मुंबई : प्रत्येक गोष्टीला त्याचे स्थान आणि उपयुक्तता असते. जर घरात साप निघाला तर लोक त्याला मारण्यासाठी धावतात, पण जर तोच साप शिवलिंगाभोवती बसला असेल तर तेच लोक देवता म्हणून त्याची पूजा करायला लागतात. हे सिद्ध करते की कोणत्याही गोष्टीकडे कधीही दुर्लक्ष केले जाऊ नये, कारण त्याचे स्थान आणि काळानुसार स्वतःचे महत्त्व आहे. आचार्य चाणक्य यांचाही असाच विश्वास होता. आचार्यांच्या मते, एखादी छोटी गोष्ट विचारात घेऊन आपण निष्काळजी बनतो आणि नंतर मोठे नुकसान सहन करतो.
आचार्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्र या ग्रंथात अशा तीन गोष्टींबद्दल सांगितले आहे, ज्यांना कधीही लहान समजण्याची चूक करु नये, अन्यथा संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते.
1. कर्ज मिळवणे सोपे आहे आणि ते देणे तितकेच कठीण आहे. जर तुम्ही कर्जाला लहान गोष्ट समजण्याची चूक केली तर ते दिवसेंदिवस वाढते आणि ते फेडणे तुमच्यासाठी कठीण होते. अशा परिस्थितीत, एखादी व्यक्ती विनाशाच्या मार्गावर पोहोचते. म्हणून प्रयत्न करा की कर्ज घेण्याची गरजच पडू नये आणि जरी तुम्ही कोणत्याही कारणास्तव कर्ज घेत असाल तर त्या प्रकरणात गंभीर व्हा आणि शक्य तितक्या लवकर त्याची परतफेड करा.
2. जरी शत्रू तुमच्यापेक्षा दुबळा असला तरी त्याला लहान समजण्याची चूक कधीही करु नका. जरी तो कमकुवत असला तरी तो तुमचा शत्रू आहे, म्हणून जेव्हा त्याला संधी मिळेल तेव्हा तो त्याचा हल्ला चुकवणार नाही. म्हणून, शत्रूला दुर्बळ मानून कधीही शांत बसू नका. नेहमी सतर्क रहा आणि प्रत्येक परिस्थितीत शत्रूशी सामना करण्यासाठी स्वतःला तयार ठेवा.
3. कोणताही आजार लहान मानून कधीही निष्काळजी होऊ नये. एकदा तुम्ही बेफिकीर झालात, की तुमचा आजार कधी वाढेल आणि तुमच्यासाठी समस्या बनेल हे तुम्हालाही कळणार नाही. म्हणून, सुरुवातीला सतर्क राहून, तो रोग मोठा होण्यापासून थांबवा आणि त्यावर योग्य उपचार करा.
Chanakya Niti | एक सर्वोत्तम लीडर होण्यासाठी व्यक्तीमध्ये हे तीन गुण असणे असते आवश्यकhttps://t.co/8vKSsVp9fQ#ChanakyaNiti #AcharyaChanakya #Spiritual
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 2, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Chanakya Niti | लोकांची पारख करायची असेल तर आचार्य चाणक्य यांच्या या गोष्टी लक्षात ठेवा…
Chanakya Niti | आनंदी आयुष्य हवंय, तर आचार्य चाणक्य यांच्या या धोरणांचं पालन करा