मुंबई : आचार्य चाणक्य एक महान अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, रणनीतिकार तसेच सामाजिक विषयांचे जाणकार होते. त्यांनी जीवनाची प्रत्येक बाब जवळून समजून घेतली. आचार्य यांच्या बुद्धिमत्तेचा आणि कुशल युक्तीचाच परिणाम म्हणजे त्यांनी एका साध्या मुलाला राजाच्या सिंहासनावर बसवले. आचार्य चाणक्य यांच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीला दुरुनच समजून घेण्याची प्रचंड क्षमता होती (Acharya Chanakya Said This One Demerit Will Enough To Destroy Your Hundres Of Qualities In Chanakya Niti).
त्यांनी आपले ज्ञान केवळ स्वतःपुरते मर्यादित ठेवले नाही तर इतरांचेही मार्गदर्शन केले. चाणक्य नीति या ग्रंथात आचार्य यांनी आपल्या अनुभवांच्या आधारे लोकांचे जीवन सुकर करण्याचा मार्ग दाखविला आहे. जर लोकांनी आचार्य यांच्या सल्ल्यांचे अनुसरण केले तर सर्व समस्या सहज सोडवता येतील. चाणक्य नीतिच्या 13 व्या अध्यायातील 15 व्या श्लोकात त्यांनी अशा प्रकारचे वर्तन नमूद केले आहे जे एखाद्या व्यक्तीचे सर्व परिश्रम निष्फळ करु शकते. चला त्याबद्दल जाणून घेऊया –
अनवस्थितकायस्य न जने न वने सुखम्,
जनो दहति संसर्गाद् वनं संगविवर्जनात…
या श्लोकाद्वारे आचार्य चाणक्य म्हणतात की कोणत्याही कामात यशस्वी होण्यासाठी मनावर नियंत्रण ठेवणे फार महत्वाचे आहे. ज्याचे मन स्थिर नाही, त्या व्यक्तीला लोकांमध्ये किंवा जंगलात सुख मिळत नाही. अशी व्यक्ती लोकांमध्ये असताना मत्सर आणि जंगलात एकटेपणा अनुभवते.
जीवनात कोणत्याही कामात यश मिळविण्यासाठी मनाची चंचलता दूर करणे फार महत्वाचे आहे, कारण ज्या व्यक्तीचे मन चंचल आहे त्याने कितीही कठोर परिश्रम केले तरीही तो यशस्वी होण्यासाठी सक्षम नाही. अशा व्यक्तीचे मन कुठेही स्थिर राहत नाही. पुन्हा-पुन्हा भटकल्यामुळे, तो कुठेही एकाग्र होऊ शकत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती अपयशी ठरते तेव्हा ती इतरांना प्रगती करताना पाहून ईर्ष्या आणि निराश होतो. अशा परिस्थितीत त्याला ना सर्वांमध्ये आनंद मिळतो आणि ना एकटेपणात.
यशस्वी होण्यासाठी चंचल मनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. ज्याचं मनावर नियंत्रण आहे, तो काहीही साध्य करु शकतो. गीतेतही भगवान श्रीकृष्णाने मनावर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्व सांगितले आहे. “मन के जीते जीत है, मन के हारे हार”, म्हणजेच जर तुम्ही मनावर विजय मिळविला असेल, म्हणजेच मन तुमच्या नियंत्रणाखाली असेल तर तुम्हाला काहीही साध्य करणे अवघड नाही. परंतु जर तुम्ही तुमच्या मनाचे गुलाम असाल तर तुम्ही तुमचे मन जे काही सांगेल ते कराल. अशा व्यक्तीसाठी यशस्वी होणे अशक्य आहे. म्हणूनच, जर आपण आयुष्यात पुढे जाण्याचे स्वप्न पाहत असाल तर प्रथम मनावर नियंत्रण ठेवण्यास शिका.
Chanakya Niti | या चार गोष्टींपासून नेहमी दूर राहा, अन्यथा आयुष्यात एकटे पडालhttps://t.co/4ieCI0G4cu#ChanakyaNiti #AcharyaChanakya #Spiritual
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 6, 2021
Acharya Chanakya Said This One Demerit Will Enough To Destroy Your Hundres Of Qualities In Chanakya Niti
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Chanakya Niti | नोकरी आणि व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर या चार गोष्टी लक्षात ठेवा
Chanakya Niti : या 6 परिस्थितीत कितीही काही केलं तरी माणूस दु:खी असतोच…!