अक्षय तृतीयेच्या शुभ दिनी धनलक्ष्मी सोबत विष्णु देवाची देखील पूजा अर्चा केली पाहिजे. जाणून घेऊया कोणत्या राशींना लाभ होणार आहे.वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला (Akshaya Tritiya 2022) शुभ पर्व मानलं जातं. देशभरात उत्साहात आणि उल्हासात हा सण प्रत्येक जण साजरा करतोय. आजच्या दिवशी विधिवत लक्ष्मी मातेची आणि विष्णु देवाची पूजा केली जाते. त्याचसोबत दान पुण्य यासोबतच गंगा स्नानाचे देखील आजच्या दिवशी विशेष महत्व असते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक आजचा दिवस असतो. कोणतेही काम सुरू करायला आज शुभ मुहूर्त किंवा पंचांग पाहणे गरजेचे नसते. आजचा दिवस सर्व कामासाठी तसंच शुभ कार्यासाठी अत्यंत फलदायी असतो. आजच्या दिवशी देवी लक्ष्मी सर्व भक्तांवर प्रसन्न असते. जाणून घेऊया कोणत्या राशींवर लक्ष्मी देवी प्रसन्न होणार.
यंदा अक्षय तृतीयेच्या (Akshaya Tritiya) दिवशी काही ग्रहांचे विशेष योग आहे. आजच्या विशेष दिनी (Special Day) काही खास राशींवर देवी लक्ष्मींची (Goddess Laxmi) विशेष कृपा होणार आहे. बघूया लक्ष्मी मातेची कोणत्या राशींवर कृपा होणार आहे.
यंदाची अक्षय तृतीय धनु राशीसाठी विशेष योग घेवून आली आहे. याराशीच्या लोकांना धन लाभ होऊ शकतो. आजच्या दिवशी लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करा लक्ष्मी मातेची तुमच्यावर कृपा राहील.
कर्क राशीच्या लोकाना सर्व कामात चमकण्याची संधी आहे. नशीबाची साथ आहे. नोकरी, व्यवसायात विशेष काम तुम्हाला नक्की यश प्राप्त करून देईल. मेहनतीची सर्व प्रकारे दखल घेतली जाईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. प्रत्येक कामात भाग्य साथ देईल. घर किंवा वाहनाचं सुख प्राप्त होऊ शकतं.
वृषभ राशीच्या लोकांना आजच्या दिवशी विशेष लाभ होणार आहे. लक्ष्मी देवीची तुमच्यावर कृपा आहे. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. ज्याने धन लाभ होऊ शकतो. कोर्टाच्या कामात यश प्राप्त होईल. प्रेमसंबंधासाठी वृषभ राशीच्या लोकांचा काळ शुभ आहे.
मकर राशीच्या लोकांना नवीन कामासाठी आजचा दिवस शुभ आहे. कोणतेही नवीन काम सुरू केल्यास त्यात यश प्राप्त होईल. कुंटूबातील लोकांची प्रत्येक कार्यात साथ मिळेल.
आजच्या दिवशी चंद्राची स्थिती शुभ आहे. सूर्य मेष राशीत आहे आणि चंद्रमा मेष राशीत आहे. शुक्र मीन राशीत आहे. शनी कुंभ राशीत आहे. याचमुळे आजच्या शुभ दिवसांने या राशींचे भाग्य आणखी शुभ केले आहे.