मुंबई : आचार्य चाणक्य यांनी आयुष्याशी संबंधित अशा सर्व गोष्टी आपल्या नीतिशास्त्रात सांगितल्या आहेत. जर तुम्ही तुमच्या जीवनात या गोष्टी आत्मसात केल्या तर नक्कीच यशस्वी व्हाल. पण, आजच्या धावपळीच्या जीवनात लोक त्यांच्या वचनांकडे लक्ष देत नाहीत. पण त्यात त्यांचेच नुकसान आहे. आपण दररोज कुठल्या न कुठल्या समस्येला तोंड देत असतो (Acharya Chanakya Said These Types Of People Are Caused Of Ruin Their Own).
या समस्यांचे निराकरण देखील त्या समस्येमध्येच आहे. परंतु आम्ही सतत समस्येकडे पहातो आणि समाधानावर लक्ष केंद्रित करण्याचा विचारही करत नाही, ज्यामुळे समस्या जशी आहे तशीच राहाते आणि आम्हाला तोडगा सापडत नाही. परंतु जर आपण आचार्य चाणक्य यांच्या मौल्यवान गोष्टींकडे लक्ष दिले, तर आपण सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्त होऊ शकता.
आचार्य चाणक्य यांच्या धोरणांमुळे चंद्रगुप्त मौर्य एक महान शासक बनला. त्यांच्यासारख्या बरेच निर्धन लोकही राजा होण्यात यशस्वी झाले. त्यांचे धोरणं नेहमीच लोकांना आकर्षित करतात, कारण त्यामध्ये जीवनाचे गुढ सत्य लपलेले आहे.
प्रत्येकाची अशी इच्छा असते त्यांच्या आयुष्यात दु:ख येऊ नये. त्याचे आयुष्य नेहमी आनंदी रहावे. परंतू, हे शक्य नाही की एखाद्या व्यक्तीच्या जीवनात फक्त आनंद असतो आणि दुःख त्यांच्याजवळही येत नाही. जर तुमच्या आयुष्यात आनंद आले तर दुःखही येईलच हे निश्चित आहे.
आचार्य चाणक्य यांची धोरणं या प्रकरणावर प्रकाश पाडतात. या श्लोकाद्वारे त्यांनी आपले अनमोल विचार व्यक्त केले आहेत, जे आजही अतिशय प्रासंगिक आहेत. आज आपण आचार्य चाणक्य यांच्या त्याच गोष्टींचे विश्लेषण करु. आचार्य चाणक्य आपल्या श्लोकात असे म्हणतात –
आत्मद्वेषात् भवेन्मृत्यु: परद्वेषात् धनक्षय:।
राजद्वेषात् भवेन्नाशो ब्रह्मद्वेषात् कुलक्षय:।।
आचार्य चाणक्य यांनी या श्लोकाद्वारे असे म्हटले आहे की, जो स्वत:च्याच आत्म्याचा द्वेष करतो तो स्वत: चा नाश करतो. मत्सर किंवा दुसऱ्यांचा द्वेष केल्यामुळे आपल्याच संपत्तीचा नाश होतो. राजाचा द्वेष केल्याने व्यक्ती स्वत:चा नाश करुन घेतो आणि ब्राह्मणांचा तिरस्कार केल्याने तो संपूर्ण वंशाचा नाश करतो.
कोणत्याही स्वार्थी हेतूशिवाय बोलणारी व्यक्ती आप्त आहे. आत्म्याचा आवाज आणि आप्त दोन्ही एकच गोष्ट आहे. धर्मग्रंथांनुसार, माणूस त्याचा सर्वात मोठा मित्र आणि शत्रू आहे. तशाच प्रकारे जी व्यक्ती आप्त म्हणजेच स्वभाव, विद्वानांचा तिरस्कार करणारा व्यक्तीचा पूर्णपणे नाश होतो.
Chanakya Niti | स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक बुद्धिमान आणि धैर्यवान असतातhttps://t.co/YPN3al3eks#ChanakyaNiti
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 21, 2021
Acharya Chanakya Said These Types Of People Are Caused Of Ruin Their Own
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Chanakya Niti | फक्त श्रीमंताकडे असतात या गोष्टी, गरीबांकडे नाही, वाचा आचार्य चाणक्य यांचे विचार…
Chanakya Niti | एकपेक्षा अधिक शत्रू असल्यासं कसं लढावं?आचार्य चाणक्य काय सांगतात…