही लोकांना इतरांबाबत चुगली करण्याची, वाईट बोलण्याची सवय असते. ते कधीही इतरांचे सामर्थ्य पाहू शकत नाहीत. नेहमी इतरांबाबत वाईट बोलतात. असे लोक नेहमी इतरांच्या नजरेत त्यांचा सन्मान आणि आदर कमी करतात. ही सवय त्वरित सोडली पाहिजे आणि अशा लोकांपासून अंतर ठेवले पाहिजे.
जर तुम्हाला आयुष्यात आदर मिळवायचा असेल तर नेहमी सत्य बोला आणि सत्याची साथ द्या. अशा लोकांवर इतर लोकांचा विश्वास वाढतो आणि त्यांच्याकडून न्याय अपेक्षित असतो. पण काही लोक या प्रत्येक गोष्टीवर खोटे बोलतात. अशा लोकांना फक्त त्यांचे काम पूर्ण करण्यात रस असतो आणि केवळ त्यांच्या स्वार्थासाठी खोटे बोलतात. अशा लोकांकडे कोणीही कधी आदराने बघत नाही. लक्षात ठेवा, जर तुम्हाला आयुष्यात लोकांकडून प्रेम आणि आदर हवा असेल, तर धर्माच्या मार्गाचे अनुसरण करा. कारण खोटे बोलणे फार काळ टिकत नाही. शेवटी सत्याचाच विजय होतो.
काही लोकांना सर्वत्र त्यांचीच जयजयकार ऐकण्याची सवय असते. ते स्वतःला खूप सक्षम, हुशार आणि बुद्धिमान असल्याचे सिद्ध करण्यासाठी अतिशयोक्तीने बोलतात. पण जोपर्यंत कोणी तुम्हाला ओळखत नाही, तोपर्यंतच तो तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवतो. ज्या दिवशी तो तुम्हाला ओळखेल तेव्हा तुम्ही बरोबर बोललात तरी तो तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. म्हणून कधीही बढाई मारु नये. असे लोक इतरांच्या नजरेत त्यांचा सन्मान आणि आदर गमावतात.
Chanakya Niti : या 3 गोष्टींमध्ये संयम बाळगणे अति आवश्यक असते, अन्यथा मोठं नुकसान भोगावं लागू शकते…https://t.co/qxadGpDHFL#ChanakyaNiti #AcharyaChanakya #Spiritual
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 15, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :