आजचे पंचांग 3 मे, 2022 मंगळवार आजचा दिवस खास आहे. आज अक्षय तृतीया आहे. परशुराम जयंती आहे तसंच आज रमजान ईद देखील आहे. आज सर्वत्र उत्सावाचे वातावरण आहे. आजचा दिवस कोणत्याही कार्यासाठी शुभ आहे. पंचांगानुसार चंद्रमा आज वृषभ राशीत गोचर करत आहे. जाणून घेवूया आजचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ आजचे पंचांग (Aaj Che Panchang) 3 मे, 2022 मंगळवार आजचा दिवस खास आहे. पंचांगानुसार चंद्रमा आज वृषभ राशीत गोचर करत आहे. जाणून घेऊया आजचा शुभ मुहूर्त.
3 मे, 2022 वैशाख महिन्यातील शुक्लपक्षाची सुरूवात झाली आहे. आज वैशाख तृतीया तिथी आहे. आज शोभन योग तयार होत आहे.
3 मे, 2022 च्या पंचांगानुसार रोहिणी नक्षत्र आहे. आजचा दिवस विशेष आहे.
पंचांगानुसार 3 मे, 2022 मंगळवारी राहुकाळ दुपारी 3 वाजून 37 मिनिटांनी संध्याकाळी 5.17 पर्यंत असेल. राहुकाळा शुभकार्य करने.
राहुकालमध्ये शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते.
आजचा दिवस धार्मिक दृष्या अत्यंत महत्वाचा आहे. आज अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त. आजच्या दिवसात पूजा आणि दानाचे विशेष महत्व आहे. अक्षय तृतीयेचे हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. आजचा दिवस कोणतेही शुभ कार्य करण्यास उचित मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी सतयुग आणि त्रेता युगाची सुरूवात झाली होती. द्वापर युगाचा आणि महाभारत युद्धाचा शेवटही याच तारखेला झाला. भगवान विष्णूचा नर नारायण अवतार, हयग्रीव, परशुराम यांचा अवतारही याच तिथीला झाला.
परशुराम जयंती वैशाख महिन्यातील शुक्ल पक्ष तिसऱ्या दिवशी परशुराम जयंती साजरी केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार यादिवशी परशुरामाचा जन्म झाला होता.