वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय्य तृतीयेचा (Akshay Tritiya) सण (Festival)साजरा केला जातो. हिंदू (Hindu)धर्मात या सणाला मोठे महत्त्व आहे. या दिवशी लोकं लक्ष्मीची पूजा करतात. हा दिवस जप, पूजा आणि दानासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी अनेक लोकं सोनं- चांदीचे दागिने खरेदी करतात. यंदा अक्षय्य तृतीया 3 मे 2022 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी मंगळवार आहे. पूजेचा मुहूर्त सकाळी 05 वाजून 39 मिनिटांपासून सुरु होऊन 12 वाजून 18 मिनिटांनी संपणार आहे. या दिवशी आपण कोणत्या पद्धतीनं पूजा करावी आणि दान करावे हे जाणून घेऊयात.
सकाळी लवकर अंघोळ करून दिवसाची सुरुवात करा. या दिवशी शक्य असल्यास पवित्र नदीमध्ये स्नान करावे. असं करणं शुभ मानलं जातं.
देव घरात श्रीगणेश आणि देवी लक्ष्मीची नवीन मूर्ती स्थापित करा.
चंदन पावडर आणि गुलाब पाण्यापासून तिलक बनवा. श्रीगणेश आणि देवी लक्ष्मीच्या मूर्तींना तिलक लावा.
श्री गणेश आणि देवी लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करा. यामुळे देवाचा आशीर्वाद मिळेल.
या दिवशी जर तुम्ही नवीन सोन्या चांदीच्या वस्तू खरेदी केल्या असतील तर त्या श्री गणेश आणि देवी लक्ष्मीसमोर ठेवा.
दूध आणि तांदूळ यासारख्या घटकांचा वापर करून घरी प्रसाद तयार करा. तो देवांना अर्पण करा.
कुटुंबातील सर्व सदस्यांसह घरी आरती करा. सर्व सदस्यांना प्रसाद वाटप करा.
घरात अक्षय्य तृतीयेची पूजा केल्याने घरात आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी येते.
या दिवशी देवी लक्ष्मी काही वस्तूंचे दान केल्याने प्रसन्न होते. यामुळे लोकांना अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो.
या दिवशी कोणत्याही स्वरूपात अन्न किंवा अन्नदान करणे शुभ मानले जाते. गव्हाचे पीठ, तांदूळ, साखर, डाळी अशा वस्तू तुम्ही गरजूंना दान करू शकतात.
गरजूंना काही कपडे, बूट दान करा. या दिवशी चप्पल आणि नवीन वस्त्र दान केल्याने मोक्षप्राप्ती होते, असे मानले जाते. या दिवशी दान केल्याने स्थानिकांना आरोग्याशी संबंधित समस्या दूर ठेवण्यास मदत होते.
अक्षय्य तृतीयेनिमित्त गायींना खाऊ घालणे अत्यंत शुभ मानले जाते. घरी ताजी भाकरी बनवा. गाईच्या भाकरीला ताज्या गुळाने खाऊ घाला. या दिवशी तुम्हीही गोशाळेत जाऊन गायींना खाऊ घालू शकता.
( इथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित असल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही )