Chanakya Niti | कठीण काळात जेव्हा कुठलाही मार्ग सापडत नसेल तेव्हा चाणक्य यांचे हे 7 विचार तुमचं मार्गदर्शन करतील

| Updated on: Jun 11, 2021 | 7:55 AM

आचार्य चाणक्य एक महान विद्वान होते (Acharya Chanakya ). मानवी जीवनावर परिणाम घडविण्यास सक्षम असलेल्या प्रत्येक विषयावर त्यांनी बारकाईने अभ्यास केले. चाणक्य यांना आपले राष्ट्र प्रगतीच्या मार्गावर जाताना पाहायचे होते, म्हणून त्यांनी आयुष्यभर लोकांना प्रशिक्षण दिले आणि त्यांना योग्य मार्ग दाखविला

Chanakya Niti | कठीण काळात जेव्हा कुठलाही मार्ग सापडत नसेल तेव्हा  चाणक्य यांचे हे 7 विचार तुमचं मार्गदर्शन करतील
Acharya-Chanakya
Follow us on

मुंबई : आचार्य चाणक्य एक महान विद्वान होते (Acharya Chanakya ). मानवी जीवनावर परिणाम घडविण्यास सक्षम असलेल्या प्रत्येक विषयावर त्यांनी बारकाईने अभ्यास केले. चाणक्य यांना आपले राष्ट्र प्रगतीच्या मार्गावर जाताना पाहायचे होते, म्हणून त्यांनी आयुष्यभर लोकांना प्रशिक्षण दिले आणि त्यांना योग्य मार्ग दाखविला (Acharya Chanakya Said These Seven Tips Will Lead You In Difficult Times In Chanakya Niti).

आचार्य यांनी त्यावेळी चाणक्य नीति नावाचे पुस्तक देखील लिहिले होते, ज्यात जीवनाशी संबंधित अशा सर्व गोष्टींचा उल्लेख आहे ज्यामुळे मनुष्याच्या सर्व समस्या सहजपणे सोडवता येतील. जर एखाद्या व्यक्तीने आचार्य यांच्या धोरणांचे अनुसरण केले तर आयुष्यात ती यशस्वी होऊ शकते.

1. प्रत्येक व्यक्तीने शिक्षणाची आवड ठेवली पाहिजे आणि नेहमी ज्ञान मिळवत राहिले पाहिजे. कारण, शिक्षा हा आपला खरा सहकारी आहे. हे आपल्याला वाईट वेळी योग्य मार्ग दाखवण्यात मदत करते. याशिवाय सुशिक्षित व्यक्तीला सर्वत्र सन्मान मिळतो. शिक्षणामध्ये इतकी शक्ती आहे की ते सौंदर्य आणि तरुणपणालाही पराभूत करते.

2. आपली रहस्ये कोणाबरोबरही कधीही शेअर करु नका, कारण ज्या दिवशी ती व्यक्ती आपल्याशी एखाद्या गोष्टीवर रागावली असेल, तेव्हा ती तुमची मान-प्रतिष्ठेला नुकसान पोहोचवू शकते.

3. भूतकाळाला स्मरण करुन अनेकजण बर्‍याचदा पश्चात्ताप करतात आणि भविष्यातील चिंतांमध्ये मग्न असतात. एक हुशार व्यक्ती आपल्या वर्तमानकाळात जगतो आणि त्याला अधिक उत्तम बलवून चांगल्या भविष्याचा पाया मजबूत करतो.

4. व्यक्तीने नशिबावर अवलंबून राहू नये. त्याने त्याच्या कर्मांवर विश्वास ठेवाव. कारण कर्मच त्याला सर्वोत्तम बनवतात. कोणीही जन्मापासून श्रेष्ठ नसतो. कर्मामुळे एखाद्याचे भविष्य बदलू शकते.

5. प्रत्येक मैत्रीच्या मागे नक्कीच काही तरी स्वार्थ असतो. हे एक कटू सत्य आहे.

6. एकदा कोणत्याही कामाची सुरुवात केल्यास अयशस्वी होण्याच्या भीतीने ते कधीही सोडू नका. प्रयत्न करा आणि जरी अपयशी ठरलो तरीही अपयशाची कारणे शोधा आणि पुन्हा कार्य करण्यास प्रारंभ करा. तुमच्या या प्रयत्नांमुळे तुम्हाला एक दिवस मोठे यश मिळू शकेल.

7. मुलाला शिस्त शिकवायची असेल तर जन्मापासून पाचव्या वर्षापर्यंत त्याला खूप प्रेम द्या. मग त्याला दहा वर्षे त्याला शिक्षा द्या आणि जेव्हा तो सोळा वर्षांचा होईल, तेव्हा त्याला तुमचा मित्र बनवा, जेणेकरुन तो आपल्याबरोबर सर्व काही शेअर करेल आणि आपण त्याला योग्य मार्ग दाखवू शकाल.

Acharya Chanakya Said These Seven Tips Will Lead You In Difficult Times In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti : कठीण काळातही हे 4 मित्र तुमच्या सोबत असतात, जाणून घ्या

Chanakya Niti | ज्या व्यक्तीमध्ये हे 5 गुण असतात, ते वाईट काळातही संयम ठेवतात

Chanakya Niti: एखादा व्यक्ती लोकांचा आवडता लीडर कसा होतो? चाणक्य म्हणतात हे 4 गुण महत्वाचे!